इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली आणि इस्त्रोच्या संयुक्त विद्यमाने आयआयटीमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचे विभाग सुरु करण्यात येणार आहे. अवकाश तंत्रज्ञानातील काही महत्वाच्या संशोधन कार्यक्रमात सहभाग घेणे, या विभागाचे मुख्य उद्देश असतील. याव्यतिरिक्त नॅनो तंत्रज्ञानात, टेक्सटाईल तंत्रज्ञान तसेच नवनवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी इस्रोसमवेत या क्षेत्रांवर काम करण्याची संधी आयआयटीच्या या अभ्यासक्रमाद्वारे परिपूर्ण केले जाईल.