भारतीय निवडणूक आयोगाने ६५ वर्षांवरील लोकांना मतदानासाठी पोस्टल बॅलेट (Postal Ballot) वापरण्याची परवानगी दिली आहे. यासह, कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण देखील टपाल मतपत्रिका वापरू शकतात. निवडणूक आयोगाचा हा निर्णय बिहार निवडणुकीसाठी (Bihar Assembly Elections 2020) लागू होईल.
22 ऑक्टोबर रोजी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 80 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध आणि अपंग मतदारांना टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा देण्यात आली होती. त्यावेळी मंत्रालयाने मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क देण्यासाठी 1961 च्या निवडणूक नियमात सुधारणा करून त्यांना गैरहजर मतदारांच्या वर्गात समाविष्ट केले होते.