महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेच्या पद्धतीमध्ये (MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न) मोठा बदल केला आहे.
MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न साठी नेमली होती समिती.
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CSAT) संदर्भात उमेदवारांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी, (MPSC Rajyaseva New Pattern) तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रम यांचा एकत्रितपणे सर्वंकष अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी खालील तज्ञांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती: राज्यसेवा नवीन पॅटर्न
(१) श्री. चंद्रकात दळवी, भा.प्र.से. (सेवानिवृत्त)- अध्यक्ष (२) श्री. धनंजय कमलाकर – भा.पो.से. (सेवानिवृत्त-अतिरिक्त पोलीस महासंचालक) – सदस्य (३) डॉ.एस. एफ. पाटील- माजी कुलगुरु- सदस्य
राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार पूर्व परीक्षेतील बदल
राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी (राज्यसेवा नवीन पॅटर्न) करण्यात आला आहे. त्यासंदर्भात आयोगाच्या दिनांक २ मे, २०२२ रोजीच्या घोषणेद्वारे सर्व संबंधितांना अवगत करण्यात आले असून सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून करण्यात येत आहे. राज्यसेवा नवीन पॅटर्न
राज्यसेवा नवीन पॅटर्ननुसार मुख्य परीक्षेत बदल
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाबाबत आयोगाकडून खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे :
राज्यसेवा मुख्यपरीक्षेकरीता वरीलप्रमाणे परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

परीक्षा योजना:
- परीक्षेचे स्वरुप :- वर्णनात्मक
- एकूण पेपर :- नऊ
- अर्हताकारी पेपर:
- भाषा पेपर १- मराठी (३०० गुण) (२५% गुणांसह अर्हताकारी)
- भाषा पेपर २ – इंग्रजी (३०० गुण) (२५% गुणांसह अर्हताकारी)
गुणवत्ता यादीकरिता विचारात घ्यावयाचे पेपर व त्यांचे गुण:
१) निबंध (मराठी किंवा इंग्रजी माध्यम) (२५० गुण)
२) सामान्य अध्ययन -१ (२५० गुण)
३) सामान्य अध्ययन-२ (२५० गुण)
४) सामान्य अध्ययन-३ (२५० गुण)
५) सामान्य अध्ययन -४ (२५० गुण)
६) वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १ (२५० गुण)
७) वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २ (२५० गुण)
मुलाखत – २७५ गुण
एकूण गुण – २०२५ गुण (१७५० + २७५) - सामान्य अध्ययन- १, सामान्य अध्ययन- २ व सामान्य अध्ययन-३
- या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश राहील.
- सामान्य अध्ययन-४ हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य व योग्यता या विषयावर राहील.
राज्यसेवा मुख्य परीक्षा वैकल्पिक विषयांची यादी
१) Agriculture (कृषी)
२) Anthropology (मानववंशशास्त्र)
३) Botany (वनस्पतीशास्त्र)
४) Commerce and Accountancy (वाणिज्य व लेखा)
५) Geography (भुगोल)
६) Law (विधी)
७) Mechanical Engineering (यांत्रिकी अभियांत्रिकी)
८) Physics (भौतिकशास्त्र)
९) Animal Husbandry and Veterinary Science (पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान)
१०) Chemistry (रसायनशास्त्र)
११) Economics (अर्थशास्त्र)
१२) Geology (भूविज्ञान)
१३) Management (व्यवस्थापन)
१४) Medical Science (वैद्यकीय विज्ञान)
१५) Political Science and International Relations (राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध)
१६) Sociology (समाजशास्त्र)
१७)Marathi Literature (मराठी वाड:मय)
१८) Civil Engineering (स्थापत्य अभियांत्रिकी)
१९) Electrical Engineering (विद्युत अभियांत्रिकी)
२०) History (इतिहास)
२१) Mathematics (गणित)
२२) Philosophy (तत्वज्ञान)
२३) Psychology (मानसशास्त्र)
२४) Public Administration (लोकप्रशासन)
२५) Zoology (प्राणीशास्त्र)
२६) Statistics (सांख्यिकीशास्त्र)