या सभेच्या माध्यमातून त्यांनी वसतिगृहे, वाचनालय, प्रौढांसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
या सभेने १९२५ मध्ये सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरु केले.
महाडचा सत्यागृह – मार्च १९२७
मनुस्मृतीचे दहन – २५ डिसेंबर १९२७
काळाराम मंदिर सत्यागृह – ३ मार्च १९३०
नेतृत्व – बाबासाहेब आंबेडकर, अमृतराव रणखांबे, भाऊराव गायकवाड, इ.
२ मार्च १९३०- नाशिकचा जिल्हाधिकारी गोर्डन यांनी मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिला
१५ एप्रिल १९३२ -या रामनवमीच्या दिवशी देवराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महार स्त्रियांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
१९३५ मध्ये मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
आंबेडकर अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ते सरकारनियुक्त प्रतिनिधी होते.
पुणे करार – २३ सप्टेंबर १९३२
तरतुदी.
आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा व संयुक्त मतदार संघाचा स्वीकार करावा.
दलितांसाठी १४८ जागा राखीव. केंद्रात १८ % जागा राखीव.
हरिजन हे हिंदू समाजाचाच एक अविभाज्य भाग असल्याचे बाबासाहेबांनी मान्य केले.
अस्पृश्य उद्धारासाठी गांधीजीनी प्रयत्न करण्याचे मान्य केले
बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी मुंबई विधानसभेत महारांच्या वंशपरंपरागत हुद्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्त्या सुचविणारे विधेयक सादर केले.
महार वतन रद्द करण्यासाठी १९२७ साली चळवळ सुरु केली.
” मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही ” येवला येथे घोषणा – १३ ऑक्टोबर १९३५
त्यांनी ‘मुंबई इलाखा महार परिषद’ जून १९३६ मध्ये घेतली @ मुंबई.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी या परिषदेत धर्मांतराचा ठराव मांडला.
(हैद्राबाद संस्थानात प्रती आंबेडकर म्हणून समजले जाणारे बी.एस. व्यंकटराव हे या परिषदेचे अध्यक्ष होते. बाबासाहेबांनी त्यांना दख्खनचे आंबेडकर [हैद्राबादी आंबेडकर] हि पदवी दिली.)
स्वतंत्र मजूर पक्ष – १५ ऑगस्ट १९३६
जनता हे या पक्षाचे मुखपत्र
ध्येय: काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाचे हित पाहणे.
१९३७ च्या मुंबई प्रांताच्या निवडणुकीत भायखळा-परळ या राखीव जागेवर बाबसाहेब निवडून आले.
वऱ्हाड प्रांताच्या १५ पैकी ५ जागा तर मुंबई प्रांताच्या १५ पैकी ११ जागा या पक्षाने जिंकल्या
मध्यप्रांत वऱ्हाडातील बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या पक्षाने केला.
बाबासाहेबांनी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धती व महार वतन रद्द करण्यासंबंधीचे विधेयक मुंबई कायदेमंडळात मांडले.
१९४२ मध्ये हा पक्ष विसर्जित करून अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ची स्थापना केली.
अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन – १९४२
१९४५ – पीपल्स एज्यूकेशन सोसायटी @ मुंबई
सिद्धार्थ कॉलेज @ मुंबई – २० जून १९४६
मिलिंद कॉलेज @ औरंगाबाद – १९ जून १९५०
रिपब्लिकन पक्ष – १९५६
हिंदू संहिता विधेयक
ऑक्टोबर १९४८ – त्यांनी हिंदू संहिता तपासून आणि सुधारून घटना समितीसमोर मंडळी होती.
बाबासाहेबांनी हे विधेयक फेब्रुवारी १९५१ मध्ये लोकसभेत मांडले
समर्थन : न. वि. गाडगीळ , (जवाहरलाल नेहरू- सुरवातीला समर्थन नंतर विरोध)
विरोध: सरदार वाल्लभाई पटेल, श्यामप्रसाद मुखर्जी, सरदार भूपेंद्रशिंहजी
कायदामंत्री पदाचा राजीनामा
जानेवारी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत ते कॉंग्रेस चे उमेदवार नारायण काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले.
वृत्तपत्रे
मूकनायक (पाक्षिक) -१९२०
बहिष्कृत भारत – ३ एप्रिल १९२७
दलित चळवळीचे मुखपत्र
या वृत्तपत्रातून लोकहितवादींचे शतपत्रे पुन्हा प्रकाशित करण्यात आली.
या वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी महार व त्यांचे वतने यावर लेख लिहिले.