#DailyQuiz : 1 October

1) चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी कोणत्या चित्रपटात कालिया ही अजरामर भूमिका केली होती?

2) विजू खोटे यांनी कोणत्या चित्रपटामधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती?

3) हवामान विभागाच्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे परतीच्या पावसाची सुरुवात कोणत्या तारखेला होते?

4) केंद्रीय सामाजिक व न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, जमातीच्या सर्वसामान्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधनासाठी ‘राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप’ची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात अली होती?

5) देशातील कोणत्या सहा राज्यांत पोषणविषयक प्रश्नांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा (न्यूट्रिशन सर्व्हिलन्स सिस्टीम) उभारण्यात आली आहे?

6) अतिनील किरणे शोषून घेऊ शकणार ओझोनचा रेणू ऑक्सिजनचे किती अणू मिळून तयार होतो?

7) चालनवाढीविषयी ‘जेंव्हा पैसे वाईट असतो तेंव्हा तो अधिक चांगला कसा होईल असे लोक बघत असतात पण तो चांगला असेल तर इतर गोष्टींचा विचार करतात’ असे निरीक्षण पैशाच्या क्रयशक्तीबद्दल कोणी मांडले?

8) ३० सप्टेंबर २०१९ रोजी एअर चीफ मार्शल राकेश कुमार भदौरिया यांनी हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते हवाई दलाचे कितवे प्रमुख ठरले आहेत?

9) कर्तारपूर मार्गिका सध्या चर्चेत आहे. ही मार्गिका कोणत्या दोन धार्मिक स्थळांना जोडते?

10) भारताच्या कोणत्या खेळाडूने अर्जेंटिनाच्या फॅक्यून्डो बोग्नीसचा पराभव करून एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले?

11) क्ले कोर्टवर एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय कोण?

12) जमैकाच्या शेली एन फ्रेझर-प्रिसने दोहा येथे पार पडलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत महिलांची १०० मीटर स्पर्धा जिंकली. ती कोणत्या टोपण नावाने ओळखली जाते?

13) माओ त्से तुंग यांनी कोणत्या दिवशी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाल्याचे जाहीर केले होते?

14) राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी पळाला जातो?

15) जमिनीवरून मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्त्राची ३० सप्टेंबर २०१९ रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे?

16) आठ मूलभूत क्षेत्रांमध्ये (गाभा क्षेत्र) कोणत्या क्षेत्रांचा समावेश होतो?

17) रिझर्व्ह बँकेने ‘पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक’ या नागरी सहकारी बँकेवर बँकिंग नियामक कायद्याच्या कलम ३५ (अ) चा वापर करत निर्बंध लागू केले. या बँकेची कोणत्या वर्षी स्थापना झाली आहे?

18) दाभाडी प्रबंध हा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे?

19) २०१५-१६ हे अधरवर्ष मानून केलेल्या शैक्षणिक गुणवत्ता मापनात केरळ पहिल्या स्थानी असून उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे. तर यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?

उत्तरे :- १) शोले, २) या मालक, ३) १ सप्टेंबर, ४) २००५, ५) महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा, ६) तीन, ७) जॉन केनेथ गालब्रेथ, ८) २६ वे, ९) दरबार साहिब (कर्तारपूर, पाकिस्तान) आणि डेराबाबा नानक साहिब (पंजाब, भारत), १०) सुमित नागल (दुसरे विजेतेपद), ११) सुमित नागल, १२) पॉकेट रॉकेट (तिचे हे चौथे विश्वविजेतेपद), १३) १ ऑक्टोबर १९४९ (७० वर्ष पूर्ण), १४) १ ऑक्टोबर, १५) २९० किमी, १६) कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा, १७) १९८४, १८) शेतकरी कामगार पक्ष, १९) सहावा

Leave a Reply

Your email address will not be published.