⇒ नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (National University of Singapore) आणि इंडोनेशियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेज (Indonesian Institute of Sciences) शास्त्रज्ञांनी एकत्र जायंट सी कॉक्रोच या झुरळाचा शोध लावला आहे.
⇒ समुद्रात सापडणाऱ्या या झुरळाला जायंट सी कॉक्रोच किंवा डीप सी कॉक्रोज म्हटले जाते.
⇒ बॅथीनोमस रकसासा (Bathynomus raksasa) हे त्याचं वैज्ञानिक नाव आहे.
⇒ हा समुद्रातील आइसोपॉडच्या प्रजातीतील क्रस्टेशियन जीव आहे.
⇒ याला सामान्य झुरळाप्रमाणे सहा नव्हे तर तब्बल 14 पाय असतात.
⇒ यांचा आकार 50 सेंटीमीटरपर्यंत वाढतो. समुद्रशास्त्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दुसरा आइयोपॉड आहे.
⇒ या झुरळाच्या दिसण्यावरून शास्त्रज्ञ याला स्टार वार्स फिल्मच्या डार्थ वेडर कॅरेक्टरच्या नावानेही ओळखतात.
⇒ हा जमिनीवर झुरळाशी मिळताजुळता आहे. समुद्रातील मृत जीवांना खाऊन तो जिवंत राहतो. मात्र कित्येक दिवस त्यांना काही खायला मिळालं नाही तर ते जिवंत राहू शकतात.
