#DailyQuiz : 18 October 2019

एशियन कॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्सच्या प्रादेशिक गटात कोणत्या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? – गली बॉय
२०१९ चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – मार्गारेट अटवूड आणि बर्नार्डिन एव्हरीस्टो
एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वांत तरुण क्रिकेटर कोण ठरला? – यशस्वी जैस्वाल (१७) (मुंबई)
फोर्ब्सने 2019 मधील सर्वात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यामध्ये कितव्यांदा मुकेश अंबानी सलग पहिल्या स्थानी कायम आहेत? – १२
आंतरराष्ट्रीय ग्रामीण मंजिल दिवस कोणत्या दिवशी पळाला जातो? – १५ ऑक्टोबर
टॅक्सीबॉटचा वापर करणारी जगातील पहिली एअरलाईन कोणती? – एअर इंडिया
शिरुई लिली महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? – मणिपूर
अन्न सुरक्षा कायद्याच्या पूर्ततेत लघु आणि मध्यम खाद्यान्न व्यवसायांना मदत करण्यासाठी FSSAI ने कोणती योजना सुरु केली आहे? – फूड सेफ्टी मित्र
नुकतीच केंद्रीय कायदा मंत्रालयात कायदा सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – अनूप कुमार मेंदीरत
जागतिक देणगी निर्देशांकमध्ये (world giving index) भारताचा कितवा क्रमांक आहे? – ८२ (पहिला – अमेरिका)
कोणता देश जगातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ (artificial intelligence) स्थापन करणार आहे? – संयुक्त अरब अमिरात
नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या प्रदर्शनाचे आयोजन कोठे करण्यात आले? – छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
मध्य प्रदेश सरकारचा २०१८-१९ चा राष्ट्रीय किशोर कुमार सन्मान कोणाला देण्यात आला आहे? – दिग्दर्शक प्रियदर्शन
जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे? – १०२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *