अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या संशोधकांना चंद्रावर पाणी शोधण्यास यश मिळाले आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश येणाऱ्या भागात शास्त्रज्ञांना पाणी आढळले आहे.
चंद्रावरील पाण्याचा शोध नासाच्या स्ट्रेटोस्फियर ऑब्जरवेटरी फॉर इंफ्रारेड अॅस्ट्रोनॉमीने (सोफिया) लावला आहे.
चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील क्लेव्हियस क्रेटरमध्ये H2O रेणू सापडल्याचे निश्चित झाले आहे.
पहिल्यांदाच चंद्राच्या प्रकाशित भागावर पाणी आढळेल आहे.
नासाचे अंतराळवीर १९६९ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर गेले होते. त्यावेळी चंद्रावरील भाग पूर्णपणे कोरडा असल्याचे म्हटले गेले होते.
नासाच्या Lunar Crater Observation and Sensing Satellite सारख्या दुसऱ्या ऑर्बिटलच्या मदतीने २० वर्षात पहिल्यांदा चंद्रावर बर्फ असल्याचे आढळले होते.
तर, Cassini मिशन आणि Deep Impact comet mission शिवाय भारताच्या इस्रोच्या चंद्रायान-१ आणि नासाच्या Infrared Telescope Facility मदतीने सूर्यप्रकाश येणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे संकेत मिळाले होते.
नासा २०२४ मध्ये आर्टिमिस मिशन अंतर्गत एक महिला आणि एक पुरुष अंतराळवीर चंद्रावर पाठवणार आहे.