वनलायनर जनरल नॉलेज

Marathi General Knowledge

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.
2) अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.
3) अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.
4) अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.
5) अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.
6) अक्रा – घाना या देशाची राजधानी.
7) अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.
8) अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.
9) अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.
10) अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.
11) अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.
12) अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.
13) अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.
14) अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.
15) अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.
16) अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.
17) अथेन्स – ग्रीस ची राजधानी.
18) अदिती – वामनावतारी विष्णुची माता.
19) अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.
20) अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.
21) अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.
22) अबुजा – नायजेरियाची राजधानी.
23) अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.
24) अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.
25) अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.
26) अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.
27) अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.
28) अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.
29) अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.
30) अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.
31) अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.
32) अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
33) अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.
34) अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.
35) अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.
36) अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.
37) अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.
38) अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.
39) अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.
40) अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.
41) अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.
42) अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.
43) अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.
44) अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.
45) अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.
46) अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.
47) अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.
48) अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
49) आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.
50) आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.
51) आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)
52) आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.
53) आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.
54) आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.
55) आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.
56) आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.
57) आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील …. या घटका अभावी होतो.
58) आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.
59) आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.
60) आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.
61) आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.
62) आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.
63) आवली – संत तुकारामांची पत्नी.
64) आशिया – सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड.
65) आस्थिमज्जा – शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात.
66) इंग्रजी – या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत.
67) इंग्लंड – या देशाचे लिखीत संविधान नाही.
68) इंटरपोल – आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना.
69) इंडीया गॅजेट – हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकाता येथुन प्रकाशित झाले.
70) इंडोनेशिया – भारताच्या आग्नेय दिशेला हा देश आहे.
71) इंडोनेशिया – हा देश नारळांचा मुळ देश मानला जातो.
72) इंदिरा गांधी – भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.
73) इंदिरा गांधी – भारतातील पहिली महिला पंतप्रधान.
74) इंदिरा गांधी – या भारतीय स्त्रीला राष्ट्रमाता असे म्हटले जाते.
75) इंफाळ – मणिपूरची राजधानी.
76) इचलकरंजी – महाराष्ट्राचे मॅचेस्टर.
77) इटानगर – अरुणाचल प्रदेशची राजधानी.
78) इटालिया – या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत.
79) इमू – हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो.
80) इसा – ही संयुक्त युरोपियन देशांनी एकत्र येवून अंतराळ संशोधन करणारी संस्था स्थापन केली.
81) इस्लाम – पाकिस्तान मधील मुख्यधर्म.
82) इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी.
83) ईल – पाण्याबाहेर जगु शकणारा मासा.
84) ईश्वरचंद्र विद्यासागर – विधवा विवाह कायद्याचे जनक.
85) उग्रसेन – कंसाचा पिता, मथुरेचा यादव राजा.
86) उटी – निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण.
87) उत्तरा – महाभारतातील अभिमन्यूच्या पत्नीचे नाव.
88) उत्साद इशा – ताजमहाल या वास्तुचा शिल्पकार.
89) उदयपूर – राजस्थान मधील शुभ्रनगरी शहर.
90) उमा भारती – मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
91) उर्मिला – रामायनातील लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव.
92) उल्हास – ठाणे जिल्ह्यातील सर्वात लांब नदी.
93) उस्मान ख्वाजा – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये सामील होणारा पहिला मुस्लीम खेळाडू.
94) ऋग्वेद – जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ. संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ.
95) एंडीज – पेरु या देशातील पर्वतरांग.
96) एटना – जगातले सर्वात क्रियाशील ज्वालामुखी.
97) एडवर्ड जेन्नर – लसीकरणाचा जनक.
98) एड्स – एलिसा चाचणी या रोगाचे निदान करण्यासाठी घेतली जाते.
99) एम्परर पेंग्वीन – जगातील सर्वात मोठा पेंग्वीन.
100) एस्बेस्टॉस – अग्नीत पेट न घेणारा पदार्थ.
101) ऐजॉल – मिझोरामची राजधानी.
102) ऐरावत – इंद्राच्या हत्तीचे नाव.
103) ऑक्सफर्ड – ‘ क्रिकेट ’ या शब्दाची पहिली नोंद या शब्दकोशात झाली.
104) ऑस्ट्रेलिया – कांगारुंचा देश.
105) ऑस्ट्रेलिया – जगातील सर्वात लहान खंड.
106) ओ – ‘ ह्या ’ रक्तगटाचे रक्त सर्वांना चालते.
107) ओक – या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात.
108) ओझर – अष्टविनायकांपैकी श्री विघ्नेश्वर गणेशाचे स्थान.
109) ओटावा – कॅनडाची राजधानी.
110) ओमेगा – ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर.
111) ओस्लो – नॉर्वेची राजधानी.
112) औरंगाबाद – जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या जिल्ह्यात आहे.
113) औरंगाबाद – बावन्न दरवाजांचे शहर.
114) औरंगाबाद – बिबीचा मकबरा येथे आहे.
115) औरंगाबाद – मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर.
116) औरंगाबाद – महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा.
117) औरंगाबाद – हिमरु शालींकरीता प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रारील ठिकाण.
118) कंदहार – अफगाणिस्तानमधील काबूलनंतरचे दुसरे महत्त्वाचे शहर.
119) कणाद – प्रत्येक वस्तू अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते हि संकल्पना या ऋषीने मांडली.
120) कन्याकुमारी – बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र यांचे संगमाचे ठिकाण.
121) कपाशी – या झाडाला ‘ सुर्याची कन्या ’ असे संबोधतात.
122) कपिल – सांख्य दर्शनाचा प्रवर्तक.
123) कपिल देव – १९८३ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.
124) कमला नेहरु – पं.जवाहरलाल नेहरुंच्या पत्नी, इंदिरा गांधींच्या माता.
125) कमळ – भारताचे राष्ट्रीय फुल.
126) करबुडे – आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा.
127) करिअप्पा – पहिले भारतीय सरसेनापती ‘ फील्ड मार्शल ‘ या पदाने सन्मानित.
128) करिकाल चोल – चोल राजवंशातील पहिला राजा.
129) कर्कवृत्त – भारताच्या मध्यातून हे वृत्त जाते.
130) कर्ण – भूमितीतील काटकोन त्रिकोणाच्या ९० अंशाच्या कोनासमोरील भूजा.
131) कर्ण – विवाहापूर्वी कुंतीला सूर्यापासून झालेला पुत्र.
132) कर्नाळा – महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य.
133) कल्ले – मासे या इंद्रियाद्वारे श्वसन करतात.
134) कळसुबाई – महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर.
135) कवरत्ती – लक्षद्वीपची राजधानी.
136) कवरत्ती – लक्षद्वीपमधील एकमेव मोठे शहर.
137) कांडला – भारतातील पहिला लाटांवर आधारीत विद्दुत प्रकल्प येथे आहे.
138) काकरापार – गुजरातमधील तापीनदीवरील धरण.
139) काकिनाडा – पुर्व गोदावरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेले आंध्रप्रदेशातील शहर.
140) काठमांडू – नेपाळची राजधानी.
141) कात – सापाच्या कातडीचा मृतपेशींचा थर.
142) कान्होपात्रा – जीच्या असामान्य सौंदर्यावर बिदरचा बादशहा लुब्ध झाला होता, मात्र त्यास युक्तीने टाळून विठ्ठल चरणी प्राणार्पण करणारी १५व्या शतकातील श्रेष्ठ कवयित्री.
143) काबूल – अफगाणिस्तानची राजधानी.
144) कामरु – आसामचे प्राचीन नाव.
145) कार्तिकेय – शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र, गणपतीचा भाऊ.
146) कार्बनडाय ऑक्साईड – आग विझविण्यासाठी वापरला जाणारा वायु.
147) कार्बनडाय ऑक्साईड – पृथ्वीच्या जागतीक तापमानवाढीस जबाबदार असलेला वायू.
148) कार्ल बेंज – जगातील पहिल्या स्वयंचलीत गाडीचे निर्माते.
149) कार्ल मार्क्स – दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक.
150) काला आम – पानिपतची तिसरी लढाई झाली ती जागा (हरियाणा राज्य).
151) कालिकत – देशातील पहिलं महिलांचं पोलिसस्थानक.
152) कालीदास – भारतीय शेक्सपीयर.
153) कालीया – यमुना नदीच्या डोहातील पंचमुखी नाग.
154) कावरती – लक्षद्वीप या संघराज्याची राजधानी.
155) किगाली – रवांडा या देशाची राजधानी.
156) किरण बेदी – भारतीय पोलीस सेवेत दाखल होणारी पहिली महिला.
157) किलोमीटर – अंतर मोजण्याचे एकक.
158) कुंती – पांडवांची माता.
159) कुंभकर्ण – लंकाधिपती रावनाचा कनिष्ठ भाऊ.
160) कुंभकोणम – भारतीय हरितक्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांचे तमिळनाडूतील जन्मस्थळ.

161) कुचिपुडी – आंध्रप्रदेशातील नृत्यशैली.
162) कुतुबमिनार – भारतातील सर्वात उंच मिनार.
163) कुबेर – पु.ल.देशपांडे यांनी भुमिका केलेला पहिला चित्रपट.
164) कुश – प्रभूरामांचा कनिष्ठ पुत्र.
165) कुशीनगर – भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ.
166) कुसुमाग्रज – कवी विष्णू वामण शिरवाडकर यांचे टोपण नाव.
167) कृपाचार्य – कौरवांचे गुरु.
168) कृष्ण – विष्णुचा आठवा अवतार.
169) कृष्णराजसागर – कावेरी नदीवरील (राज्य-कर्नाटक) धरण.
170) कृष्णराव धुळूप – महाराष्ट्रातील पहिले विरोधी पक्षनेते.
171) कॅनडा – क्षेत्रफळाने जगातील दुस-या क्रमांकाचा मोठा देश.
172) कॅनबेरा – ऑस्ट्रेलियाची राजधानी.
173) कॅलरी – आहाराचे मोजमाप या एककात होते, उष्णता मोजण्याचे एकक.
174) कॅलिफोर्निया – अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य.
175) केनिया – नैरोबी हि या राष्ट्राची राजधानी आहे.
176) केपलर – तात्विक भौतिकशास्त्राचा जनक.
177) केरळ – हे १९९३ रोजी सर्व खेड्यांत सार्वजनिक दूरध्वनीसेवा उपलब्ध करुन देणारे भारतातील पहिले राज्य ठरले.
178) केशवकुमार – कवी प्र. के. अत्रे यांचे टोपण नाव.
179) केशवसुत – कवी कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव.
180) केसरी – हिंदू पुराणानुसार हनुमानाचा पिता.
181) कैकयी – विधिवत सैनिकी शिक्षण मिळवणारी रामायणातील शुर महिला.
182) कैरो – इजिप्तची राजधानी.
183) कैलास – भगवान शंकराचे निवासस्थान.
184) कॉर्सिका – नेपोलियनची जन्म भूमी.
185) कोंगो – या देशाच्या राष्ट्रध्वजावर एके-४७ चे चित्र आहे.
186) कोकण – महाराष्ट्रातील हा विभाग प्राचीन काळी अपरांत म्हणुन ओळखला जात असे.
187) कोडूंगलूर – भारतातील पहिली मशीद केरळमध्ये येथे आहे.
188) कोणार्क – ओरिसा येथील सुर्यमंदिर.
189) कोनोक्री – गिनी या राष्ट्राची राजधानी.
190) कोपनहेगन – डेन्मार्कची राजधानी.
191) कोपरगाव – प्रसिद्ध शिर्डी मंदिर महाराष्ट्रातील या तालुक्यात आहे.
192) कोयना – महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र.
193) कोरकू – ही आदिवासी जमात मेळघाट डोंगररांगांमध्ये बहुसंख्येने राहते.
194) कोलंबस – अमेरिका खंडाचा शोध लावणारा इटालियन खलाशी.
195) कोलंबो – श्रीलंकेची राजधानी.
196) कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी.
197) कोलकाता – भारताचे हे शहर १९१२ पर्यंत केंद्रीय राजधानीचे होते.
198) कोहिमा – नागालॅंडची राजधानी.
199) कौशल्या – भगवान श्रीराम यांच्या आईचे नाव.
200) कौस्तुभ – भगवान विष्णुच्या गळ्यातील रत्न.
201) क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.
202) क्रांतीसिंह – नाना पाटील यांची उपाधी.
203) क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.
204) क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.
205) क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.
206) खंडी – २० मणाचे माप.
207) खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.
208) खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.
209) खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.
210) खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.
211) खैर – या झाडापासून कात मिळतो.
212) खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.
213) खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.
214) ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.
215) गंगटोक – सिक्कीमची राजधानी.
216) गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.
217) गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.
218) गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.
219) गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.
220) गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.
221) गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.
222) गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.
223) गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक उपशाखा.
224) गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.
225) गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.
226) गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.
227) गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.
228) गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.
229) गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.
230) गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.
231) गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.
232) गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.
233) गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.
234) गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.
235) गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.
236) गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.
237) गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.
238) गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.

239) गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.
240) गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.
241) गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.
242) गुलामगिरी – म.फुले यांनी अमेरिकन लोकांना अर्पण केलेला ग्रंथ.
243) गुस्ताव आयफेल – जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची निर्मिती करणारे शिल्पकार.
244) गॅनीमिड – हा सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे.
245) गॅलिलिओ – हवेला वजन असते असे याने सिद्ध केले.
246) गेंजी मोनोगातारी – जपानी लिपीतील पहिली कादंबरी.
247) गोंदिया – महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा.
248) गोदावरी – जायकवाडी प्रकल्प या नदीवर आहे.
249) गोदावरी – महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.
250) गोपाळ गणेश आगरकर – यांना जिवंतपणातच आपली प्रेत यात्रा पाहावी लागली.
251) गोपाळकृष्ण गोखले – गांधीजींचे राजकीय गुरु.
252) गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.
253) गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.
254) गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.
255) गोविंद – बुटक्या तांदळाची जात.
256) ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.
257) ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.
258) ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.
259) ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.
260) ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.
261) ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.
262) घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.
263) घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.
264) घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.
265) घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.
266) घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.
267) चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.
268) चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.
269) चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.
270) चंद्रपुर – महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण.
271) चंद्रपूर – हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण आहे.
272) चार्लस् डार्विन – याने पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
273) चित्रगुप्त – यमाच्या दरबारातील मानवाच्या पाप-पुण्याचा हिशोबनीस.
274) चिपरीपेटा – सक्तीची पहिली शिक्षणाची शाळा या ठिकाणी शाहू महाराजांनी सुरु केली.
275) चेरापुंजी – भारतातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश.
276) चैत्यभुमी – डॉ. आंबेडकर यांची समाधी येथे आहे.
277) चैत्र – हा महिना लिप ईयर वर्षात २२ मार्च ऐवजी २१ मार्चला सुरु होतो, त्यामुळे हा लिप वर्षात ३१ दिवसांचा होतो.
278) चोंडी – अहमदनगर जिल्हयातील अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थळ.
279) जनक – सीतेच्या वडीलांचे नाव.
280) जनार्दनस्वामी – संत एकनाथांचे गुरु.
281) जपान – उगवत्या सुर्याचा देश.
282) जयदेव – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी.
283) जयपूर – भारतातील गुलाबी शहर.
284) जयपूर – हवामहल या शहरात आहे.
285) जवाहरलाल नेहरु – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
286) जहागीर – इंग्रजांना व्यापारी सवलती देणारा पहिला मोगल सम्राट.
287) जांभळा – इंद्रधनुष्यातला सर्वात खालचा, शेवटचा रंग.
288) जिओव्हानी आग्रेली – फियाट या मोटार कंपनीचे संस्थापक.
289) जिनिव्हा – गॅटचे मुख्यालय येथे आहे.
290) जिनीव्हा – जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय येथे आहे.
291) जिराफ – केवळ याच्याच पिलांना जन्मतःच शिंग असतात.
292) जिल्हा परिषद – पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्थर.
293) जीभ – मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू.
294) जेम्स प्रिन्सेप – भारतीय नाणी शास्त्राचे जनक.
295) जेम्स मॅडिसन – अमेरिकेच्या राज्यघटनेचे जनक.
296) जेम्स रॉस – उत्तर चुंबकीय धृव शोधून काढणारा ब्रिटीश नौदल अधिकारी.
297) जेम्स लेन – शिवाजी द हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकाचा लेखक.
298) जॉन गॉरी – रेफ्रिजरेटरचा शोध या अमेरिकन संशोधकाने लावला.
299) जॉन स्पेक – नाईल नदीचा उगम शोधून काढणारा शोधक.
300) जॉन स्मिथ – व्हर्जिनियाचा संस्थापक.
301) जॉर्ज वॉशिंगटन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष.
302) जोन्स साल्क – पोलिओची लस यांनी शोधून काढली.
303) जोसेफ मॅझिनी – सावरकर यांना गुरु मानत होते.
304) जोहानेस एसमार्ग – फिरत्या दवाखान्याची कल्पना सर्वप्रथम यांनी मांडली.
305) ज्ञानपीठ – भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार.
306) ज्ञानपीठ पुरस्कार – भारतातील साहित्यक्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार.
307) ज्ञानप्रकाश – मराठी भाषेतील पहिले दैनिक वृत्तपत्र.
308) ज्युलियन असांज – विकीलीक्स या प्रसिद्ध वादग्रस्त संकेतस्थळाचा संस्थापक.
309) ज्वरमापी – शरीराचे तापमान मोजण्य़ाचे उपकरण.
310) ज्वारी – सातारा जिल्ह्यातील प्रमुख पिक.
311) झारखंड – भारताचे २८ वे घटक राज्य.

312) झिप – डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर.
313) झिम्बाब्वे – हरारे हि या राष्ट्राची राजधानी आहे.
314) झेलम नदी – पंजाबमधील सर्वात पश्चिमेला असलेली नदी.
315) टंगस्टन – इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरला जाणारा धातू.
316) टायटन – शनीचा सर्वात मोठा उपग्रह.
317) टासमन – न्यूझीलंडचा शोध लावणाला डच खलाशी.
318) टेक्सास – अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य.
319) टेम्स – इंग्लंड हे शहर या नदीतीरावर वसलेले आहे.
320) टोकियो – जपानची राजधानी.
321) टोरॉन्टो – कॅनडाची आर्थिक राजधानी.
322) ड – सुर्य किरणांपासून मिळणारे जीवनसत्व.
323) डाऊन्स – ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश.
324) डार्डानेल्स – इंग्लंड व तुर्कस्थान या मधील सामुद्रधुनी.
325) डी – जगातील सर्वात लहान नाव असलेली नदी.
326) डीमॉस – मंगळाचा नैसर्गिक उपग्रह.
327) डॅनिअल विल्सन – प्रागेतिहास( Pre-history ) या संज्ञेचा प्रथम वापर करणारा संशोधक.
328) डॅनियल रॅडक्लिफ – हॅरीपॉटरची भुमिका करणारा ब्रिटीश बालकलावंत.
329) डेसिबल – ध्वनी मोजण्याचे एकक.
330) डॉल्फीन – भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी.
331) डोडोमा – टांझानिया देशाची राजधानी.
332) ड्रेक – या उद्योजकाने १८५७ साली जगातील पहिली तेलविहीर खोदून काढली.
333) ढाका – बांगला देशची राजधानी.
334) तक्ष – दशरथपुत्र भरताचा पुत्र, तक्षशिलानगरीचा संस्थापक.
335) तपांबर – सजीवसृष्टीस पोषक आणि अनुकूल असणारा वातावरणाचा स्थर.
336) ताडोबा – चंद्रपूर मधील राष्ट्रीय उद्यान.
337) तापमापी – वस्तुचे तापमान मोजण्याचे उपकरण.
338) तामिळनाडू – मीनाक्षी मंदीर या राज्यात आहे.
339) तारापूर – भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र येथे सुरु झाले.
340) ताराबाई मोडक – भारतीय बालशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक.
341) ताराबाई शिंदे – मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार.
342) तिरुपती – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान.
343) तुती – तलम रेशीम देणारे किडे या वनस्पतीवर वाढतात.
344) तुर्भे – भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प येथे आहे.
345) तुळजापूर – शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर येथे आहे.
346) तेरेखोल – कोकणातील अगदी दक्षिणेला असणारी नदी.
347) तेलगू – आंध्रप्रदेशात बोलली जाणारी भाषा.
348) तेहरान – इराणची राजधानी.
349) तोडा – निलगिरी पर्वतावरील आदिवासी जमात.
350) त्रिवेंद्रम – तिरुवनंतपुरम या शहराचे जुने नाव.
351) थर – भारतातील सर्वात मोठे वाळवंट.
352) थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
353) थायलंड – बॅंकॉक ही या देशाची राजधानी आहे.
354) थेम्स – लंडन हे शहर या नदीकाठी वसले आहे.
355) थॉमस पेन – महात्मा फुले यांच्यावर ह्या विचारवंताचा प्रभाव होता.
356) दक्षता – पोलीस खात्यातर्फे चालविले जाणारे मासिक.
357) दक्षिण – कन्याकुमारी भारताच्या या दिशेला आहे.
358) दमणगंगा – कोकणातील अगदी उत्तरेला असलेली नदी.
359) दमयंती – पौराणिककाळातली नल राजाची पत्नी.
360) दमागास्कर – जगातील सर्वात प्राचीन शहर.
361) दर्पण – मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र.
362) दशरथ – कौसल्या, सुमित्र व कैकयी यांचा पती.
363) दादाभाई नवरोजी – ब्रिटीश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय.
364) दादाभाई नवरोजी – भारताचे पितामह.
365) दादासाहेब फाळके – भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक.
366) दादोबा पांडुरंग – मराठी भाषेचे पाणिनी.
367) दापोली – कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.
368) दिनार – इराकचे चलन.
369) दिल्ली – जंतरमंतर … येथे आहे.
370) दिसपूर – आसामची राजधानी.
371) दीक्षाभुमी – जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप.
372) दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंघटनेचे मुख्यालय येथे आहे.
373) दुबई – एसी बस थांबे असणारे जगातील पहिले शहर.
374) दुर्गा खोटे – मराठी चित्रपटातील पहिली नायिका.
375) दुर्योधन – महाभारतकालीन हस्तीनापुरचा आंधळा राजा. कौरवांचा मोठा भाऊ.
376) दुल्टी – भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना.
377) देकार्त – जगाच्या यांत्रिक कल्पनेचा जनक.
378) देवकी – श्रीकृष्णाची माता.
379) देवदार – भारतातील सर्वात उंच वृक्ष.
380) देवदार – हिमालयात आढळणारा हा वृक्ष भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे.
381) देवदास गांधी – म. गांधींचे हे पुत्र हिंदूस्थान टाईम्सचे संपादक होते.
382) देहू – संत तुकाराम महाराजांची समाधी या ठिकाणी आहे.
383) दोनाता – मार्को पोलो याच्या पत्नीचे नाव.
384) दोहा – कतार या देशाचे सर्वात मोठे शहर.
385) दोहा – कतारची राजधानी.
386) द्रोणागिरी – हनुमानाने उचललेला पर्वत.
387) धर्मराज – पांडवांतील सर्वात जेष्ठ बंधू.
388) धीरुभाई अंबानी – रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक.
389) धूपगड – सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर.
390) धौली – सम्राट अशोकाचा शिलालेख उडिसा राज्यात या ठिकाणी आहे.
391) नंद – श्रीकृष्णाचा पालनकर्ता पिता.
392) नंदिनी सत्पथी – ओडीसाची पहिली महिला मुख्यमंत्री.
393) नकुल – पांडवांपैकी अश्वविद्या जाणणारा.
394) नथुराम गोडसे – याने म.गांधीची हत्या केली.
395) नयन भडभडे – अभिनेत्री रीमा लागू यांचे मूळ नाव.
396) नरेंद्रनाथ – स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव.
397) नर्मदा – भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी.
398) नल – निषधदेशचा विख्यात राजा, दमयंतीचा पती.
399) नवाश्म – चाकाचा शोध या युगात लागला.
400) नाईल – जगातील सर्वात लांब नदी.
401) नाग – हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे.
402) नागपुर – महाराष्ट्राची उपराजधानी.
403) नागपूर – महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर.
404) नागार्जुनसागर – आंध्रप्रदेश येथे कृष्णा नदीवर जलसिंचन व विद्युतनिर्मितीसाठी बांधलेले प्रसिद्ध धरण.
405) नागासाकी – जपानमधील लोखंड व पोलादाच्या कारखाण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण.
406) नाणेघाट – देश व कोकण यांना जोडणारा सातवाहनकालीन प्राचीन घाट.
407) नाबार्ड – कृषी तथा ग्रामीन गरजांसाठी कर्जाची देखभाल करणारी संस्था.
408) नामिबिया – विंडहॉक हि या देशाची राजधानी आहे.
409) नायट्रस ऑक्साइड – मनुष्याला हसविणारा वायू.
410) नायडू सी. के. – भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार.
411) नालंदा – गुप्तकालीन जगप्रसिद्ध बौद्धविद्यापीठ.
412) नाशिक – महाराष्ट्रात कुंभमेळा येथे भरतो.
413) नाशिक – रामायणकालीन किष्किंधा म्हणजे सध्याचे …हे शहर.
414) नासा – अंतराळ संशोधन करणारी अमेरीकेची संस्था.
415) निकोलो पोलो – मार्को पोलो याचे वडील.
416) निखील चक्रवर्ती – प्रसारभारतीचे पहिले अध्यक्ष.
417) नील नदी – ही गरम पाणी असलेली नदी आहे.
418) नूक – ग्रीनलंडची राजधानी.
419) नूरजहान – जहांगीर बादशहाच्या राणीचे नाव.
420) नेपाळ – एकमेव हिंदूराष्ट्र.
421) नेपाळ – जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट या देशात आहे.
422) नेफा – अरुणाचल प्रदेशचे जुने नाव.
423) नेवासा – येथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला.
424) नैरोबी – केनियाची राजधानी शहर.
425) नॉर्वे – जगातील सर्वाधिक कर असलेला देश आहे.
426) नोबेल पारीतोषिक – जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार.
427) पंजाब – भारतातील सर्वात संपन्न राज्य.
428) पंजाब – वाघा बॉर्डर या राज्यात आहे.
429) पचमढी – मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी.
430) पटना – बिहारची राजधानी.
431) पठार – उंच भागातील सपाट प्रदेश.
432) पणजी – गोवा या राज्याची राजधानी.
433) परम – पहिला भारतीय सुपर कॉम्प्युटर.
434) परमवीरचक्र – भारतातील सर्वात मोठे पदक.
435) परळी वैजनाथ –. बारा ज्योतिर्लिंगांपैकी बीड येथील जोतिर्लिंग.
436) पराशर – महाभारतकर्ता व्यास यांचा पिता.
437) पवनचक्की – वा-यापासून वीज मिळविण्याचा प्रदुषण विरहीत मार्ग.
438) पस्तिस – महाराष्ट्रातील जिल्ह्याची संख्या.
439) पाकोळी – सर्वात वेगवान उडणारा पक्षी.
440) पाच – ऑलिंपीक ध्वजावरील कड्यांची संख्या.
441) पाच – महाराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या जिल्ह्यांची संख्या.
442) पाटलीपुत्र – सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव.
443) पारसी – नवरोज सन हा या धर्माच्या नविन वर्षात येतो.
444) पारा – एकमेव द्रवरुप धातू.
445) पारा – थर्मामीटर मध्ये चमकणारा पदार्थ.
446) पाली – गौतम बुद्धाने आपले तत्त्वज्ञान या भाषेत सांगितले आहे.
447) पावसाळा – कोकणातील शेतक-यांसाठी महत्वाचा ऋतु.
448) पास्कल – दाबाचे एकक.
449) पितळखोरा – भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांचा समुह (जि.औरंगाबाद).
450) पुणे – देशातील पहिले क्रीडा साहित्य संमेलनाचे स्थळ.
451) पुर्णा – अकोला जिल्ह्याची मुख्य नदी.
452) पृथ्वी – सुर्यमालेतील तिसरा ग्रह.
453) पृथ्वी – सुर्यमालेतील सुर्यापासुनचा तिसरा ग्रह.
454) पॅरिस – आंतरराष्ट्रीय वाईन संघटनेचे मुख्यालय येथे आहे.
455) पॅरिस – फ्रान्सची राजधानी.
456) पॅरीस – आयफेल टॉवर या शहरात आहे.
457) पॅसिफिक – सर्वाधिक खोली असणारा महासागर.
458) पेसेटा – स्पेनचे चलन.
459) पेसो – चिलीचे चलन.
460) पोखरण – भारतातील पहिली अणुस्पोट चाचणी.
461) पोरबंदर – महात्मा गांधींचे जन्मस्थळ.
462) पोर्टब्लेअर – अंदमान-निकोबारची राजधानी
463) पोलास्का – पोलंडचे मुळ राष्ट्रीय नाव.
464) पोलो – जगातील सर्वात जुना खेळ.
465) प्रताप हायस्कुल – साने गुरुजींनी या शिक्षणसंस्थेत अध्यापन केले.
466) प्रवरा – नेवासे, संगमनेर ही गावे … या नदीकाठी वसलेली आहेत.
467) प्रशांत महासागर – पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठे महासागर.
468) प्रिटोरिया – दक्षिण आफ्रिकेची राजधानी.
469) प्रितीसंगम – महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम.
470) प्रिस्टले – याने ऑक्सिजन या वायुचा शोध लावला.
471) प्रेमसन्यास – राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक.
472) प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह.
473) प्लुटो – सुर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह.
474) फर्डिनंड मॅगेलन – पृथ्वीप्रदक्षिणा घालणारा पहिला शोधक प्रवासी.
475) फिनलंड – जगातील सर्वाधिक सरोवरे या देशात आहेत.
476) फिनलंड – सरोवरांचा देश.
477) फिलीपाईन्स – रॅमन मॅगसेसे पुरस्कार या देशाकडुन दिला जातो.
478) फुफ्फुस – क्षय हा रोग या अवयवाचा आहे.
479) फुफ्फुस – रक्त शुद्धीकरणाचे काम करणारा अवयव.

480) फॅट मॅन – अमेरिकेने १९४५ रोजी नागासाकी या शहरावर (जपान) टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव.
481) फॅदम – समुद्राची खोली साधारणतः या परिमाणात मोजतात.
482) फॅबियन बेलिंगशॉसेन – अन्टार्क्टिका खंडावर जाणारा सर्वप्रथम दर्यावर्दी.
483) फ्रान्सिस बेकन – विगमन तर्कशास्त्राचा जनक.
484) फ्रॅंकलिन – आकाशात विज असते हे याने सिद्ध केले.
485) बंगळूर – कर्नाटकची राजधानी.
486) ब – खाण्याचा सोडा वापरल्यास अन्नातील या जीवनसत्वाचा नाश होतो.
487) ब – गाजरामध्ये हे जीवनसत्त्व असते.
488) बगदाद – इराकची राजधानी.
489) बचेंद्री पाल – माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला.
490) बर्थप्लेस – शेक्सपिअरचे जन्मघराचे नाव.
491) बर्न – स्वित्झर्लंडची राजधानी.
492) बर्लिन – जर्मनीची राजधानी.
493) बहत – थायलंडचे चलन.
494) बहारिन – मोत्याचे बेट.
495) बांग्लादेश – या देशाबरोबर भारताची सीमारेषा सर्वात लांब आहे.
496) बांबू – जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती.
497) बा – कस्तुरबा गांधीचे टोपण नाव.
498) बाबर – याने भारतात मोगल सत्तेची स्थापना केली.
499) बाबा आमटे – मानवतेच्या दृष्टीकोनातून कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती.
500) बाबाजीराजे भोसले – भोसले राजवंशाचे संस्थापक.
501) बामियान – तालिबानने नष्ट केलेल्या बुद्धाचा पुतळा.. येथे आहे.
502) बारामती – महाराष्ट्रात कृतिम पावसाचा प्रयोग प्रथम या परिसरात करण्यात आला.
503) बार्तोलोमो डायस – आफ्रिकेला वळसा घालणारा सर्वप्रथम पोर्तुगीज दर्यावर्दी.
504) बिवा – जपानमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर.
505) बिशप रॉक – ब्रिटनजवळ …. हे जगातील सगळ्यात लहान बेट आहे.
506) बिस्मार्क ऑटो व्हॉन – आधुनिक जर्मनीचा शिल्पकार.
507) बिहार – भारतात कोळशाचे उत्पादन सर्वाधिक या राज्यात होते.
508) बिहू – आसाममधील लोकनृत्य.
509) बी – कवी नारायण मुरलीधर गुप्ते य़ांचे टोपण नाव.
510) बुडापेस्ट – हंगेरीची राजधानी.
511) बुलढाणा – खा-या पाण्याचे लोणार सरोवर या जिल्ह्यात आहे.
512) बॅरिस्टर अंतुले – यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे केले.
513) बेंजामिन – जगातील पहिला युरोपियन शोधक प्रवासी.
514) बेडुक – एक उभयचर प्राणी.
515) बेथलहेम – येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान(पॅलेस्टाइन).
516) बेल्जियम – युरोपची रणभूमी.
517) बेसाल्ट – महाराष्ट्राचे पठार या खडकांनी बनलेले आहे.
518) बैकल – सर्वात खोल सरोवर.
519) बॉक्साईट – हा अल्युमिनीअमचा मूळखनिज धातू आहे.
520) ब्राझील – दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश.
521) भंडारा – महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा.
522) भरत – दुष्यंत व शकुंतला याच्या या पुत्राच्या नावावरुन भारताला भारत हे नाव पडले.
523) भरतपूर – राजस्थान मधील राष्ट्रीय ( पक्षी ) उद्यान.
524) भांगडा – पंजाबमधील लोकनृत्य.
525) भानूदास महाराज – कृष्णदेवरायाचे मन परिवर्तन करुन यांनी विठ्ठलाची मुर्ती पंढरपूला आणली.
526) भानूदास महाराज – संत एकनाथ यांचे आजोबा.
527) भारत – आयुर्वेदाचा उगम या देशात झाला.
528) भारत – जगातील सर्वात जास्त भाषा बलणारा देश.
529) भारत – शुन्याचा शोध या देशात लागला.
530) भारतरत्न – भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
531) भीमबेटका – मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे पाषानयुगातील भीत्तीचित्रे मध्यप्रदेशातील या ठिकाणी आहेत.
532) भीमाशंकर – भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे येथील ज्योतिर्लिंग.
533) भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी.
534) मंगळ – तांबड्या रंगाचा ग्रह.
535) मंगळ – लाल ग्रह.
536) मंगो पार्क – पश्चिम आफ्रिकेचा शोध याने लावला.
537) मंदोदरी – रावणाला सन्मार्गावर आणणारी श्रेष्ठ पतिव्रता.
538) मणिपुरी – मणिपुर राज्याचे लोकनृत्य.
539) मथुरा – श्रीकृष्णाची जन्मभूमी.
540) मदुराई – मीनाक्षी मंदिर येथे आहे.
541) मद्रास – चेन्नईचे जुने नाव.
542) मध – हा एकमेव असा अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही.
543) मध्य प्रदेश – छत्तीसगड हे राज्य़ ह्या राज्यापासुन निर्माण करण्यात आले.
544) ममता बॅनर्जी – बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
545) मराठवाडा – महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग.
546) मराठी – महाराष्ट्राची राजभाषा.
547) मलेरिया – डास चावल्याने होणारा रोग.
548) मल्याळम – केरळ राज्याची बोलीभाषा.
549) महंमद बीन कासिम – भारतात आलेला पहिला मुस्लीम.
550) महदंबा – मराठी वाङ्मयातील पहिली आद्य कवयित्री.
551) महाड – चवदार तळ्याचा सत्याग्रह या शहरात झाला.
552) महाड – रायगड किल्ला या तालुक्यात आहे.
553) महादेव गोविंद रानडे – हिंदी अर्थशास्त्राचे जनक.
554) महाराष्ट्र – पोलिसदलात महिलांची नेमनूक करणारे भारतातील पहिले राज्य.
555) महाराष्ट्र – भारतातील सर्वप्रथम फिरती न्यायालये स्थापन करणारे पहिले राज्य.
556) महाराष्ट्र – माहितीचा अधिकार कायदा प्रथम पारित करारे राज्य.
557) महाराष्ट्रीय ज्ञानकोश – मराठीतील पहिला ज्ञानकोश.
558) महेंद्रसिंह धोनी – २०११ चा विश्वचषक जिंकणा-या भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार.

559) महेश दास – बिरबल हा सम्राट अकबरच्या नवरत्नांपैकी एक, त्याचे खरे नाव.
560) माऊंट ब्लॅक – आल्प्स पर्वतातील सर्वात उंच शिखर.
561) माथेरान – रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.
562) मादाम कामा – भारताचा राष्ट्रीय ध्वज यांनी तयार केला.
563) मानाचं पान – कुस्तीगीरांच्या जीवनावरील पहिला मराठी चित्रपट.
564) मार्क – जर्मनीचे चलन.
565) माले – मालदीव बेटांची राजधानी.
566) माहूर – साडेतीन पीठांपैकी रेणुकादेवीचे मंदिर येथे आहे.
567) मिथेन – गोबर गॅस, बायो गॅस मध्ये असणारा वायु.
568) मिथेन – या वायुला मॉर्श गॅस असे म्हणतात.
569) मिदनापोर – पश्चिम बंगालमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
570) मिलिबार – वायुदाबकाद्वारे वायुदाबकाचे मापन या परिमाणात करतात.
571) मिहीर सेन – इंग्लीश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय.
572) मुंबई – भारताचे पॅरिस.
573) मुंबई – भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर.
574) मुंबई – भारतात सर्वप्रथम समाजकार्य शिक्षण संस्था येथे सुरु झाली.
575) मुंबई – भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.
576) मुक्ताबाई – मराठी भाषेतील ताटीचे अभंग हिने लिहीले.
577) मुखबानी – गुरुग्रंथसाहेब मध्ये संत नामदेववांची निवडक हिंदी वाणी …. या विशेषणाने सामा विष्टकरण्यात आली आहे.
578) मुरासाकी शिकिबु – जगातील सर्वप्रथम कादंबरीकार लेखिका.
579) मुळा – खडकवासला प्रकल्प या नदीवर आहे.
580) मूकनायक – बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले पाक्षिक.
581) मॅकमिलन – सायकलचा शोध याने लावला.
582) मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलिया खंडाचा शोधक.
583) मॅथ्यु फ्लिंडर्स – ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर नदी, फ्लिंडर पर्वत व फ्लिंडर बेट हे याच्या नावाने प्रसिद्ध आहेत.
584) मेंडेलिफ दामित्री – आवर्तसारणीचे संशोधक.
585) मेघनाद – ईंद्रजीत, रावणाचा पुत्र.
586) मेघालय – चेरापुंजी, शिलॉंग हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.
587) मेटसॅट – भारताचा पहिला अर्पण केलेला हवामान उपग्रह.
588) मेडल ऑफ फ्रिडम – अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार.
589) मेयो – आर्थिक विकेंद्रिकरणाचा जनक.
590) मोझरी – संत तुकडोजी महाराजजंची समाधी येथे आहे.जि. अमरावती.
591) मोर – भारताचा राष्ट्रीय पक्षी.
592) म्हैसुर – भारतात कृत्रिम रेतनाचा प्रयोग सर्वप्रथम येथे करण्यात आला.
593) यकृत – कावीळ रोगात या शरीराच्या भागावर परिणाम होतो.
594) यकृत – शरीरातील सर्वात मोठा अवयव.
595) यक्षगान – कर्नाटकातील नृत्यप्रकार.
596) यमुना – ताजमहल या नदीकाठी आहे.
597) यवतमाळ – पांढरे सोने पिकविणारा जिल्हा.
598) यशवंतराव – शाहू महाराजांचे मूळ नाव.
599) यशवंतराव चव्हान – स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री.
600) यशोदाबाई – साने गुरुजींच्या आईचे नाव.
601) युआन – चीनचे चलन.
602) युरी गागरीन – जगातील पहिला अवकाशयात्री.
603) युरेनस – शनी प्रमाणेच याही ग्रहास कडी आहेत.
604) युरेशिया – युरोप आणि आशिया या खंडांना संयुक्त शब्द.
605) युरो – युरोपचे चलन.
606) युवराज सिंग – विश्वकप क्रिकेट २०११ चा ऑफ द टूर्नामेंट.
607) येन – जपानचे चलन.
608) रझिया बेगम – दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली मुस्लीम महिला.
609) रणजित देसाई – ‘श्रीमान योगी’ या कादंबरीचे लेखक.
610) रत्नागिरी – गणपतीपुळे या तालुक्यात आहे.
611) रत्नागिरी – महाराष्ट्रातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा.
612) रशिया – क्षेत्रफळच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश.
613) रशिया – दोन डोक्यांचा गरुड … या देशाचा प्रतिनीधित्व करतो.
614) राकेश शर्मा – भारताचा पहिला अंतराळयात्री.
615) राजघाट – म.गांधींचे समाधी स्थळ.
616) राजघाट – महात्मा गांधीचे समाधीस्थळ.
617) राजनारायण – कुटुंबनियोजनाला ‘कुटुंबकल्याण’ हे नाव यांनी दिले.
618) राजस्थान – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातिल सर्वात मोठे राज्य.
619) राजस्थान – पंचायतराज व्यवस्था स्विकारणारे भारतातील पहिले राज्य.
620) राजस्थान – भरतपुर राष्ट्रीय उद्यान – पक्षी या राज्यात आहे.
621) राजस्थान – माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण या राज्यात आहे.
622) राजा रामण्णा – भारताच्या पहिल्या अणुस्पोटाचे शिल्पकार.
623) राजाराम मोहन रॉय – आधुनिक भारताचा जनक.
624) राजीव गांधी – भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते.
625) राणीगंज – भारतातील पहिली दगडी कोळशाची खाण.
626) राबडी देवी – बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
627) राम – रामायणकालीन अयोध्येचा राजपुत्र.
628) रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद यांचे गुरु.
629) रामचरितमानस – संत तुलसीदास यांचा सर्वात महत्वाचा व लोकप्रिय ग्रंथ.
630) रामटेक – कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे.
631) रामराज्य – गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेला एकमेव चित्रपट.
632) रामायण – वाल्मीकऋषींनी रचलेला हिदूधर्मातील पवित्र ग्रंथ.
633) रामेश्वर भट – संत तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणीत बुडविण्याची शिक्षा देणारे.
634) रामेश्वरम – डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जन्मगाव.
635) रायगड – छ. शिवाजी महाराजांचा मृत्यू येथे झाला.
636) रायगड – महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा.
637) रायगड – या जिल्ह्याचे पुर्वीचे नाव कुलाबा होते.
638) रावण – रामायणकालीन लंकेचा राजा.
639) रावी – पाकिस्तानचे लाहोर हे शहर या नदीवर वसले आहे.
640) रासबिहारी बोस – आझाद हिंद सेनेचे संस्थापक.
641) रिझर्व बॅंक – या बॅंकेत आपण वैयक्तीक खाते उघडू शकत नाही.
642) रिझर्व्ह बॅंक – हि बॅंक देशातील इतर बॅंकांवर नियंत्रण ठेवते.
643) रिपन फॉल्स – जॉन स्पेक यांच्या माहितीनुसार नाईल नदी या ठिकाणी उगम पावते.
644) रिपब्लिकन पार्टी – अब्राहम लिंकन यांनी स्थापन केलेली पार्टी.
645) रियाध – सौदी अरेबियातील सर्वात मोठे शहर.
646) रियाल – कतार या देशाचे चलन.
647) रुपया – इंडोनेशियाचे चलन.
648) रुबल – रशियाचे चलन.
649) रुस्टीचेल्लो – मार्को पोलो याची प्रवास वर्णने ‘डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड’ या नावाने शब्दबद्ध करणारा लेखक.
650) रॅफ्लेशिया – जगातील सर्वात मोठे फूल.
651) रेगुर – महाराष्ट्रात आढळणारी मृदा.
652) रेडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी लोखंडाच्या खाणी आहेत.
653) रेणू – अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असणारा घटक.
654) रेबीज – कुत्रा चावल्याने हा रोग होतो.
655) रेयॉन – सेल्युलोजपासून तयार होणारा धागा.
656) रेस्पिरेटर – कृत्रिम श्वसन घडवून आणणारे उपकरण.
657) रॉटरडॅम – नेदरलॅंड मधील जगप्रसिद्ध बंदर.
658) रॉबर्ट पिअरी – उत्तर धृवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव.
659) रॉबर्ड क्लाईव्ह – १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धतीची सुरुवात याने केली.
660) रोम – इटलीची राजधानी.
661) रोम – सर्कशींची सुरुवात या देशात झाली.
662) रोम – सात टेकड्यांचे शहर.
663) लंडन – इंग्लंड ची राजधानी.
664) लंडन – पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.
665) लंडन – सर्वात पहिली भुयारी रेल्वे या शहरात सुरु झाली.
666) लक्ष्मण – रामाचा सावत्र भाऊ.
667) लक्ष्य – भारताचे पहिले चालकविरहीत विमान.
668) लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी.
669) लागोस – नायजीरियातील सर्वात मोठे शहर.
670) लामा – तिबेटमधिल बौद्धभिक्षू.
671) लाला लजपतराय – अन् हॅपी इंडीया या पुस्तकाचे लेखक.
672) लिटल बॉय – अमेरिकेने १९४५ रोजी हिरोशिमा या शहरावर (जपान) टाकलेल्या णुबॉम्बचे नाव.
673) लिट्टे – राजीव गांधींची हत्या बॉंम्बस्पोटात घडवून आणनारी संघटना.
674) लिरा – इटलीचे चलन.
675) लिरो – टर्की(तुर्कस्थान) चे चलन.
676) लिस्बन – पोर्तुगालची राजधानी.
677) लीफ एरिकसन – याने ग्रीनलंड मध्ये सर्वप्रथम युरोपियन वसाहत स्थापन केली.
678) लीलावती – गणितज्ञ भास्कराचार्यांचा गणितशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ.
679) लीळा चरित्र – मराठी वाङ्मयातील पहिला गद्य चरित्र ग्रंथ.
680) लुई पाश्चर – रॅबीजच्या जंतूंचा शोध याने लावला.
681) लुईस ब्राउन – पहिली टेस्टट्युब बेबी.
682) लू – उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण वारे.
683) लॅक्टोज – या घटक द्रव्यामुळे दुध गोड लागते.
684) लेनिन – रशियन क्रांतीचा जनक.
685) लेनिन – रशियन क्रांतीचा शिल्पकार.
686) लॉर्ड एल्फिन्स्टन – मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर.
687) लॉर्ड कर्झन – पोलीस कमिशनची स्थापना याने केली.
688) लॉर्ड कॅनिंग – हे भारताचे पहिले व्हॉईसरॉय होते.
689) लॉर्ड डलहौसी – भारतात रुपयाची सुरुवात याने केली.
690) लॉर्ड बेटिंग – सतीच्या चालीवर याने बंदी आणली.
691) लॉर्ड मेकॉले – याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
692) लॉर्ड रिपन – स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक.
693) लॉर्ड्स – क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचा सर्वात प्रथम वापर होणारे मैदान.
694) लॉस एंजेल्स – कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर.
695) लोकमान्य टिळक – भारतीय असंतोषाचे जनक.
696) ल्हासा – जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ.
697) वडोदरा – गुजरातमधील या शहरास सयाजी नगरी या नावानेही ओळखले जाते.
698) वर्धा – महाराष्ट्रात .. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.
699) वर्धा – महाराष्ट्रात संपुर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा.
700) वसुंधरा राजे – राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
701) वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.
702) वाघ – भारताचा राष्ट्रीय प्राणी.
703) वायव्य – महाराष्ट्र राज्याच्या नकाशात नंदुरबार जिल्हा या दिशेला येतो.
704) वाल्मीक – रामायण या संस्कृत महाकाव्याचा जनक.
705) वाळू – काच बनविण्यासाठी आवश्यक असणारा घटक.
706) वासंती – मराठी चित्रपटातील पहिली बालनटी.
707) विंटहूक – नामिबिया देशाची राजधानी.
708) विकीलीक्स – संवेदनशील परंतु अधिकृत माहिती प्रसिद्ध करत वादग्रस्त ठरलेली ज्युलियन असांज यांची वेबसाईट.
709) विक्रम साराभाई – भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार.
710) विक्रांत – भारताच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे नाव.
711) विजयघाट – लालबहादुरशास्त्री यांचे समाधीस्थळ.
712) विजापुर – गोल घुमट या शहरात आहे.
713) वितल – सप्तपाताळांपैकी दुसरे.
714) विद्युतघट – रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत किंवा विद्युत शक्तीचे रासायनिक शक्तीत रुपांतर करणारे साधन.
715) विधानपरिषद – संसदेचे वरिष्ठ सभागृह.
716) विधानसभा – संसदेचे कनिष्ठ सभागृह.
717) विनोबा भावे – गितीई या ग्रंथाचे लेखक.
718) विनोबा भावे – पहिले वयक्तिक सत्याग्रही.
719) विराट – भारताची पहिली विमानवाहू नौका.
720) विल्यम बॅफिन – रेखांशाची गणना करणारा पहिला दर्यावर्दी.
721) विल्यम वॉर्ड – बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना याची होती.
722) विवेकसिंधु – मराठी वाङ्मयातील पहिला ग्रंथ.
723) विशाखा – कवी कुसूमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह.
724) विशाखापट्टणम – भारतातील पहिले जहाजबांधणी केंद्रस्थळ.
725) विशालगड – इतिहास कालीन पावनखिंड या गडाजवळ आहे.
726) विश्वकर्मा – देवांचा शिल्पकार, ब्रम्हदेवाचा पुत्र.
727) विश्वामित्र – श्रीरामाचा प्रचंड धनुष्यबाण याने बनविला होता.
728) विश्वास पाटील – पानिपत, संभाजी आदी कादंबरींचे लेखक.
729) विषुवदिन – रात्र १२ तासांची व दिवस १२ तासांचा असतो तो दिवस.
730) विष्णुदास भावे – सीतास्वयंवर या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग यांनी घडवून आणला.
731) विसोबा खेचर – संत नामदेव यांचे गुरु.
732) वीरभुमी – राजीव गांधी यांची समाधी येथे आहे.
733) वुलर – भारतातील सर्वात मोठे सरोवर.
734) वॅटीकन सीटी – जगातील सर्वात लहान देश.
735) वेणाबाई – ‘ सीता स्वयंवर ‘ हे लोकप्रिय काव्य रचणारी रामदासांची शिष्या.
736) वैकुंठ – विष्णुचे निवासस्थान येथे आहे असे माणले जाते.
737) वॉन – दक्षिण कोरियाचे चलन.
738) वॉरन हेस्टिंग्ज – बोर्ड ऑफ रेव्हेनू, मुलकी आणी फौजदारी न्यायालयाचा संस्थापक.
739) व्योमेशचंद्र बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष.
740) व्हाईट हाऊस – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान.
741) शनी – कडी असलेला ग्रह.
742) शबरी –श्रीरामाला उष्टी बोरे खाऊ घालणारी भिल्लीन.
743) शरावती – जोग धबधबा या नदीवर आहे.
744) शशिकला काकोदकर – गोव्याच्या पहिली महिला मुख्यमंत्री.
745) शहाजहान – दिल्लीचा लाल किल्ला याने बांधला.
746) शहामृग – सर्वात जलद धावणारा पक्षी.
747) शहामृग – हा पक्षी उडू शकत नाही.
748) शांगहाई – चीनमधील सर्वात मोठे शहर.
749) शांतिवन – पंडीत नेहरु यांचे समाधीस्थळ.
750) शारदासदन – ११ मार्च १८८९ रोजी पं. रमाबाईनी मुंबईत बालविधवांसाठी सुरु केलेली संस्था.
751) शाल्की – भारतीय बनावटीची पहिली पानबुडी.
752) शिकंदर – एका जगज्जेत्या ग्रीक राजाचे नाव.
753) शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी.
754) शिरपूर – आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोने शुद्ध करण्याचा भारतातील पहिलाच प्रकल्प (जि.धुळे)
755) शिलिंग – टांझानिया देशाचे चलन.
756) शिलॉंग – मेघालयची राजधानी.
757) शिवनेरी – छ. शिवाजी महारांजांचे जन्मस्थळ.
758) शिवसमुद्रम – भारतातील पहिले जलविद्युत केंद्र.
759) शिवाजी सागर – कोयना धरणाचे जलाशय.
760) शीख – गुरु नानकांनी स्थापण केलेला धर्म.
761) शुक्र – पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.
762) शुक्र – या ग्रहाचा व्यास जवळपास पृथ्वी एवढा आहे.
763) शुक्र – हा असा एकमेव ग्रह आहे कि जो पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वतःभोलती फिरतो.
764) शेकरु – महाराष्ट्राचा राज्यप्राणी.
765) शेरवली – महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे रत्नागिरीतील जन्मगाव.
766) श्रीनगर – जम्मू-काश्मिरची राजधानी.
767) श्वास – भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट.
768) संताजी जगनाडे – संत तुकारामांचे अभग लिहिण्याचे काम त्यांच्या या मित्राने केले.
769) संथाल – हि सर्वाधिक लोकसंख्या असलेली आदीवासी जमात आहे.
770) संप्लवन – उष्णता दिल्यावर स्नायू पदार्थाचे द्रवात रुपांतर न होता एकदम वायुत रुपांतर होण्याची क्रिया.
771) संबोधन – व्याकरणातील आठवी विभक्ती.
772) संस्कृत – पंचतंत्र कथा सुरुवातीला या भाषेत लिहील्या गेल्या.
773) सईदा अनवरा – आसामच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.
774) सज्जनगड – समर्थ रामदासांची समाधीस्थळ.
775) सतलज नदी – पंजाबमधील सर्वात मोठी नदी.
776) सत्ययुग – चार युगांपैकी पहिले युग.
