- सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
- यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी २२ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई येथे केली.
- विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने खालील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
- १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- सन १९७६ पासून राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
- नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट (मराठी), कीर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगीत, तमाशा लोककला या बारा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो.
यंदाचे विजेते :-
क्षेत्र | विजेते |
नाटक | सतीश पुळेकर |
कंठ संगीत | कमल भोंडे |
उपशास्त्रीय संगीत | मंगलाताई जोशी |
मराठी चित्रपट | मनोहर आचरेकर |
कीर्तन | तारा राजाराम देशपांडे |
शाहिरी | शाहीर अंबादास तावरे |
नृत्य | रत्नम जनार्धनम् |
आदिवासी गिरीजन | नीलकंठ शिवराम उईके |
वाद्यसंगीत | अप्पा वढावकर |
तमाशा | हसन शहाबुद्दीन शेख |
लोककला | लताबाई सुरवसे |
कलादान | सदाशिव देवराम कांबळे |
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.