
1) आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे (IMF) प्रमुख कोण आहेत?
2) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५% वाढ करण्याचा निर्णय ९ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता किती टक्के झाला आहे?
3) विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत?
4) २०१९ चा रसायनशास्त्राचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
5) २०१९ चा रसायनशास्त्राचा नोबल पुरस्कार कोणत्या संशोधनाला मिळाला आहे?
6) कोण सर्वांत वयोवृद्ध नोबेल विजेते ठरले आहेत?
7) जागतिक मानसिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
8) सजीवांच्या हुबेहूब प्रति तयार करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?
9) क्लोनिंग करण्यात आलेल्या पहिल्या सस्तन प्राण्याचे नाव काय आहे?
10) शेतकऱ्यांना आधार देण्यासाठीची ‘भावांतर योजना’ कोणत्या राज्याची आहे?
11) वन धोरणांना मानवी चेहरा देणाऱ्या कोणत्या संशोधकाचे नुकतेच निधन झाले?
12) सर्वाधिक मतदान केंद्रे असलेला जिल्हा कोणता?
13) सर्वांत कमी मतदान केंद्रे असलेला जिल्हा कोणता?
14) जागतिक आर्थिक मंचाने ९ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर केलेल्या ‘जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात’ भारत कितव्या स्थानी आहे?
15) जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात पहिले स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे?
16) स्वातंत्र्य सैनिक व निर्भीड पत्रकार ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे?
17) सी-१४ पर्यावरण परिषद ९ ते १२ ऑक्टोबर २०१९ दरम्यान कोणत्या ठिकाणी पार पडली?
18) ११ ते १३ ऑक्टोबर २०१९ दरम्यान कोणत्या शहरात ‘भारत आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापार मेळ्या’चे आयोजन करण्यात आले?
उत्तरे : १) ख्रिस्टॅलिना जॉर्जिवा, २) १७% (पूर्वी १२%), ३) ८ कोटी ९९ लाख, ४) जॉन गुडइनफ (अमेरिका), स्टॅनले व्हिटिंगहॅम (ब्रिटन), अकिरा योशिनो (जपान), ५) लिथियम आयन बॅटरी, ६) जॉन गुडइनफ (९७ वर्ष), ७) १० ऑक्टोबर, ८) क्लोनिंग, ९) डॉली, १०) मध्य प्रदेश, ११) एस्थर एम्वांगी, १२) पुणे, १३) सिंधुदुर्ग, १४) ६८ व्या (मागील वर्षी ५८ व्या स्थानी), १५) सिंगापुर, १६) डॉ. सुधीर रसाळ (ज्येष्ठ समीक्षक) (स्वरूप – ५० हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह), १७) कोपनहेगन (डेन्मार्कची राजधानी), १९) नवी दिल्ली
