शाश्वत विकास लक्ष्ये (Sustainable Development Goals)

* सहस्त्रक विकास लक्ष्याची (MDGs) यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर जगभरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांनी २०१५ नंतरचा विकासाचा नवीन अजेंडा शाश्वत विकास लक्ष्यांच्या स्वरूपामध्ये तयार केला.

* संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या (Open Working Group – COWG)ने या संदर्भात बंधनकारक असणाऱ्या दस्तावेजाची निर्मिती केली. या दस्तावेजाचे शीर्षक ” The future we want” असे आहे.

* जून २०१२ मध्ये पार पडलेल्या Rio+20 परिषदेनंतर जुलै २०१४ मध्ये १७ कलमी SDGs ची निर्मिती करण्यात आली.

* शाश्वत विकासाशी संबंधित आर्थिक विकास, सामाजिक समावेशन व पर्यावरण संरक्षण आदी मुद्यांवर यामध्ये भर देण्यात आला आहे.

* २५ सप्टेंबर २०१५ ला पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास परिषदेच्या शेवटी जगभरातील नेत्यांनी २०३० शाश्वत विकासाचा अजेंडा स्वीकारला.

या अजेंडय़ातील १७ उद्दिष्टय़े पुढीलप्रमाणे –

१) सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे. (No poverty)

२)भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. (Zero Hunger)

३) आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. (Good health and well being)

४)सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे. (Quality Education)

५)लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे. (Gender Equality)

६)पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे. (Clean Water and sanitation)

७)सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे. (Affordabale and clean energy)

८)शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे. (Decent work and economic growth)

९)पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे. (Industry, Innovation and Infrastructure)

१०)विविध देशांमधील असमानता दूर करणे. (reduce Inequalities)

११)शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे. (Sustainable cities and Communities)

१२)उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे. (Responsible Consumption and Production)

१३)हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे. (Climate Action)

१४)महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे. (Life Below Water)

१५)परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे. (Life on land)

१६)शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे. (Peace, Justice and strong Institution)

१७)चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे. (Partnership for the Goals)

१७ लक्ष्ये व १६९ उद्दिष्टांसह SDGs ची व्याप्ती अधिक आहे. यामध्ये शाश्वत विकासाचे महत्त्वपूर्ण आयाम असणाऱ्या आíथक विकास, सामाजिक समावेशन व पर्यावरण संवर्धन यांचा अंतर्भाव होतो.

* SDGs वैश्विक आहेत, जगातील सर्व देशांना लागू असल्याने MDGs पेक्षा ते अधिक सर्वसमावेशक आहेत.

*MDGs ची व्याप्ती विकसनशील देशापुरती मर्यादित होती.

©MPSCmantra

अधिक माहितीसाठी आमचे टेलिग्राम channel Join करा @MPSCmantra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *