राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस उपनिरीक्षक (PSI – Police Sub-Inspector)गट ब(अराजपत्रित) संवर्गातील पदे भरण्यासाठी MPSC ही परीक्षा घेते. ही परीक्षा एकूण चार टप्प्यात घेण्यात येते.
टप्पा | परीक्षा | गुण |
१ | पूर्व परीक्षा | १०० |
२ | मुख्य परीक्षा | २०० |
३ | शारीरिक चाचणी | १०० |
४ | मुलाखत | ४० |
पूर्व परीक्षा
- PSI-STI-ASO या तीन पदासाठी एकत्र एकत्र पूर्व परीक्षा होते.
- पूर्व परीक्षेचा निकाल मात्र या तीनही पदासाठी वेगवेगळा लावला जातो.
- या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असते.
- पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी चाळणी परीक्षा असते.
- याकरता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषेइतके (Cutoff Line) अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असते.
- या परीक्षेकरता ऋणात्मक गुण पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात.
- पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी गृहीत धरले जात नाहीत. तसेच ते उमेदवारांना कळविले जात नाहीत.
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
- चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
- नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास,राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्रामप्रशासन
- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
- भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी,जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,पर्जन्यमान,प्रमुख पिके,शहरे,नद्या,उद्योगधंदे इत्यादी.
- अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग,परकीय व्यापार,बँकिंग,लोकसंख्या,दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इ.
- सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र(केमिस्ट्री), प्राणीशास्त्र(झुलॉजी), वनस्पतीशास्त्र(बॉटनी)
- बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
मुख्य परीक्षा
परीक्षेचे स्वरूप :-
- या परीक्षेचेही स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असते.
- या परीक्षेकरता ऋणात्मक गुण पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात.
- २०१३ पासून आयोगाने शतमत (पर्सेंटाईल) पद्धत लागू केली आहे. यानुसार प्रत्येक विषयात सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास सर्वोत्कृष्ठ गुणप्राप्त उमेदवाराच्या ३५ टक्के पर्यंत,मागासवर्गीय उमेदवाराना ३०टक्के पर्यंत तर अपंग व खेळाडूना २० टक्के पर्यंत गुण प्राप्त होणे आवश्यक असते.
- या परीक्षेत दोन पेपर होतात. पेपर पहिला PSI-STI-ASO साठी एकत्रच होतो.
पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :-
पेपर दोनचा अभ्यासक्रम :-
शारीरिक चाचणी
- मुख्य परीक्षेकरता आयोगाने निश्चित केलेले किमान किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतात.
- उंची व छाती विषयक मोजमापाच्या अटी पूर्ण करणा-या उमेदवारांचीच शारीरिक चाचणी घेतली जाते.
- ही चाचणी पुरुष व महिलांसाठी वेगळी असते.
- या चाचणीचा तपशील पुढीलप्रमाणे:
पुरुषांसाठी | महिलांसाठी | |||
इवेंट | गुण | इवेंट | गुण | |
१) | गोळाफेक (७.२६० कि.ग्रॅम.) | १५ | गोळाफेक (४ कि.ग्रॅम) | २० |
२) | पुलप्स ८ | २० | धावणे (२०० मी) | ४० |
३) | लांब | १५ | चालणे(३ कि मी) | ४० |
४) | धावणे (८०० मी) | ५० |
मुलाखत
मुलाखतीमधून उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली जाते.
- शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणा-या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात येते.
- मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येतात.
अंतिम निकाल :
- मुख्य परीक्षा,शारीरिक चाचणी व मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी (Merit List) तयार करण्यात येते.