चालू घडामोडी : 25 जानेवारी 2020

विनय सिन्हा  (निधन)

🔸 ऐतिहासिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारे निर्माते विनय सिन्हा यांचे २४ जानेवारी रोजी निधन झाले.
🔸 ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. काही दिवसांपूर्वी ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली.
🔸 विजय सिन्हा यांनी १९८३ साली ‘चोर-पोलीस’ आणि १९९७ साली ‘नसीब’ या चित्रपटांचीदेखील निर्मिती केली होती.
🔸 सलमान-आमिर खान या जोडीला त्यांनी मोठ्या पडद्यावर आणले.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल

🔸 ठिकाण : जयपूर (राजस्थान)
🔸 कालावधी : २४ ते २७ जानेवारी २०२०
🔸 २००६ पासून दरवर्षी जयपूर साहित्य मेळा भरतो.

ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘चाळ’ आणि ‘डब्या’चा समावेश

🔸 इंग्रजी संभाषणातील वापर आणि प्रचलित शब्द या निकषांवर जगभरातील नव्या अर्थपूर्ण शब्दांना सामावून घेणाऱ्या ‘ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी’मध्ये आता भारतात बोलल्या जाणाऱ्या आणखी २६ शब्दांना स्थान देण्यात आले आहे.
🔸 विशेष म्हणजे यात मराठमोळे डब्बा (जेवणाचा), चाळ (वसती) हे शब्द आणि शादी, हरताळ, आधार (आधार कार्ड) यांचा समावेश आहे.
🔸 ऑक्सफर्ड शब्दकोशाची ही अद्यायावत दहावी आवृत्ती २४ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीत ३८४ भारतीय (भारतीय इंग्रजी) शब्दांचा समावेश आहे. यावेळी एकूण एक हजार नव्या शब्दांना या कोशाने सामावून घेतले आहे. त्यात चॅटबॉट, फेक न्यूज आणि मायक्रोप्लास्टीक या शब्दांचा समावेश आहे.
🔸 नव्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये अंतर्भूत केलेल्या २६ नव्या भारतीय शब्दांपैकी २२ शब्दांना मुद्रित आवृत्तीमध्ये स्थान दिले आहे.
🔸 या शब्दकोशातील अन्य भारतीय शब्दांत, आंटि (एयूएनटीआयइ) (आन्टी- एयूएनटीवाय या इंग्रजी शब्दाचे भारतीय रूप), बस स्टॅन्ड, टय़ूब लाइट, व्हेज आणि व्हिडिओग्राफ यांचा समावेश आहे.
🔸 ऑक्सफर्ड शब्दकोशाला ७७ वर्षे होत असून त्याचा श्रीगणेशा १९४२ मध्ये जपानमध्ये झाला. या कोशाचे कर्ते अल्बर्ट सिडने यांचा उद्देश हा जगभरातील भाषा अभ्यासकांना इंग्रजी वापरातील शब्दांचा अर्थ समजावा हा होता.
🔸 ऑक्सफर्ड ऑनलाईन आवृत्तीत अर्थाच्या दृष्टीने चार नवे भारतीय-इंग्रजी शब्द समाविष्ट झाले आहेत. यात करंट (वीजप्रवाह या अर्थाने), लूटर, लुटिंग आणि उपजिल्हा या शब्दांचा समावेश आहे.

तीन आफ्रिकी देशात मुलांना मलेरिया प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केनिया, घाना व मलावी या देशात लसीकरण सुरू करण्यात आले असून या भागात सध्या मलेरिया म्हणजे हिवतापाची लागण मोठय़ा प्रमाणात आहे. 

पाण्याखालून अण्वस्त्र हल्ला करणाऱ्या K-4 मिसाइलची सहा दिवसात दुसरी चाचणी यशस्वी

🔸 के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची २४ जानेवारी रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली. मागच्या सहा दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून, त्याची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे.
🔸 समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. अरिहंत वर्गाच्या अण्वस्त्र पाणबुडयांवर या क्षेपणास्त्राची तैनाती करण्यात येईल. अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) K-4 क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
काय आहे K-4 क्षेपणास्त्राचे वैशिष्टय :-
– भारत आपल्या पाणबुडयांच्या ताफ्यासाठी पाण्याखालून हल्ला करु शकणारी दोन क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. K-4 त्यापैकी एक आहे. K-4 ची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे तर दुसऱ्या क्षेपणास्त्राची रेंज ७०० किलोमीटर आहे.
– तीन मीटर लांब क्षेपणास्त्र एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
– पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे भारत आता हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.
– आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता होती. भारताचा आता या देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.
– अण्वस्त्र पाणबुडयांवर K-4 क्षेपणास्त्राची तैनाती करण्याआधी डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या करण्यात येतील. सध्या भारतीय नौदलाची आयएनएस अरिहंत ही अण्वस्त्र पाणबुडी कार्यरत आहे.

अविनाश पंत 

🔸 सोशल मीडियाची दिग्गज कंपनी फेसबुकने अविनाश पंत यांची फेसबुक इंडियाचे मार्केटिंग प्रमुख (विपणन संचालक) म्हणून नियुक्ती केली आहे. विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व अॅप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल. आयआयएम अहमदाबाद येथून उत्तीर्ण झालेले पंत हे फेसबुकचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अजित मोहन यांना कामासंबंधीचा अहवाल सादर करतील.

मनसेचा नवा झेंडा

🔸 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंडयाचे २३ जानेवारी रोजी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. मनसेचे यापुढे दोन झेंडे असणार आहेत. एका झेंडयामध्ये भगव्या रंगासह राजमुद्रा आहे तर, दुसऱ्या झेंडयामध्ये भगवा रंग आणि मधोमध पक्षाचे निवडणूक चिन्ह इंजिन आहे. सौरभ करंदीकर या मराठमोळया तरुणाने मनसेचा हा नवीन झेंडा साकारला आहे.

प्रा. अ‍ॅलन मॅकडोनाल्ड

🔸 नुकताच त्यांना भौतिकशास्त्रात नोबेलखालोखाल प्रतिष्ठेचा ‘वूल्फ पुरस्कार’ मिळाला आहे.
🔸 मॅकडोनाल्ड हे मूळ कॅनडाचे, त्यांनी टोरांटो विद्यापीठातून एमएस्सी व पीएचडी या पदव्या घेतल्या. कॅनडाच्या विज्ञान संशोधन मंडळाचे ते सदस्य होते. नंतर त्यांनी इंडियाना व टेक्सास विद्यापीठातून अध्यापन केले.
🔸 क्वांटम हॉल इफेक्ट, इलेक्ट्रॉनिक बँड स्ट्रक्चर थिअरी, चुंबकत्व व अतिवाहकता या विषयात त्यांनी संशोधन केले आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीचे ते फेलो आहेत.
🔸 हर्जबर्ग पदक, अर्नेस्ट मॅश पदक, बकले पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या संशोधनातून आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘ट्विस्ट्रॉनिक्स’ ही नवी शाखा उदयास येत आहे. त्या
त्यांनी लावलेला शोध:-
मॅकडोनाल्ड यांनी टेक्सास विद्यापीठात संशोधन करताना द्विस्तरीय ग्राफिन जर पिळले तर त्याचे हे गुणधर्म अधिक फायद्याचे बनतात हे दाखवून दिले. ग्राफिनचे हे थर ज्या कोनातून पिळले जातात त्यावर त्यातील इलेक्ट्रॉन्सची गती अवलंबून असते. हा कोन १.१ अंशाचा आहे. या संशोधनातून पुढे जास्त तापमानाला काम करणाऱ्या अतिवाहकाची निर्मिती शक्य आहे. अतिवाहक याचा अर्थ ज्या पदार्थातून वीज सोडली असता ती जेवढीच्या तेवढी पुढे वाहून नेली जाते असा पदार्थ, त्यात विद्युतरोध असत नाही किंवा अत्यल्प असतो. यामुळे बऱ्याच प्रमाणात वीज वाचू शकते. त्यांचा हा शोधनिबंध ‘नेचर’ या नियतकालिकात २०१८ मध्ये प्रसिद्ध झाला होता. बाहेरील मंडलाच्या (सर्किट) मदतीने आपण ग्राफिनने तयार केलेल्या अतिवाहकाचा विद्युत प्रवाह नियंत्रित करू शकतो. तांब्यावर आधारित अतिवाहक आजवर वापरले जात; तशाच प्रकारची नक्कल ग्राफिनच्या अतिवाहकात केली आहे. वाहकाचा अतिवाहक होताना त्याच्या रेणवीय रचनेत सूक्ष्म पातळीवर काय बदल होतात हे मॅकडोनाल्ड यांनी शोधून काढले.

करप्शन परसेप्शन इंडेक्‍स

🔸 ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने भ्रष्टाचार निर्देशांक (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) जाहीर केला.
🔸 यात जगातील १८० देशांमध्ये ४१ गुणांसह भारताचे स्थान ८० वे आहे. या स्थानावर भारतासह चीन, बेनिन, घाना आणि मोरोक्को हे देश आहेत.
🔸 यादीत देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत.
🔸 भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे.
🔸 गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता.
क्रमवारी… (कमीपासून जास्त भ्रष्टाचारी देश)
१) डेन्मार्क आणि न्यूझीलंड

२) फिनलंड
३) सिंगापूर
४) स्वीडन
५) स्वित्झर्लंड
७) नॉर्वे
८) नेदरलॅंड
९) जर्मनी आणि लग्झेंबर्ग
८०) भारत, चीन, घाना, मोरोक्को
१२०) पाकिस्तान

दावोस परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम)

🔸 कालावधी : २१ ते २५ जानेवारी
🔸 आवृत्ती : ५० वी
🔸 स्वित्झर्लंडमधील दावोस या आल्प्स पर्वतामधील छोट्याशा गावात ही जागतिक परिषद भरते.
🔸 जगातील अनेक राष्ट्रांचे प्रमुख किंवा मंत्रिगण, मोठमोठे उद्योगपती, व्यापारी आणि माध्यमे या परिषदेला हजर असतात.
🔸 जगातील आर्थिक समस्यांबरोबरच राजकीय, पर्यावरणविषयक तसेच इतरही समस्यांवर विचारविनिमय करणे, हे या परिषदेचे सर्वसाधारण उद्दिष्ट असते.
🔸 सन १९७१ पासून दरवर्षी दावोस येथे ही जागतिक आर्थिक परिषद भरते.
🔸 सुरुवातीला युरोपीय मॅनेजमेंट फोरम या नावाने सुरू झालेली ही परिषद १९८७ पासून जागतिक आर्थिक परिषद या नावाने भरू लागली आणि तिचे स्वरूपही अधिक व्यापक झाले.
🔸 ती एक बिगर शासकीय संघटना आहे. दावोस परिषदेला २०१२ पर्यंत युनेस्कोमध्ये निरीक्षकाचा दर्जा मिळाला होता.
🔸 परिषदेला हजर राहण्यासाठी शुल्क आकारले जाते. तसेच निमंत्रित केलेल्यानाच प्रवेश दिला जातो. परिषदेला हजर राहण्यासाठी ६० हजार डॉलर (अंदाजे ४२ लाख), तर चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी २७ हजार डॉलर (अंदाजे २० लाख) आकारले जातात.

इंटरपोलच्या माजी प्रमुखाला १३ वर्षांचा कारावास

इंटरपोलचे माजी प्रमुख मेंग होंगवेई यांना लाचखोरीच्या प्रकरणात चीनमधील न्यायालयाने तेरा वर्षांहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे. मेंग यांना फ्रान्सवरून चीनमध्ये दाखल झाल्यानंतर २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या विरोधात लाच स्वीकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मेंग यांनी चीन सरकारमध्ये सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. मेंग यांच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह पॅरिसमध्ये राजाश्रय घेतला आहे. चीनमधील न्यायालयाने मेंग यांना लाचखोरीच्या प्रकरणात १३ वर्षे आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २९० हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे.

राष्ट्रीय मतदाता दिवस

🔸 दरवर्षी २५ जानेवारी रोजी पळाला जातो
🔸 आवृत्ती : १० वी
🔸 थीम 2020: “Electoral Literacy for a Stronger Democracy”

काय आहे करोना? (What is Corona Virus?)

Source : Loksatta, Sakal, Maharashtra Times

Leave a Reply

Your email address will not be published.