सिंधू वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकाविणारी पहिली भारतीय

 • वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत २५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे विजेतेपद (सुवर्ण पदक) पटकावले.
 • तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला.
 • जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
 • या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदके झाली आहेत.
 • यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यात 15 सामने झाले होते. त्यापैकी सिंधूने 8 सामन्यांत बाजी मारली आहे.
 • 2013 आणि 2014 मध्ये कांस्यपदक तर 2017 आणि 2018 मध्ये सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
 • पाच जागतिक पदके मिळवणारी सिंधू हि जगातील दुसरी तर तिन्ही (सुवर्ण, रौप्य, कांस्य) पदके पटकावणारी तिसरी महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.

पी व्ही सिंधूचा अल्पपरिचय :-

 • जन्म : ५ जुलै १९९५ (हैद्राबाद, तेलंगणा)
 • संपूर्ण नाव : पुसारला वेंकटा सिंधु
 • प्रशिक्षक : पी गोपीचंद
 • बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय शटलर
 • ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी  सानिया नेहवालनंतर दुसरी भारतीय बॅडमिंटन खेळाडू
 • तिचे पालक दोघेही राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत.
 • तिची मोठी बहीण पी. व्ही. दिव्या राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉलपटू होती.

सिंधूची कारकीर्द:-

 • ऑलिम्पिक : रिओ डी जानेरो (२०१६, रौप्य)
 • जागतिक चॅम्पियनशिप : सुवर्ण (२०१९, बेसल), रौप्य (२०१८, नानजिंग), रौप्य (२०१७, ग्लासगो), कांस्य (२०१४, गुआंगझोउ), कांस्य (२०१३, कोपनहेगन)
 • उबर काप : कांस्य (२०१४, नवी दिल्ली), कांस्य (२०१६, कुशाण)
 • आशियाई क्रीडा स्पर्धा : रौप्य (२०१८, जकार्ता), कांस्य (२०१४, इंचीऑन)
 • राष्ट्रकुल स्पर्धा : सुवर्ण (२०१८, गोल्ड कोस्ट-संमिश्र), रौप्य (२०१८, गोल्डकोस्ट-महिला एकेरी), कांस्य (२०१४, ग्लासगो)
 • आशियाई चॅम्पियनशिप : कांस्य (२०१४, गिमचेन)
 • दक्षिण आशियाई स्पर्धा : सुवर्ण (२०१६, गुवाहाटी-महिला संघ), राउपाय (२०१६, गुवाहाटी- महिला एकेरी)
 • राष्ट्रकुल युवा स्पर्धा : सुवर्ण (२०११, डग्लस)
 • आशियाई ज्युनियर गेम्स : सुवर्ण (२०१२, गिमचेन)

सिंधूला मिळालेले सन्मान :-

 • २०१५ : पद्मश्री
 • २०१६ : राजीव गांधी खेलरत्न
 • २०१३ : अर्जुन पुरस्कार

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक बारावा 

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक बारावा ४ सप्टेंबर २०१९ पासून सर्वत्र उपलब्ध…

» लेखक :- बालाजी सुरणे, दिव्या महाले
» प्रकाशक :- सिम्प्लिफाईड प्रकाशन

अधिक माहितीसाठी संपर्क :- 9423333181 (अभिजीत थोरबोले सर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *