* भारतीय हवामान विभागानुसार, मैदानी प्रदेशातल्या एखाद्या ठिकाणाचे तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त, समुद्रकिनाऱ्यावरच्या ठिकाणी 37 अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त आणि डोंगराळ प्रदेशातल्या ठिकाणी 30 अंश सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त होते आणि तापमानात सरासरी तापमानापेक्षा 4.5 ते 6.4 अंश सेल्शिअसनी वाढ होते, तेव्हा उष्णतेच्या लाटा (Heatwaves) निर्माण होतात.
* तापमानाने 46 अंश सेल्सिअस ही मर्यादा ओलांडली, की उष्णतेची अतितीव्र लाट (severe heatwave ) निर्माण झाली असे म्हटले जाते.
* दिवसाचे जास्तीत जास्त तापमान आणि रात्रीच कमीत कमी तापमान हे एखाद्या ठिकाणी नोंद होणाऱ्या विशिष्ट उच्चतम (थ्रेशोल्ड) तापमानापेक्षा किती वाढते यावरून तिथे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे की नाही ते ठरवले जाते आणि या विशिष्ट मर्यादेच्यावर किती काळ हे तापमान त्याच स्थितीत आहे त्यावरून लाटेच्या तीव्रतेची पातळी ठरवली जाते.

