महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC – Maharashtra Public Service Commission) विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ‘ महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.