MPSC चालू घडामोडी – १० ऑक्टोबर २०२१

MPSC चालू घडामोडी – १० ऑक्टोबर २०२१

 • ९ ऑक्टोबर २०२१ रोजी पाळण्यात आलेल्या ‘जागतिक टपाल दिना’ची थीम काय होती? – Innovate to recover
 • ‘State of Terror’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? – लुईस पेनी, हिलरी रोधम क्लिंटन
 • ९ ऑक्टोबर २०२१ रोजी कोणत्या जिल्ह्यातील चिपी या ग्रीनफिल्ड विमानतळाचे उद्घाटन झाले? – सिंधुदुर्ग
 • केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती केली आहे? – एम. रविचंद्रन
 • १२ ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणते देश सहभागी झाले आहेत? – भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका
 • कोणत्या राज्याने राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना जगातील पहिल्या ५० शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यास साहाय्य करण्यासाठी ‘राजीव गांधी शैक्षणिक उत्कृष्टतता शिष्यवृत्ती’ योजना सुरु केली आहे? – राजस्थान
 • कोणत्या भारतीय कंपनीने डॅनिश कंपनी स्टायस्डल फ्युएल टेक्नॉलॉजीज सोबत ‘ग्रीन हायड्रोजन’ इलेक्ट्रोलायझर प्लांट उभारण्याबाबत सामंजस्य करार केला आहे? – रिलायन्स इंडस्ट्रीजन
 • कोणत्या राज्याने सर्व जिल्ह्यांमध्ये ‘अँटी नारकोटिक्स सेल’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? – महाराष्ट्र
 • कोणत्या राज्यात असलेल्या बोर्डोलोई विमानतळाचे कामकाज अदानी समूहाकडे सोपवण्यात आले आहे? – आसाम
 • मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोणत्या क्रूझवर अलीकडेच धाड टाकून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आहे? – Cordelia
 • अफगाणिस्तानातील कोणत्या प्रांतात शिया मुस्लिमांच्या मशिदीमध्ये ८ ऑक्टोबर २०२१ रोजी घडविण्यात आलेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात १०० हून अधिक नागरिक ठार झाले? – कुंडुझ प्रांत
 • जागतिक कुमार नेमबाजी स्पर्धा ऑक्टोबर २०२१ मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडली? – लिमा, पेरू
 • महाराष्ट्रातील संभाव्य लोकायुक्त कायद्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? – सीताराम कुंटे (राज्याचे मुख्य सचिव)
MPSC चालू घडामोडी - १० ऑक्टोबर २०२१
MPSC चालू घडामोडी – १० ऑक्टोबर २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *