मान लो तो हार है, ठान लो तो जीत है

२७ सप्टेंबर रोजी शारजा येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात रात्री अंदाजे ११.३० वाजता, १६.३, सोळाव्या ओव्हर मधील तिसरा बॉल पडल्यावर हिंदी कमेंट्री करताना आकाश चोप्रा म्हणाला ” इस वक्त आधा भारत राहुल तेवतिया को दोषी मान रहा होगा के ये मॅच उनके वजह से हार रहे हैं! वो जिता नहीं सकते.

१६.४ ओव्हर झाल्यावर आकाश चोप्रा पुन्हा म्हणाला, “सनी भाई मुझे आपसे एक बात पुछनी हैं अगर बल्लेबाज इतना स्ट्रगल कर रहा है तो उसे रिटायर्ड आउट क्यों नहीं घोषित कर देते! इसको इतना क्यों बुरा समजा जाता हैं!

अगर कोई बॉलर अच्छी बॉलिंग नही कर रहा है तो उसे अगले ओवर नही देते. वैसेही राहुल तेवतिया को राजस्थान रॉयल्स ने ही रिटायर्ड आउट देने में क्या दिक्कत हैं.
ऑलरेडी तेवतिया को रॉबीन के पहले भेज कर रॉयल्स राजस्थानने गलती कर दी हैं!”

१६.५ व्या बॉलला सुनील गावस्कर म्हणतात, “बहोत अच्छा सवाल है! हाँ ऐसा हो सकता हैं! अगर राहुल तेवतिया को कोई संदेसा भेजे की भई तुम वापस आ जाओ! कोई बहाना कर लो!”

सतरावी ओव्हर संपली. जिंकण्यासाठी हवा असलेला रन रेट अशक्यरित्या १७ वर पोहचला. दोन बॉल खेळलेला नवा बॅट्समन रॉबिन उत्तप्पा पिचवर होता व संपूर्ण देशभर ज्याची निर्भर्त्सना होत होती तो राहुल तेवतिया गेल्या तासाभरापासून चाचपडत खेळत होता. त्यामुळे सामना राजस्थान रॉयल्सने जिंकण्याची तसूभरही आशा उरली नव्हती. तेवतियाने पिचवर आल्यापासून एकदाही बॉलसोबत नीट टायमिंग साधू शकला नव्हता. वीस बॉल्स खेळून एकसुद्धा चौकार किंवा षटकार खेचला नव्हता. तो जीव तोडून प्रयत्न करत होता पण यश मिळत नसल्याने फक्त हसं होत होतं.

सर्वच मोठ्या नावाजलेल्या क्रिकेट वेबसाईटवर तेवतियाची सौम्य शब्दांत टीका सुरू होती.
तर ट्विटरवर राहुल तेवतियावर तीक्ष्ण ट्विटबाण बरसत होते. दर सेकंदाला त्याच्यावर हजारो जोक्स सुरू होते.

स्पोर्ट्स वेबसाईटवर सामना सुरू असताना दोन्ही टीमची सामना जिंकण्याची शक्यता टक्के प्रमाणात दाखवतात, राजस्थान रॉयल्सची जिंकण्याची शक्यता ६०% टक्क्यांपासून प्रत्येक बॉलसोबत कमी होत सतरावी ओव्हर संपल्यावर किंग्स इलेव्हन पंजाब : 98% तर राजस्थान रॉयल्स : 2% जिंकण्याची शक्यता दाखवत होते.

अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला. चाचपडणारा राहुल तेवतिया स्ट्राईकवर. त्याच्याकडून शून्य आशा. डावखोऱ्या कॉट्रेलच्या पहिल्या चार बॉलवर डीप स्क्वेअर लेग, मिड ऑनवरून व लॉंग ऑफ वरून चार सिक्स आणि सहाव्या बॉलवर पुन्हा सिक्स हाणून राहुल तेवतीयाने राजस्थान रॉयल्सला मॅचमध्ये परत आणलं.

सदर ओव्हरमधील पहिल्या सिक्सनंतर आकाश चोप्रा म्हणाला इस मॅच की कहानी अभि बाकी है मेरे दोस्त
कॉट्रेलच्या एक ओव्हरमध्ये 30 रन्स काढले त्यानंतर मोहम्मद शमीला सिक्स मारुन शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स काढायचे शिल्लक तेवतीयाने बाकी ठेवले. यावेळी त्याच प्रसिद्ध वेबसाईटवर किंग्स इलेव्हन पंजाब जिंकण्याची शक्यता दाखवली जात होती 2% आणि राजस्थान रॉयल्स जिंकण्याची शक्यता दर्शवली जात होती ९८%.
समीकरण उलट झालं होतं, केवळ 12 बॉल्समध्ये
हरलेल्या राहुल तेवतियाने सामना फिरवला होता.

आकाश चोप्रा म्हणाला त्याप्रमाणे राहुल
तेवतियासाठी ‘पिक्चर अभि बाकी थी’.
शेवटी हॅपी एंडिंग राहुल तेवतीयाला मिळालंच.
मॅच जिंकल्यावर तेवतीया संदर्भात आकाश चोप्रा सुनील गावस्करांना म्हणाला

मान लो तो हार है… ठान लो तो जीत हैं…

मॅच हातातून सुटतेय आणि पराभवाला आपण कारणीभूत ठरणार आहोत, हे तेवतियाला समजलं नसेल का. सगळं जग त्याच्यावर ‘ब्लेमगेम’ खेळत होतं.
त्याच्या हातात इतकंच होतं की जे समोर येईल त्यावर बेस्ट देण्याचा प्रयत्न करणं. तो ‘प्रयत्न’ त्याने केला. पहिले वीस बॉल त्याला यश आलंच नाही. हसं झालं

कदाचित त्यालाही हे माहित नव्हतं की आता अठराव्या ओव्हरला आपण गेम चेंज करणार आहोत पण टप्प्यात आलेला बॉल आणि संधी त्याने अचूक हेरली आणि तेवतीया गेम चेंजर बनला २०२० वर्ष आणि २०२० सामन्यातील ती इनिंग हाच संदेश देत आहे…

पिच सोडू नका, स्वतःहून रिटायर्ड… आऊट होऊ नका.

२०२० वर्षात एखादी गेम चेंजर ओव्हर प्रत्येकाच्या आयुष्यात आलीच आहे, नसेल तर ती येणारच आहे. फक्त तोवर उभं राहायचं आहे. जीव तोडून प्रयत्न करायचा आहे. क्यूंकी पिक्चर अभि बाकी हैं मेरे दोस्त

२०२० सामन्यातील राहुल तेवतीयाचा ती खेळी, त्याआधी किलिंग बॉलिंग करणारा कॉट्रेल, सामन्यातील १८ वा ओव्हर आणि २०२० वर्ष समजून घ्यायला हवा. स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका. दिवा तेवत ठेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *