चालू घडामोडी : 4 एप्रिल 2020

५० कोटी भारतीयांना COVID 19 चाचणी

मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

स्वदेशी करोना लस

हैदराबादमधील भारत बायोटेक कोरोफ्लू नावाची लस विकसित करत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी ही लस तयार करण्यात येत असून इंजेक्शनप्रमाणे ही लस देण्यात येणार नाही. तर करोनाग्रस्तांना नाकाद्वारे ही लस दिली जाणार आहे. नाकाद्वारे केवळ एक थेंब करोनाग्रस्तांच्या शरीरात सोडण्यात येईल. लसीचं पूर्ण नाव ‘कोरोफ्ल्यू-वन ड्रॉप कोविड १९ नेसल वॅक्सिन’ असं आहे. ही लस तयार करण्यासाठी भारत बायोटेकनं युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मेडिसन आणि फ्ल्यूजेन या कंपन्यांसोबत हातमिळवणी केली आहे. या तीन कंपन्यांचे वैज्ञानिक करोनाच्या लसीवर संशोधन करत आहेत. जेव्हा हे औषध संबंधित रूग्णाच्या शरीरात जातं तेव्हा शरीरात फ्ल्यूविरोधात लढण्यासाठी अॅन्टिबॉडिज तयार होतात.

आठ एप्रिलला पाहायला मिळणार सुपरमून

२०२० मधील पुढील सुपरमून ८ एप्रिलला सकाळी ०८:०५ वाजता भारतीय वेळेनुसार दिसणार आहे आणि हे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा एक विशेष अनुभव असेल कारण त्यादिवशी वर्षाचा सर्वात तेजस्वी चंद्र पाहायला मिळणार असून सर्वात मोठी पौर्णिमा असणार आहे. एप्रिलमधील या पौर्णिमेला पारंपारिकपणे पिंक मून (गुलाबी चंद्र) म्हणून ओळखले जाते. आणि यावर्षी पौर्णिमा असण्याव्यतिरिक्त यावर्षीचा सुपर पिंक मून सुद्धा असणार आहे.
सुपरमून म्हणजे काय?
एक सुपरमून कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. आपल्या ग्रहाच्या जवळ असल्यामुळे, चंद्र खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो. या महिन्याचा सुपर पिंक मून आपल्या ग्रहापासून ३,५६,९०७ किलोमीटर इतक्या लांब असणार आहे पृथ्वी आणि चंद्र यांच्यात सरासरी अंतर साधारणपणे ३,८४,००० किलोमीटर इतके आहे. पौर्णिमेचा चंद्र हा सुपरमूनसाठी आवश्यक नसतो, कारण चंद्र पृथ्वी भोवताली फिरत असतो. चंद्र पृथ्वीपासून लांब असतानासुद्धा आपल्याला पौर्णिमेचा चंद्र पाहता येतो. सीएनईटीच्या एका अहवालानुसार ८ एप्रिलचा सुपरमून हा वर्षाचा सर्वात मोठा आणि नेत्रदीपक सुपरमून असेल.
त्याला पिंक मून (गुलाबी चंद्र) का म्हणतात?
जेव्हा पौर्णिमेच्या नावांचा विचार केला जातो तेव्हा ही प्रक्रिया सहसा मूळ अमेरिकन प्रदेश आणि तेथील हंगामांवर अवलंबून असते. पिंक मून नावाचा अर्थ असा नाही की या दिवशी चंद्राचा रंग गुलाबी दिसेल, तर हे नाव उत्तर अमेरिकेच्या पूर्वेस वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या गुलाबी फुलावरून (फ्लोक्स सुबुलाटा) देण्यात आले आहे.
२०२० चा शेवटचा सुपरमून कधी होता?
२०२० चा शेवटचा सुपरमून हा ९ मार्च ते ११ मार्च दरम्यान दिसला होता. मार्चच्या सुपरमूनला सुपर वॉर्म मून असे नाव देण्यात आले होते.

मोदींचे नवे आव्हान

येत्या रविवारी म्हणजे पाच एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे आहे. त्याला प्रकाशाच्या शक्तीचे परिचय करुन द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटं द्यायची आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करून बाल्कनी किंवा दरवाजासमोर मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावावी. अंधाराला दूर करून प्रकाश दाखवायचा आहे. त्यामुळे हे सिद्ध होईल की कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण एकटे नाहीतर सर्व एकत्र आहोत हे समजणार आहे. असे आवाहन मोदींनी केले.
5 एप्रिलचे महत्त्व :-
राष्ट्रपिता महत्मा गांधीजी यांची दांडी यात्रा याच दिवशी त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. या दांडी यात्रेला खास महत्त्व आहे. हे आंदोलन राजकारणातील अहिंसक आंदोलनाचा एक महत्त्वपूर्ण प्रयोग होता. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे बाबू जगजीवन राम यांचा जन्म 5 एप्रिल 1908 रोजी झाला होता. त्यांनी 50 वर्ष संसदेत राहण्याचा विश्वविक्रम केला आहे. 1936 ते 1986 साली ते संसदेत होते. त्यांनी वंचितांसाठी अनेक प्रयत्न केले होते. तिसरी महत्त्वाची घटना भारतीय नौदलासाठी महत्त्वपूर्ण दिवस. या दिवशी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. 1919 साली भारतीय मर्चेंट शिपिंगची सुरुवात झाली होती. दुसरे म्हणजे यावेळी इंग्रजांनी आपल्या सागरी तटांवर कब्जा केला होता. त्याचवेळी मुंबईला बॉम्बे हे नाव मिळाले. 1979 मध्ये देशातील पहिले नौदल संग्रहालय उभारण्यात आले होते.

भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी काम केलेल्या पंजबामधील निर्मला सिंग खालसा यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.

विस्तीर्ण प्रदेशांचे निर्जंतुकीकरण करण्याची क्षमता असणारे एक अत्याधुनिक ड्रोन आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या ड्रोनला एक स्वयंचलित स्प्रेयर बसविण्यात आले असून त्या माध्यमातून फूटपाथ, उद्याने आणि रस्ते यांचे निर्जंतुकीकरण करता येऊ शकेल.

जागतिक बँकेची आशियातील देशांना मदत

जागतिक बँकेने भारताला तातडीची मदत म्हणून एक अब्ज डॉलरचा निधी दिला आहे. ‘कोरोना’विरुद्ध लढा यशस्वी होण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम बनविण्यासाठी हा निधी दिल्याचे जागतिक बँकेने सांगितले.
जागतिक बँक देत असलेला निधी
१ अब्ज डॉलर – भारत
२० कोटी डॉलर – पाकिस्तान
१० कोटी डॉलर – अफगाणिस्तान
७३ लाख डॉलर – मालदीव
१२.८६ कोटी डॉलर – श्रीलंका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *