रेड डेटा बुक (Red Data Book)

# Red Data Book

विविध प्रजातीची स्थिती दर्शवणे व त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाय नमूद करण्यासाठी IUCN तर्फे ‘रेड डेटा बुक चे प्रकाशन केले जाते. IUCN चे वर्गीकरण IUCN च्या Red List मध्ये प्रजातींना त्याच्या स्थिती नुसार ऐकून नऊ श्रेणीमध्ये विभाजित केले जाते. (भारतातील ९८८ प्रजाती त्यात आहेत) या श्रेणीची रचना प्रजातीच्या संख्येमध्ये होत असलेला ऱ्हास आणि संबंधित भौगोलिक क्षेत्रामधील विवक्षित जातीची स्थिती या आधारावर केली जाते .

Red List मधील नऊ श्रेण्या पुढील प्रमाणे:

विलुप्त (Extinct – Ex) –

➡ ज्या प्रजातीचा कोणताही सदस्य जीवित नाही तसेच विश्वभरातील सर्व आवासांमधील त्याची संख्या पूर्णपणे समाप्त झाली आहे अशी विश्वसनीय माहिती प्राप्त झाली असेल तर तिला विलुप्त प्रजाती म्हणतात. उदा. आशियाई चित्ता

वनांमधून विलुप्त (Extinct in the wild – EW )

➡ जी प्रजाती तिच्या नैसर्गिक आवासामधील समाप्ती झाली आहे व तिच्या विविध प्रजातीना प्राणी संग्रहालये वा अन्य कृत्रिम आवासातून ठेवले आहे. अशा प्रजातींना ‘EW ‘ श्रेणीत टाकतात. उदा. हवाई येथील कावळा

गंभीर संकटग्रस्त (Critically Endangered) CR

➡या श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक अटी

–          गेल्या दहा वर्षांमध्ये प्रजातीच्या जनसंख्येमध्ये ९०% पेक्षा जास्तीचा ऱ्हास नमूद केला गेला असेल तर

–          प्रजातीची जनसंख्या २५० पेक्षा कमी असेल आणि गेल्या ३ वर्षात २५% घट झाली असेल तर

–          फक्त पन्नास वा त्यापेक्षा कमी परिपक्व सदस्य संख्या उरलेली असेल तर

–          गेल्या दहा वर्षामध्ये ५०% पर्यत प्रजातीच्या विलुप्त होण्याची संभावना (Probability) असेल तर.

➡गंभीर संकटग्रस्त श्रेणी ही विलुप्त श्रेणीच्या निकट मानली जाते. त्यामुळे या श्रेणीतील प्रजातीच्या संरक्षणासाठी तातडीची पावले उचलणे क्रमप्राप्त ठरते. उदा. काश्मिरी काळवीट किंवा हंगूल, सैबेरियन क्रेन, घडियाल

©www.mpscmantra.com

संकटग्रस्त (Endangered – EN )

➡ या श्रेणीतील प्रजातीचा वनांमधुन विलुप्त होण्याचा धोका असतो.

➡ या श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक अटी

– गेल्या दहा वर्षात प्रजातीच्या संख्येत ७०% कमी नमूद केली गेली असेल.

– केवळ २५० वा त्यापेक्षा कमी परिपक्त सदस्य संख्या बाकी असेल.

– येत्या २० वर्षांमध्ये २०% प्रजातीच्या विलुप्त होण्याची आशंका असेल.

– प्रजातीची जनसंख्या २५०० पेक्षा कमी असेल आणि ५ वर्षा मध्ये २०% कमी होण्याची संभावना असेल तर

➡ उदा. सध्या चर्चेत असलेली कच्छच्या रणातील जंगली खेचरे, आशियाई सिंह, आपला राष्ट्रीय जलपशू डॉल्फिन, खवलेमांजर

दुर्बल (Vulnerable – VU )

➡ या श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक अटी:

– प्रजाती संख्येमध्ये १० वर्षांमध्ये ३०% पेक्षा जास्त घट नमूद केली गेली असेल .

– प्रजाति जनसंख्या १० हजार पेक्षा कमी आणि १० वर्षांमध्ये १०%ची घट झाली असेल तर

– केवळ १००० वा त्यापेक्षा कमी परिपक्व सदस्य संख्या बाकी असेल तर

➡ उदा. भारतीय गवा, ऑलिव्ह रिडले कासव

©www.mpscmantra.com

निकट संकटग्रस्त (Near Threatened -NT )

➡ प्रजातीच्या निकट भविष्यात संकटग्रस्त श्रेणीत जाण्याची शक्यता असेल तर

किमान धोका ( Least Concern – LC )

➡ कमी धोका – विस्तुत क्षेत्रात अधिक संख्येने प्राप्त भविष्यात ‘संकटग्रस्त’ होण्याचा धोका नसतो.

माहितीचा अभाव (Data Deficient)

➡ या श्रेणीमध्ये आकडेवारीच्या अभावामुळे प्रजातीच्या संकट स्थिती व संरक्षणासबंधी माहिती मिळत नाही.

मूल्यमापन न केलेली (Not Evaluated)

➡ या श्रेणीतील प्रजातीच्या संरक्षित स्थितीचा IUCN च्या संरक्षण मानकानुसार आकलन केले गेलेले नसते.

IUCN (International Union for conservation nature) ही संस्था वैश्विक स्तरावर गेल्या ५० वर्षांपासून प्रजाती, उपप्रजाती व त्याचे प्रकार याच्या संरक्षणा साठी प्रयत्न करते. प्रजातीच्या विलुप्त होण्याचा धोक्यापासून सावध करणे व प्रजातीच्या संरक्षणाला प्राधान्य देणे हा IUCNचा प्रमुख उद्देश आहे. ही एक स्वयंसेवी संस्था असून मुख्यालय ग्लॅन्ड, स्वित्झर्लंड येथे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.