1) आम्लपित्त किंवा ऍसिडिटीच्या त्रासावर वापरण्यात येणाऱ्या कोणत्या औषधाचा वापर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तात्पुरत्या काळापुरता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे?
2) एशियाटिक सोसायटीतर्फे कोणाला पां. वा. काणे स्मृती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे?
3) महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या साहित्यिकाचे २०१९ हे जन्मशताब्दी वर्ष आहे?
4) महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (FTII) आणि पॅरिसमधील फेमिस या दोन संस्थांनी कोणता लघुपट प्रदर्शित केला आहे?
5) देशातील उच्च शिक्षणाला एका छताखाली आणण्यासाठी ‘उच्च शिक्षण आयोग’ स्थापन करण्यात येणार आहे. त्यानुसार कोणत्या संस्था रद्द होतील?
6) आवश्यक ते प्रथिन निर्माण करण्यासाठी जनुक कार्यान्वयीत करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
7) कार्यरत राहण्याची क्षमता नसलेल्या पेशी या त्यांचे विभाजन करण्याची क्षमताही गमावून बसतात. अशा पेशींना काय म्हणतात?
8) स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्या प्रमुख नेत्याने ‘काँग्रेस पक्ष विसर्जित करावे’ अशी इच्छा बाळगली होती?
9) हवाई दलाच्या प्रमुखपदी नेमणूक झालेल्या एअर मार्शल राकेशकुमार भदोरिया यांना कोणत्या पदकांची सन्मानित करण्यात आले आहे?
10) ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
11) जेनरोबोटिक्स या कंपनीने कोणत्या नावाचा गटारे साफ करणारा रोबोट तयार केला आहे?
12) महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली?
13) महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता अशी उपाधी कोणी बहाल केली?
14) ‘या धर्तीवर एक हाडामासाचा जिता-जागता माणूस होऊन गेला, यावर पुढच्या पिढीचा विश्वास बसने कठीण आहे!’ गांधीजीबद्दल असे उद्गार कोणत्या प्रख्यात वैज्ञानिकाने काढले?
15) महात्मा गांधीजी यांनी सर फिरोजशहा यांना हिमालयाची आणि लोकमान्य टिळक यांना समुद्राची उपमा दिली होती. तर त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांना कोणती उपमा दिली होती?
16) चलेजाव आंदोलनावेळी कोण गांधीजींचे सचिव होते?
17) ग्राहकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ऍप सुरु केले आहे?
18) १९०९ साली गांधीजींनी इंग्लंड ते दक्षिण आफ्रिका प्रवासात कोणते पुस्तक लिहिले?
उत्तरे : १) रॅनिटिडीन, २) संस्कृततज्ज्ञ डॉ. श्रीकांत बहुलकर (तीन वर्षांतून एकदा हे पदक देण्यात येते), ३) ग. दि. माडगूळकर, ४) हे राम, ५) विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, ६) जनुकीय अभिव्यक्ती, ७) निद्रिस्त पेशी, ८) महात्मा गांधीजी, ९) परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, वायुसेना पदक, १०) सुनील आंबेकर, ११) बँडीकॉट (या रोबोटला अंजनी माशेलकर सर्वसमावेशक तंत्रज्ञान पुरस्कार मिळाला आहे.), १२) रवींद्रनाथ टागोर, १३) नेताजी सुभाषचंद्र बोस, १४) अल्बर्ट आईन्स्टाईन, १५) गंगा नदीची, १६) महादेवभाई देसाई, १७) कन्झ्युमर ऍप (किमान १५ ते कमाल ६० दिवसांत तक्रारीची दखल) १८) हिंद स्वराज्य