हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार घोषित

  • महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीच्या सन २०१८-१९ या वर्षाचे पुरस्कार २० ऑगस्ट २०१९ रोजी घोषित करण्यात आले. हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये सर्वोच्च समजले जाणारे अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार डॉ. बलभीमराज गोरे यांना आणि श्री. हस्तीमल हस्ती यांना घोषित झाला आहे. प्रत्येकी १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • अकादमीतर्फे तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. यावर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, तसेच २१ विधा पुरस्कार अशा एकूण ३१ पुरस्कारांचा समावेश आहे.
  • ‘अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव’ पुरस्कारासाठी रू. १ लाख, ‘राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी रू. ५१ हजार आणि विधा पुरस्कारासाठी स्वर्ण, रजत, कांस्य अशा तीन प्रकारात अनुक्रमे रू, ३५,०००/-, रू. २५,०००/- आणि रू. ११,०००/- रोख देण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.