निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारी २०२१ रोजी चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
मतदान प्रक्रिया २७ मार्चला सुरु होईल आणि सर्व राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहीर होतील.
पाच राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार आहे.
पाच राज्यात २.७ लाख मतदान केंद्रावर मतदान होत असून, १८.६ कोटी मतदार आहेत.
हिमा दास आसामच्या पोलीस उपअधीक्षक पदी
आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत २६ फेब्रुवारी २०२१ रोजी स्टार स्प्रिंटर हिमा दासला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.
माजी केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल यांनी हिमा दासला नियुक्ती पत्र दिले.
हिमा दास ही एक भारतीय धावपटू असून २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी ती पहिली भारतीय आहे. (चालू घडामोडी : २६ फेब्रुवारी २०२१)
ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कायदा पारित
ऑस्ट्रेलियाच्या संसदेने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक ऐतिहासिक विधेयक पारित केले.
त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात नवीन मीडिया लॉअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज दाखवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
सोशल मीडिया कंपन्यांसाठी अशाप्रकारचा कायदा आणणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिलाच देश ठरलाय.
युसूफ पठाण निवृत्त
भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाण याने २६ फेब्रुवारी २०२१ रोजी निवृत्ती जाहीर केली.
युसूफ पठाणने २००७ ते २०१२ या कालावधीत भारतीय संघाकडून ५७ एकदिवसीय आणि २२ टी-२० सामने खेळले.
२००७च्या टी२० विश्वविजेत्या भारतीय संघात युसूफचा समावेश होता. तसेच, २०११च्या विश्वविजेत्या भारतीय चमूतही युसूफ समाविष्ट होता.
युसूफने बडोदा संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळले.
त्याशिवाय, राजस्थान आणि कोलकाता या दोन संघांकडून त्याने IPL मध्ये दमदार कामगिरी करून दाखवली.