परिस्थितिकी

सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजे परिस्थितीकी थोडक्यात परिस्थितीकी या शास्त्रात पृथ्वीवरील सर्व सजीव सूक्ष्म जीव व पर्यावरण यांच्या आंतरक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अर्न्‍स हॅकेल या जर्मन जीवशास्त्रज्ञाने परिस्थितीकी शास्त्रासाठी (Ecology) ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. परिस्थितीकी शास्त्रात परिसंस्था हे अभ्यासाचे एकक (Unit) मानले जाते.

परिसंस्था –

१९३५ मध्ये ब्रिटिश परिस्थितीकी शास्त्रज्ञ ए. सी. टन्सले यांनी परिस्थितीकी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्यांच्या मते सजीव व त्यांचे वसतिस्थान यांची एकत्रित संरचना म्हणजे परिसंस्था.

परिस्थितीकी मनोरा (Pyramid) :-

ब्रिटिश शास्त्रज्ञ परिस्थितीकी शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन यांनी १९२७ साली परिस्थितीकी मनोऱ्याची संकल्पना मांडली. परिसंस्थेत ऊर्जा ही एका जिवाकडून दुसऱ्या जिवाकडे हस्तांतरीत होत असते. ऊर्जेचे हस्तांतर होत असताना मूळ ऊर्जेचा तीव्रतेने ऱ्हास होत असतो.

अन्नसाखळी (Food Chain) :- 

प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाला ऊर्जेची गरज असते. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती वाढतात. वनस्पतीवर शाकाहारी प्राणी जगतात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. वनस्पती, शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राणी अन्नासाठी परस्परांवर अवलंबून असतात, यालाच अन्नसाखळी म्हणतात.

ऊर्जाविनिमय स्तर (Tropical Level) :- 

अन्नसाखळीतील उत्पादकांकडून विविध स्तरांतल्या भक्षकांकडे अन्नऊर्जेच्या विविध पातळ्यांना ऊर्जाविनिमय स्तर असे म्हणतात. १९४२ मध्ये लिंडमॅन या विचारवंताने या अन्नऊर्जा संक्रमणाच्या विविध पातळ्यांना ऊर्जाविनिमय स्तर Trophical Level असे नाव दिले.

अन्नजाळी (Food Web) :- 

एकाच परिसंस्थेत एकापेक्षा अधिक अन्नजाळ्या एकमेकांशी संबंधित व आंतरभेदक असतात यांना अन्नजाळी असे म्हणतात.

पारिस्थितिक कार्यस्थळ :- 

जोसेफ ग्रीनले या वैज्ञानिकाने सर्वप्रथम पक्षांच्या अभ्यासावरून ही संज्ञा मांडली. परिसंस्थेच्या अभ्यासात सजीवांच्या वसतिस्थानाची गुणवैशिष्टय़े समजून घेणे अतिशय आवश्यक असते. कारण वसतिस्थानाच्या गुणवैशिष्टय़ांवरच सजीवांचे अस्तित्व, वितरण व कार्य निश्चित होते. थोडक्यात परिसंस्थेतील सजीवांचे वसतिस्थान व कार्य यांचे वर्णन म्हणजे परिस्थितीकी कार्यस्थळ होय.

जैवविविधता :- 

पृथ्वीवरील जीवसृष्टीमध्ये विविध प्रकारचे सजीव विविध परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न आकाराचे, आकारमानाचे, संरचनेचे आणि निरनिराळ्या गुणसूत्रांचे कमी अधिक आयुष्यमानाचे व आंतरसंबंध असलेले आढळतात त्यालाच जैवविविधता असे म्हणतात.

१९९२ मध्ये ब्राझिलच्या राजधानीत, रिओडी जानेशे येथे झालेल्या वसुंधरा परिषदेत जैवविविधता हा शब्द प्रचलित झाला.

जैवविविधतेचे प्रकार  

अनुवंशीय विविधता (Genetic Diversity):- 

एकाच जातीच्या प्राण्यांच्या जीनमध्ये दिसून येणारी विविधता म्हणजे अनुवंशीय विविधता. उदा. गाई-म्हशी यांच्या गुणसूत्रात बदल घडून नवीन संकरित जाती निर्माण केल्या जातात. संकरित बियाणे इ.

प्रजातीची  विविधता (Species Diversity) :- 

एकाच अधिवासात विविध प्रकारचे व विविध जातींचे सजीव वेगवेगळ्या संख्येने राहतात त्यालाच प्रजातीय विविधता म्हणतात. प्रजातीय विविधता नसíगक परिसंस्था आणि कृषी परिसंस्थेमध्ये जास्त दिसून येते.

परिसंस्था विविधता (Ecosystem Diversity):-

प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक विघटक हे ठरावीक असतात म्हणून परिसंस्था बदलाबरोबर हे घटकही बदलतात. उदा. गवताळ परिसंस्थेत साप, उंदीर, सरडे इ. विविध प्रकारच्या प्रजाती एकत्र राहतात तर गोडय़ा पाण्याच्या परिसंस्थेत कासव, मासे, पाणवनस्पती एकत्र राहतात.

संदर्भ : लोकसत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *