मायलॅबच्या अँटीजेन किटला मंजुरी

“मायलॅब’च्या अँटीजन किटला “भारतीय वैद्यक संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) उत्पादनाची परवानगी दिली आहे. भारतात विकसित केलेले हे पहिले अँटीजन कोरोना टेस्टींग किट आहे. विशेष म्हणजे हे कीट 450 रुपयांत उपलब्ध होणार आहे. आरटी-पीसीआर तंत्रज्ञानाने कोरोनाचे निदान करणारे पहिली स्वदेशी किटही मायलॅबने विकसित केले आहे. देशातील जलद कोरोना चाचण्यांना चालना देण्यासाठी उपयुक्त असलेल्या या किटचे नाव “पॅथोकॅच कोविड-19 अँटीजन रॅपिड टेस्टिंग किट’ असे आहे.
जलद चाचण्यांचे महत्त्व –

  • देशात अँटीजेन आणि आरटी-पीसीआर अशा दोनही चाचण्यांची आवश्‍यकता
  • अँटीजेन टेस्टमध्ये बाधित आढळल्यास त्यांची परत चाचणी करण्याची गरज नाही.
  • बाधित नसलेल्यांची पुन्हा आरटी-पीसीआरने चाचणी करण्यात येईल.
  • यामुळे वेळ तर वाचेल पण त्याचबरोबर पैसेही वाचतील
  • विलगीकरण, कॉंटॅक्‍ट ट्रेसिंग जलद करणे शक्‍य होणार

अँटिजेन म्हणजे काय?
विषाणूंच्या संसर्गाने रुग्णाच्या शरीरात विषाणूजन्य प्रथिने (अँटिजेन) तयार होतात. रुग्णाच्या श्‍वसनमार्गातील नमुने घेतल्यानंतर हे अँटिजेन आहेत की नाही, याची माहिती या पद्धतीतून मिळते. अर्थात, यासाठी विषाणूंचा संसर्ग कधी झाला, त्याचे नमुने कसे घेतले यावर या टेस्टचे निदान अवलंबून रहाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *