४ ऑक्टोबर : जागतिक पशु दिन

दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी जागतिक पशु दिन किंवा जागतिक प्राणी प्रेमी दिवस म्हणून साजरा केला जातो.

इतिहास:-

१९३१ साली फ्लोरेंस, इटली येथे पर्यावरण शास्त्रज्ञांची एक परिषद भरली होती. त्यात धोक्यात आलेल्या प्राण्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे या वर्षापासून (१९३१ पासून) जागतिक प्राणी दिन साजरा केला जात आहे.

४ ऑक्टोबरच का?

प्राण्यांचे महान संरक्षक असिसीचे संत फ्रान्सिस यांचा ४ ऑक्टोबर हा जन्मदिवस आहे. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ ४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.

इतर महत्वाचे दिन :-

जागतिक वन्यजीव दिन – ३ मार्च
प्रयोगशाळांमधील प्राणी दिन – २४ एप्रिल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *