चालू घडामोडी : २ जून २०२१

MPSC चालू घडामोडी : २ जून २०२१
MPSC चालू घडामोडी : २ जून २०२१

चीनमध्ये ‘एच १० एन ३’ विषाणूचा पहिला रुग्ण

 • चीनमध्ये एच १० एन ३ हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे, मानवात हा विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही घोषणा केली आहे.
 • चीनमधील झेनजियांग शहरात ४१ वर्षांची एक व्यक्ती बर्ड फ्लूच्या एच १० एन ३ या विषाणूने बाधित झाली.
 • या रुग्णास एच १० एन ३ इन्फ्लुएंझा झाल्याचे निदान २८ मे रोजी करण्यात आले होते. एच १० एन ३ या विषाणूचे एकही प्रकरण याआधी सापडले नव्हते. एच १० एन ३ हा विषाणू फारसा घातक मानला जात नाही. तो कोंबडय़ांमध्ये आढळून येतो.
 • एच ५ एन ८ हा विषाणू इन्फ्लुएंझा ए चा उपप्रकार असून त्याला बर्ड फ्लूचा विषाणू म्हटले जाते. तो कमी संसर्गजन्य असतो आणि तुलनेत माणसांपेक्षा पक्ष्यांना जास्त त्रासदायक ठरतो. एप्रिलमध्ये एच ५ एन ६ अ‍ॅव्हीयन फ्लूचा वन्य पक्ष्यातील विषाणू शेनयांग शहरात सापडला होता.

‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक निर्मिती

 • पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने कोव्होव्हॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सुरू केले आहे. या लशीला आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
 • ही लस प्रथिनांवर आधारित असून ही लस नोव्होव्हॅक्सची आवृती आहे.
 • कोव्होव्हॅक्स ही नोव्होव्हॅक्स लशीची प्रगत आवृत्ती असून त्याला अजून देशात मान्यता मिळालेली नाही.

मारिनची ऑलिम्पिकमधून माघार

 • कॅरोलिन मारिन हिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोक्यो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 • २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मारिनने भारताच्या पी. व्ही. सिंधूवर मात करत सुवर्णपदक जिंकले होते.

मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार

 • येत्या देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनने संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिग्गज माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदारची निवड केली आहे.
 • सीआयसीच्या जतीन परांजपे, निलेश कुलकर्णी व विनोद कांबळी या तीन सदस्यांनी ही निवड केली.
 • अमोल मुझुमदारच्या नेतृत्वात मुंबईने रणजी करंडक जिंकला होता.
 • निवृत्तीनंतर तो एनसीए, आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स, दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाजी प्रशिक्षक राहिला आहे.
 • १९९३ ते २०१३ या स्थानिक क्रिकेट हंगामात अमोल मुझुमदारने जबरदस्त कामगिरीचे दर्शन घडवले होते.
 • १७१ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ११,१६७ धावा कुटल्या होत्या.

टी20 वर्ल्डकपमध्ये 20 संघ

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2024 ते 2031 या आठ वर्षाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
 • टी-20 विश्वचषक प्रत्येक दोन वर्षांनी खेळळवण्यात येणार आहे. तसेच टी-20 विश्वचषकातील संघाची संख्याही आता 20 करण्यात आली आहे.
 • 2024, 2026, 2028 आणि 2030 या कालावधीत टी-20 विश्वचषक होणार आहे.
 • 50 षटकांच्या विश्वचषकात 2027 आणि 2031 मध्ये 14 संघाचा सहभाग असेल. सध्या एकदिवसीय विश्वचषक 10 संघासोबत खेळवला जातो.
 • चॅम्पियन्स ट्रॉफी आठ संघामध्ये खेळवली जाणार असून 2025 आणि 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मंजुरी

 • काही दिवसांपूर्वी रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपातकालीन वापर म्हणून भारतात मान्यता दिल्यानंतर आता अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे.
 • अमेरिरकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या करोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.
 • लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनमध्ये बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं मिश्रण करून डोस तयार करण्यात आला आहे.
 • या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज करोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात.
 • रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने ही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स बनवली आहेत.

ऑपरेशन मुस्कान –

 • मुंबई पोलिसांनी १ जून २०२१ पासून हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी ऑपरेशन मुस्कान ही मोहीम हाती घेतली आहे. २०१५ पासून आतापर्यंत ९ वेळा अशा प्रकारची मोहीम मुंबई पोलिसांनी राबवली आहे.

शिवस्वराज्य दिन

 • छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी साजरा होणारा राज्याभिषेक दिन आता ग्रामविकास विभागातर्फे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *