श्यामजी कृष्ण वर्मा

श्यामजी कृष्ण वर्मा

 • क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत म्हणून ओळख असलेल्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म ४ ऑक्टोबर १८५७ रोजी गुजरातच्या मांडवी येथे झाला. 
 • वकील आणि पत्रकार म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 
 • विसाव्या वर्षांपासूनच ते क्रांतिकारी चळवळीत सक्रिय झाले. 
 • लोकमान्य टिळक आणि स्वामी दयानंद सरस्वती यांना ते प्रेरणास्थान मानत होते. 
 • १९१८ मध्ये बर्लिन आणि इंग्लंडमध्ये विद्या संमेलनात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 
 • १८९७ मध्ये ते पुन्हा इंग्लंडमध्ये गेले. तिथे त्यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. 
 • ऑक्सफर्डमधून एम.ए. करणारे ते पहिले भारतीय होते. 
 • पुण्यातील त्यांच्या एका संस्कृत भाषणाने प्रभावित होऊन मोनियर विलियम्स यांनी वर्मा यांना ऑक्सफर्डमध्ये संस्कृतचे सहायक प्रोफेसर केले.
 • त्यांनी १९०५ मध्ये त्यांनी इंडियन होमरूल सोसायटीची स्थापना केली. 
 • मुंबई आर्य समाजाचे ते पहिले अध्यक्ष होते. 
 • क्रांतिकारी शहीद मदनलाल ढिंगरा त्यांच्या प्रिय शिष्यांपैकी एक होते. 
 • विनायक दामोदर सावरकर यांनी वर्मा यांचे मार्गदर्शन घेत लंडनमध्ये लेखनकार्य केले. 
 • ३० मार्च १९३० रोजी जिनेव्हात त्यांचे देहावसान झाले. 
 • गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वित्झर्लंडला विनंती करीत त्यांच्या पत्नी भानुमती यांच्या अस्थी भारतात आणल्या.
Shyamji Krishna Varma - Wikipedia
श्यामजी कृष्ण वर्मा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *