अ) लोकल एरिया नेटवर्क (LAN) –
एका इमारतीच्या कार्यालयातील किंवा मर्यादित अशा भौगोलिक क्षेत्रातील नेटवर्क ‘लॅन’ या नावाने ओळखले जाते. लॅनला मर्यादित भौगोलिक क्षेत्रामुळे टेलिकॉम सेवेची गरज नसते. गेटवे नेटवर्कद्वारे लॅन मोठय़ा नेटवर्कला जोडता येते. लॅनची मालकी खासगी असते. अनेक व्यक्ती एकाच वेळेस माहितीवर प्रक्रिया करू शकतात. व्यक्तिगत संगणकाचा पर्याप्त वापर तसेच मध्यवर्ती केंद्रीय संगणकाची अनावश्यकता ही लॅनची वैशिष्टय़े सांगता येतील.
ब) मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क (MAN) –
संपूर्ण शहर व्यापून टाकणारे असे हे नेटवर्क असते. यामध्ये लॅन तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो.
क) वाइड एरिया नेटवर्क (WAN) –
जेव्हा भौगोलिकदृष्टय़ा विविध ठिकाणी असलेले संगणक नेटवर्कमध्ये जोडले जातात, तेव्हा त्यास ‘वाइड एरिया नेटवर्क’ असे म्हणतात. यासाठी टेलिफोन लाइन, दूरसंचार उपग्रह व मायक्रोवेव्ह िलक्सचा उपयोग केला जातो.
ड) क्लाऊड कॉम्प्युटिंग –
क्लाऊड कॉम्प्युटिंग ही लॅन व वॅन यांच्या पुढची पायरी आहे. जेव्हा मोठा समूह माहितीची प्रचंड प्रमाणात देवाणघेवाण करतो, तेव्हा नेटवर्कचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. या समस्येवर मात करण्यासाठीच क्लाऊड कॉम्प्युटिंगचा उदय झाला. यामध्ये वेगवेगळ्या प्रणालींना एकाच वेळी कामाला लावले जाते. एक माहितीची साठवणूक करतो, दुसरा या माहितीच्या साठय़ावर प्रक्रिया करतो, तिसरा या प्रक्रियायुक्त माहितीचा परिणामकारक वापर करण्यासाठी नेटवर्क तयार करतो अणि चौथा या नेटवर्कची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देतो.
Helpful