1) कलवरी श्रेणीतील दुसरी पाणबुडी असलेली कोणती पाणबुडी नुकतीच नौदलात दाखल झाली आहे?
2) छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेल्या अप्रकाशित छायाचित्रांचे ‘बेस्ट ऑफ लता’ हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे?
3) लता मंगेशकर यांच्यावर आधारित ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाची ‘दीदी और मैं’ ही हिंदी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
4) जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक घटनापीठ स्थापन केले आहे. त्या घटनापीठाचे नेतृत्व कोण करणार आहे?
5) ‘प्रगतिशील महाराष्ट्र : धोरणात्मक पथदर्शिका २०१९-२४’ या पत्रिकेचे प्रकाशन कोणत्या संस्थेतर्फे करण्यात आले आहे?
6) भारताच्या कोणत्या शेजारील देशामध्ये विवाह प्रमाणपत्रातून ‘कुमारी’ हा शब्द हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे?
7) मिग-२९ लेगसी (प्रथम सुपरसॉनिक) हे लढाऊ विमान कोणत्या खास नावाने ओळखले जाते?
8) नुकतेच जलावतरण करण्यात आलेली ‘निलगिरी’ ही युद्धनौका कोणत्या श्रेणीतील आहे?
9) ‘लता’ या ग्रंथाचे पुनःप्रकाशन २८ सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोणी हा ग्रंथ प्रकाशित केला होता?
10) १९७२ मध्ये कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची पहिली मानव पर्यावरण परिषद पार पडली?
11) रिओ दि जानेरो येथे कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राची ‘अर्थ समिट’ पार पडली?
उत्तरे : १) आयएनएस खांदेरी, २) स्पंदन आर्ट, ३) संगीतकार मीना खडीकर (लता मंगेशकर यांची बहीण), ४) न्या. एन. व्ही. रमण, ५) पुणे इंटरनॅशनल सेंटर, ६) बांगलादेश, ७) बाज, ८) शिवालिक, ९) पं. हृदयनाथ मंगेशकर, १०) स्टॉकहोम, ११) १९९२
