दरवर्षी जगभरामध्ये १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस पाळला जातो.
१६ ऑक्टोबरच का?
१६ ऑक्टोबर हा अन्न आणि कृषी संघटनेचा (FAO) स्थापना दिवस आहे. संयुक्त राष्ट्राची ही विशेष संस्था असून १९४५ मध्ये तिची स्थापना झाली.
२०१९ ची थीम
“Our Actions Are Our Future. Healthy Diets for A #ZeroHunger World”
पार्श्वभूमी
- जागतिक अन्न दिवस FAO च्या २० व्या आम परिषदेत नोव्हेंबर १९७९ मध्ये स्थापन करण्यात आला.
- पहिल्यांदा हा दिवस १६ ऑक्टोबर १९८१ रोजी साजरा करण्यात आला.
- हा दिवस साजरा करण्याची कल्पना हंगेरीच्या FAO मधील शिष्टमंडळाने मांडली होती.
अन्न आणि कृषी संघटना
संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था
पालक संस्था : युनेस्को
स्थापना : १६ ऑक्टोबर १९४५
मुख्यालय : रोम (इटली)
घोषवाक्य : ‘Let there be bread’
सदस्य राष्ट्र : १९४ (EU सह)
उपासमार विरोधी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे नेतृत्व करते.
