रेपो दर दृष्टीक्षेपात

रेपोदर म्हणजे काय?
दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो दर म्हणतात.

रेपो दराचे महत्त्व :-
❀ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेटचा वापर केला जातो.
❀ महागाई वाढल्यास रिझर्व बँक हा दर वाढवते.परिणामी बँका RBI कडून कमी कर्ज घेतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी होतो आणि अशा प्रकारे महागाई रोखण्यात मदत होते.
❀ मंदीच्या काळात रिझर्व बँक हा दर कमी करते. परिणामी बँका RBI कडून जास्त कर्ज घेतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढतो आणि अशा प्रकारे तेजी निर्माण होते.
❀ रेपो आणि रिव्हर्स रेपो दर तरलता समायोजन सुविधेचा एक भाग बनतात.

२०१९-२० या आर्थिक वर्षातील दर
❀ एप्रिल २०१९ – ६.००%
❀ जून २०१९ – ५.७५%
❀ ऑगस्ट २०१९ – ५.४०%
❀ ऑक्टोबर २०१९ – ५.१५%

❀ आजवरचा सर्वाधिक रेपो दर : १४.५०% (ऑगस्ट २०००)

❀ आजवरचा सर्वांत कमी रेपो दर : ४.२५% (एप्रिल २००९)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *