२२३८ पदांसाठी कारागृह पोलीस भरती २०२३ – Karagruh Police Bharti 2023 : राज्यातील कारागृह विभागात लवकरच २२३८ पदांसाठी पोलीस भरती करण्यात येणार आहे. कारागृह पोलीस विभागाच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत असल्याने कारागृह पोलीस (Karagruh Police) कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्यातील कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
त्यामुळे पोलिस विभागात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची ही मोठी संधी आहे. सध्या राज्य कारगृह विभागात (Maharashtra Prison Department) तब्बल ५ हजार कारागृह पोलीस कर्मचारी कार्यरत असले तरीही २२३८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा कामाचा ताण पडत असल्यामुळे ही पोलीस भरती केली जाणार आहे.
२२३८ पदांसाठी कारागृह पोलीस भरती २०२३ – Karagruh Police Bharti 2023
- या लेखामध्ये कारागृह पोलीस भरती २०२३ बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
- जाहिरात कधी येणार आहे?
- शैक्षणिक पात्रता काय असते?
- वयोमर्यादा किती असते?
- शारीरिक पात्रता कशी असते?
- लेखी परीक्षेचे स्वरूप काय आहे?
- मैदानी चाचणीचे स्वरूप काय आहे?
- कारागृह पोलीस भारतीचे मागील वर्षांचे पेपर?
Karagruh Police Bharati 2023 Advertisement (कारागृह पोलीस भारतीची जाहिरात)
लवकरच कारागृह पोलीस भरती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाद्वारे रिक्त असलेल्या पदांची संख्या नुकतीच उघड करण्यात आली आहे. कारागृह पोलीस भरतीची जाहिरात आल्यावर या ठिकाणी लवकरच त्यासबंधी संपूर्ण माहिती अपडेट केली जाईल.
Karagruh Police Bharati : शैक्षणिक पात्रता
कारागृह विभागातील पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवार उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र धारण केलेला असावा. म्हणजेच उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
Karagruh Police Bharti 2023 : वयोमर्यादा
उमेदवाराचे कमीत कमी १८ वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक आहे. पुढील तक्त्यामध्ये प्रवर्गनिहाय किमान व कमाल वयोमर्यादा देण्यात आली आहे.
karagruh police bharti 2: शारीरिक चाचणी
महाराष्ट्र पोलीस भारती प्रमाणेच कारागृह पोलीस शिपाई पदाची शारीरिक चाचणी घेतली जाते. शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होते. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५०% गुण प्राप्त करणारे म्हणजेच ५० पैकी २५ गुण प्राप्त करणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र होतात. पुरुष व महिला उमेदवारांसाठी वेगवेगळे इव्हेंट होतात.
पुरुष उमेदवारांसाठी इव्हेंट्स : (२२३८ पदांसाठी कारागृह पोलीस भरती २०२३ – Karagruh Police Bharti 2023)
१६०० मीटर धावणे | २० गुण |
१०० मीटर धावणे | १५ गुण |
गोळाफेक | १५ गुण |
एकूण गुण | ५० |
महिला उमेदवारांसाठी इव्हेंट्स :
८०० मीटर धावणे | २० गुण |
१०० मीटर धावणे | १५ गुण |
गोळाफेक | १५ गुण |
एकूण गुण | ५० |
karagruh police bharti लेखी परीक्षेचे स्वरूप
शारीरिक चाचणीमध्ये उतीर्ण विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात. रिक्त जागेच्या १:१० प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात. एकूण १०० गुणांची लेखी परीक्षा होते. त्यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जातो.
- पेपरची भाषा – मराठी
- एकूण प्रश्न – १००
- एकूण गुण – १००
- परीक्षेचा कालावधी – ९० मिनिटे
कारागृह पोलीस भरतीमध्ये पुढील चार विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात..
विषय | प्रश्न | गुण |
अंकगणित | २५ प्रश्न | २५ गुण |
बुद्धिमत्ता चाचणी | २५ प्रश्न | २५ गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | २५ प्रश्न | २५ गुण |
मराठी व्याकरण | २५ प्रश्न | २५ गुण |
लेखी परीक्षेमध्ये आवश्यक गुण : अंतिम यादीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवाराला ४०% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजेच १०० पैकी ४० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा अंतिम निवड यादीसाठी विचार केला जातो. ४० पेक्षा कमी गुण मिळालेला उमेदवार अपात्र ठरतो.
Required Marks
Jail Police Recruitment 2023 for 2238 Posts – Karagruh Police Bharti 2023 : Police recruitment for 2238 posts will be done soon in the Karagruh department of the state. Due to the heavy workload on the available employees of the Karagruh Police Department, it has been decided to fill the vacant posts of the Karagruh Police (Karagruh Police) employees soon. Amitabh Gupta, Additional Director General of Prisons in the state gave this information.
So this is a great job opportunity for candidates who are willing to work in police department. At present there are about 5000 Karagruh police personnel working in the state prison department (Maharashtra Prison Department), but 2238 posts are vacant. This police recruitment is going to be done as these vacancies are putting a strain on the available staff.