MPSC म्हणजे काय?

महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार ‘महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ‘ महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.

MPSC तर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते

उदा. १) राज्य सेवा परीक्षा
२)PSI/STI/ASST.
३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा
५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
६)न्यायालयीन सेवा परीक्षा
७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
८)लिपिक -टंकलेखक परीक्षा
वेबसाईट :- www.mpsc.gov.in
अर्ज करण्यासाठी वेबसाइट:- www.mpsconline.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *