Current Affairs : 14th Nov.

शबरीमला प्रकरण : सात न्यायाधीशांचे खंडपीठ देणार निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शबरीमला खटल्यावर १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर 2018 मध्ये शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश मिळेल असा निर्णय दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात 60 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. आर.फली नरिमन, न्या. ए.एम. खानविलकर, न्या. डी.वाय.चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने 28 सप्टेंबरला निर्णय दिला होता.

१४ नोव्हेंबर : राष्ट्रीय बालदिन

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 1889 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरा करण्यात आला.

सरन्यायाधीश आता माहिती अधिकारात

देशाच्या सरन्यायाधीशांचे कार्यालय आता माहिती अधिकारांतर्गत आले आहे. मात्र, गोपनियता आणि वैयक्तिकतेला कोणतीही ईजा पोहोचविली जाणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालया आणि सरन्यायधीशांचे कार्यालय हे सार्वजनिक प्राधिकरण असल्याने माहितीच्या अधिकारात येतात, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात स्वत: सर्वोच्च न्यायलयानेच अपील केले होते. सरन्यायधीश रंजन गोगोई, न्या. एन.व्ही. रामना, डी.वाय.चंद्रचूड, न्या.दिपक हुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या घटनापीठाने हे अपील केले होते. सर्वोच्च न्यायलायने घटनेतील कलम 124 अंतर्गत हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर कोलेजियमचा निर्णय सर्वोच्च न्यायलयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. मात्र, माहिती अधिकाराचा वापर करुन सर न्यायाधीशांवर पाळत ठेवता येणार नाही. दिल्ली उच्च न्यायलयाने दिलेल्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायलायने 2010मध्ये अपील केले होते.

सजग’ या तटरक्षक दलासाठीच्या गस्तीनौकेचे जलावतरण

गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधणी केलेल्या ‘सजग’ या गस्तीनौकेचे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि श्रीमती विजया नाईक यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. ही नौका गस्तीबरोबरच बचाव आणि मदतकार्यासाठी उपयोगी असणार आहे. गोवा शिपयार्ड भारतीय तटरक्षक दलासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 05 गस्तीनौकांची बांधणी करणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते 13 नोव्हेंबर 2016 रोजी करण्यात आला होता. संगणक आधारीत प्रणालीच्या माध्यमातून नियंत्रण व्यवस्था असलेली ही तटरक्षक दलासाठीची सर्वात अत्याधुनिक नौका असणार आहे. 2400 टन वजनाच्या नौकेवर चाचेगिरीला आळा घालण्यासाठी जलद प्रतिसाद यंत्रणा कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.