777) सत्ययुग – हिदु पुराणानुसार रामाचा जन्म या युगात झाला.
778) सदरक्षणाय खलनिग्रनाय – महाराष्ट्र पोलिसांचे ध्येयवचन.
779) सम्राट अशोक – ‘ देवनाम् प्रिय, प्रियदर्शनी ‘ असे वर्णन करण्यात आलेला भारतीय सम्राट.
780) सरोजिनी नायडू – भारतातील पहिली महिला राज्यपाल.
781) सहा – वाळवीच्या पायांची संख्या.
782) सहारा – जगातिल सर्वात मोठे वाळवंट.
783) सह्याद्री – महाराष्ट्रातील पश्चिम घाट.
784) सांदिपनी – श्रीकृष्णाचा गुरु.
785) सांद्रीभवन – वाफ थंड होऊन तिच्यापासुन पुन्हा द्रव बनणे या क्रियेची संज्ञा.
786) सांभर – भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खा-या पाण्याचे सरोवर.
787) साक्रामेंटो – कॅलिफोर्निया या राज्याची राजधानी.
788) सागरमाथा – एवरेस्ट शिखरास या नावानेही ओळखतात.
789) सागरेश्वर – हरणांसाठी राखीव असलेले सांगली जिल्ह्यातील अभयारण्य.
790) सातारा – कोयना धरण या जिल्ह्यात आहे.
791) सातारा– महाबळेश्वर या जिल्ह्यात आहे.
792) सातारा –महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा.
793) साने गुरुजी – श्यामची आई हे पुस्तक यांनी लिहीले.
794) सापेक्षतावाद – काल, अवकाश व वस्तुमान या तीनही बाबी परस्परावलंबी आहेत असे प्रतिपदन करणारा सिद्धांत.
795) साबरमती – म. गांधीनी येथून दांडी यात्रेला सुरुवात केली.
796) सामना – बर्लिन चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी चित्रपट.
797) सामवेद – चार वेदांपैकी तिसरा वेद.
798) सायली – गिनी या राष्ट्राचे चलन.
799) सारनाथ – अशोकस्तंभ हा सम्राट अशोकाने येथे उभा केला.
800) सारनाथ – भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन झाले ते स्थळ.
801) सार्क – दक्षिण आशियायी प्रादेशिक सहयोग संघटना.
802) सावकारी – संत तुकाराम यांचा परंपरागत व्यवसाय हा होता.
803) सावर – या वृक्षाचा वापर आगकाड्या बनविण्यासाठी करतात.
804) सिंधुदुर्ग – भारतातील पहिला पर्यटन किल्ला.
805) सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यापासून विभाजन करुन निर्मिती झालेला जिल्हा.
806) सिंधू लिपी – भारतातील सर्वात प्राचीन लिपी.
807) सिंहलद्वीप – सीलोन, श्रीलंका.
808) सिंहासन – पहिला मराठी राजकीय चित्रपट.
809) सिडनी – ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी.
810) सिडनी – या शहराला दक्षिण गोलार्धाची राणी असे संबोधले जाते.
811) सिद्धार्थ – गौतमबुद्धांचे मूळ नाव.
812) सिनाई – आशिया व आफ्रिका हे दोन खंड या द्विपकल्पामुळे भूभागाने जोडले गेले आहेत.
813) सिनॅमन – दालचिनी म्हणजे या झाडाची सालच होय.
814) सिनेस – अंतराळ संशोधन करणारी फ्रान्सची संस्था.
815) सियाचिन – भारतातील सर्वात लांब हिमनदी.
816) सिरिमाओ बंदरनायके – जगातील पहिली महिला पंतप्रधान.
817) सिल्वासा – दादरा-नगरहवेलीची राजधानी.
818) सीता – रामायणातील रामाची पत्नी.
819) सीता स्वयंवर – मराठीतील पहिला नाटक प्रयोग.
820) सुएज – जगातील सर्वात लांब कालवा.
821) सुधारक – गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरु केलेले वृत्तपत्र.
822) सुमात्रा – इंडोनेशियातील सर्वात मोठे बेट.
823) सुमित्र – पहिले मराठी स्त्री-नियतकालिक.
824) सुरत – इंग्रजांची भारतातील पहिली वखार.
825) सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रवादाचे जनक.
826) सुरेश जोशी – महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त.
827) सुलतान रझिया – दिल्लीच्या सिंहासनावरील पहिली स्त्री-राज्यकर्ती.
828) सुषमा मुखोपाध्याय – भारतातील पहिली स्त्री वैमानिक.
829) सूचीपर्णी – रशियाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष.
830) सूर्य – पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा.
831) सॅम पित्रोदा – भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक.
832) सेबी – शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणारी संस्था.
833) सेवाग्राम – गांधीजींनी वर्धा जिल्ह्यात स्थापन केलेला आश्रम.
834) सोडीयम – पाण्यामध्ये टाकल्यावर जळणारा पदार्थ.
835) सोनपुर – भारतातील सर्वात मोठा पशुमेळा.
836) सोमनाथ – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक काठेवाड मधील प्रसिद्ध शिवमंदिर.
837) सोमनाथ –बारा ज्योतिर्लिंगांपैकी गुजरात (वेरावळ) येथील जोतिर्लिंग.
838) सोलापूर – महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार.
839) सौदामिनी देशमुख – भारतातील पहिली महिला वैमानिक.
840) स्टॅनले – पहिला भारत मंत्री.
841) स्टेट बॅंक – ज्या ठिकाणी आर.बी.आय.चे कार्यालय नसते तेथे हि बॅंक कार्य करते.
842) स्टेथास्कोप – हृदयाचे स्पंदन ऐकणे व फुप्फुसांची तपासणी करणारे उपकरण.
843) स्नुपी – जगातील पहिला क्लोन कुत्रा.
844) स्पॅनिश – स्पेनची अधिकृत भाषा.
845) स्पेक्ट्रोमीटर – सूर्यकिरणांची वक्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
846) स्वर – (व्याकरण) दुस-या वर्णाच्या मदतीवाचून उच्चारला जाणारा वर्ण.
847) स्वाहिली – केनियाची अधिकृत भाषा.
848) हंसा मेहता – भारतातील पहिल्या महिला कुलगुरु.
849) हडसन – अमेरिकेतील न्युयॉर्क हे शहर या नदीकाठावर आहे.
850) हनीमन – होमिओपॅथीचे संस्थापक.
851) हमिंग बर्ड – जगातील सर्वात छोटा पक्षी.
852) हरारे – झिम्बाब्वेची राजधानी.
853) हरि नारायण आपटे – आधुनीक मराठी कादंबरीचे जनक.
854) हरियाणा – व्हॅट लागू करणारे भारतातील पहिले राज्य.
855) हरियाणा – पानिपत ही युद्धभुमी या राज्यात आहे.
856) हर्षवर्धन – उत्तरभारतातील अखेरचा हिंदुसम्राट राजा.
857) हवाना – क्युबाची राजधानी.
858) हातमाग – भारतातील सर्वात मोठा लघु उद्योग.
859) हायड्रोजन – रॉकेटमध्ये इंधन म्हणून या वायूचा वापर करतात.
860) हिंगोली – महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत.
861) हिंदू – जगातील सर्वात जुना धर्म.
862) हिमसागर एक्सप्रेस – भारतातील सर्वात लांब धावणारी रेल्वे.
863) हिमाचल प्रदेश – भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य.
864) हिमाचल प्रदेश – सिमला, मनाली हि थंड हवेची ठिकाणे या राज्यात आहेत.
865) हिमाद्री – भारताचे उत्तर ध्रुवावरील स्थायी संशोधन केंद्र.
866) हिमालय – जगातील सर्वात मोठी पर्वतराजी.
867) हिमोग्लोबीन – माणसाच्या रक्तात हा घटक आढळतो.
868) हिरा – सर्वात कठीण धातू.
869) हिराकुड – भारतातील सर्वात लांब धरण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *