Daily Quiz : 27 Sep. (चालू घडामोडी)

जाक शिराक यांचे इतक्यात निधन झाले. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? – फ्रान्स

फक्त झाडावरील बेडूक खाणाऱ्या सापाचा तरुण संशोधक तरुण ठाकरे यांनी शोध लावला असून त्या सापाचे नामकरण काय करण्यात आले? – ठाकरेज कॅट स्नेक

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या (सीआरएस) आकडेवारीनुसार मुलीच्या जन्मदराच्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे? – सिंधुदुर्गात

कोणाची आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली? – ख्रिस्तालिना जॉर्जिवा

जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील शेतकरी समूह संस्थांना खासगी व सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून शेतमालाची मूल्य साखळी तयार करण्यासाठी कोणता प्रकल्प महाराष्ट्र सरकार राबवत आहे? – स्मार्ट (महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन)

पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कोणाला ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर काण्यात आला आहे? – डॉ. गो. बं. देगलूरकर

ब्राम्हण जागृती सेवा संघाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त कोणाला ‘समाज भूषण’ पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे? – मोहन जोशी

‘पर्यायी नोबेल पुरस्कार’ म्हणून ओळखला जाणारा ‘लाईट लाईव्हलीहूड’ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? – १९८०

जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता क्रमवारी २०१९ मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? – ४४ व्या

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी क्षयरोगासंबंधी कोणते अभियान सुरु केले आहे? – टीबी हरेगा देश जितेगा

१६ वी ‘जागतिक लघु व मध्यम उपक्रम व्यवसाय शिखर परिषद’ कोणत्या शहरात पार पडली? – नवी दिल्ली

चेंजमेकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कोण? – पायल जांगीड

 ‘Reset: Regaining India’s Economic Legacy’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? – सुब्रह्मण्यम स्वामी

जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? – २६ सप्टेंबर

Leave a Reply

Your email address will not be published.