जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे. सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.