Environment Short Notes

आमच्या @MpscMantra या टेलिग्राम चानलवरील नोट्स..
_________________________________________
#Environment
बॉटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (BSI) 
➖ही संस्था १३ फेब्रुवारी १८९० मध्ये कोलकाता येथे सुरू झाली.
➖१९३९ साली बंद झालेली ही संस्था पुन्हा १९५४ मध्ये सुरू करण्यात आली.
➖ कार्य : देशातील विविध भागांतील वनस्पतींचा अभ्यास, संशोधन व संवर्धनासाठी उपाय सुचवणे.
➖ पुणे, डेहराडून, कोईमतूर, शिलाँग, अलाहाबाद, जोधपूर, पोर्ट ब्लेअर, इटानगर व गंगटोक येथे कार्यालये आहेत.
जॉइन करा » » @MPSCmantra
_________________________________________
#Environment
* झुऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया
» स्थापना- १ जुल १९९६.
» कार्य- देशातील विविध प्राणी-प्रजातींचा अभ्यास करणे, प्राण्यांचे नमुने गोळा करणे, अभ्यास-संशोधन करणे, जतन करणे, प्राण्यांचे वर्गीकरण व पर्यावरणासंबंधी मूलभूत संशोधन करणे.
» १० लाख नमुन्यांसह आशियातील सर्वात मोठा संग्रह या संस्थेत आहे.

@MPSCmantra
_________________________________________
#Environment
* सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट (CSE)
» नवी दिल्लीच्या या संस्थेद्वारे पर्यावरणविषयी जनजागृती केली जाते.
» ही संस्था शाश्वत व समान विकासासंबंधी कार्यरत आहे.
» संस्थेने भारतीय पर्यावरणाच्या स्थितीबाबत संशोधन प्रकल्प प्रसिद्ध केला असून भारतीय नागरिकांची सनद प्रकाशित झाली आहे.
» संस्थेतर्फे ‘डाऊन टू अर्थ’ हे विज्ञान पर्यावरणासंबंधीचे पाक्षिक प्रसिद्ध केले जाते.
@MPSCmantra
_________________________________________
#Environment
* केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ-
» स्थापना- सप्टेंबर १९७४ दिल्ली.
»  जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९७४ अन्वये संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
» हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा, १९८१ अन्वये अधिकार, जल व हवेतील प्रदूषणाच्या नियंत्रणासंबंधी संस्था काम करते.
@MPSCmantra
_________________________________________
#Environment
* राष्ट्रीय हरित न्यायालये (National Green Tribunal): 
» पर्यावरणाविषयी वाद किंवा दावे हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश या संस्थेत आहे.
» मात्र, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर १९०८ यामध्ये नमूद केलेली कार्यपद्धती या न्यायपीठाला लागू असणार नाही.
» या न्यायालयाची स्थापना राष्ट्रीय हरित न्यायासन कायदा २०१० अंतर्गत १८ ऑक्टोबर २०१० रोजी करण्यात आली.
» या न्यायालयावर खटले निकालात काढण्यासाठी कालावधीचे कायदेशीर बंधन नसते. मात्र, हे खटले ६ महिन्यांच्या आत निकालात काढण्यासाठी हे न्यायालय सर्वतोपरी प्रयत्न करते.
» या न्यायालयाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भोपाळ, पुणे, कोलकाता व चेन्नई या चार ठिकाणी या न्यायालयाची खंडपीठे आहेत.

@MPSCmantra
_________________________________________
#Environment
* बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)
» स्थापना : १८८३. मुंबई. सहा सदस्यांच्या छोटय़ा संस्थेपासून सुरुवात झाली.
» ही वन्यजीव संशोधनासाठीची सर्वात जुनी स्वयंसेवी संस्था आहे.
» संस्थेतर्फे हॉर्नबिल, जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री ही मासिके प्रसिद्ध होतात.
» प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली या संस्थेशी संबंधित होते.
@MPSCmantra
_________________________________________
#Environment
* बोटॅनिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया (BSI)
» स्थापना- १३ फेब्रुवारी १८९०. कोलकाता.
» ही संस्था १९३९ मध्ये बंद होऊन पुन्हा १९५४ मध्ये सुरू झाली.
» देशाच्या विविध भागातील वनस्पतींचा अभ्यास व संवर्धनासाठीचे प्रयत्न या संस्थेतर्फे करण्यात येतात.
» पुणे, देहराडून, कोईमतूर, शिलाँग, अलाहाबाद, जोधपूर, पोर्ट ब्लेअर, इटानगर व गंगटोक येथे या संस्थेची कार्यालये आहेत.
@MPSCmantra
_________________________________________
#Environment #Env
जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल :- 
» दर पाच वर्षांनी संयुक्त राष्ट्राची “अन्न व कृषी संघटना’ (FAO) जाहीर करते.
» पहिला अहवाल 1948 मध्ये जाहीर करण्यात आला.
» 2015 च्या अहवालात जगातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या देशांच्या यादीत भारत 10 व्या क्रमांकावर आहे.
» Nations with greatest annual forest gain (2010-2015)
1. China : 1,542
2. Australia : 308
3. Chile : 301
4. USA: 275
5. Philippines : 240

India :- 8th

» Nations with greatest annual forest loss (2010-2015)
1. Brazil 984
2. Indonesia : 684
3. Myanmar : 546
4. Nigeria : 410
5. Tanzania : 372

जॉइन » @MpscMantra
_________________________________________
#Environment
कन्निमरा साग :- 
» केरळमधील पालघाट जिल्ह्यातील परिंबिकुलम वन्यजीव अभयारण्यात हे झाड आहे.
» हे जगातील सर्वांत मोठे व सर्वांत जुने सागाचे झाड आहे.
» झाडाचा घेर 6.48 मीटरचा असून ऊंची 48.75 मीटर आहे.
» हे झाड साधारणपणे 450 वर्षांचे आहे असे मानले जाते.
» परंबीकुलम या जमातीकडून ‘virigin tree’ म्हणून याचे पूजन केले जाते.
» भारत शासनाने या झाडाचा ‘महावृक्ष पुरस्कार’ देऊन सन्मान केला आहे.

@MpscMantra
_________________________________________
#Environment
BOD आणि COD म्हणजे काय?

* जैविक ऑक्सिजन गरज (BOD: Biological oxygen demand)
* रासायनिक ऑक्सिजन गरज (COD: Chemical oxygen demand)

» बी.ओ.डी म्हणजे पाण्यात असणाऱ्या जीवजंतुना पाण्यातील प्रदूषक घटक विघटन करायला लागणार ऑक्सिजन.
»  सी.ओ.डी. म्हणजे पाण्यामधील एकूण रासायनिक घटकांना विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन.
» पाण्याचे प्रदुषण मोजण्यासाठी दोन खास तंत्रे आहेत. हे दोन्ही दर्शक पाण्याची प्रदुषण पातळी दर्शवणारी मापदंडे आहेत.
»  ह्या दोन्ही पातळ्या मिलीग्राम प्रति लिटर मध्ये मोजल्या जातात.
» बी.ओ.डी. मोजायला कमीत कमी 5 दिवसाचा वेळ द्यावा लागतो तर सी.ओ.डी. काही मिनिटात मोजता येते.
»  हे जैविक विघटन किती होवू शकेल याची नोंद देतो. तर सी.ओ.डी. प्रदुषण किती प्रमाणात आहे याची नोंद देतो.
» साधारण पणे सी.ओ.डी. 100 मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त असेल तर पाणी प्रदूषित आहे असे मानण्यात येते.
» पिण्याच्या पाण्यासाठी बी.ओ.डि ची पातळी 0 असली पाहिजे.

@MpscMantra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *