राज्य सेवा परीक्षा स्वरूप (Basic Info About MPSC Rajyaseva Exam )

राज्यसेवा परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती

राज्यसेवा परीक्षे अंतर्गत भरण्यात येणारी पदे :- 

 1. उप संचालक/प्रकल्प अधिकारी (एकांत्मिक अदिवासी विकास प्रकल्प श्रेणी एक)/ उपायुक्त, गट-अ 
 2. उप जिल्हाथिकारी, गट – अ
 3. पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ
 4. सहाय्यक राज्यकर आयुक्त,गट-अ
 5. उपनिबंधक, सहकारी संस्था,गट-अ
 6. उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ
 7. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
 8. मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ
 9. अधीक्षक, रान्य उत्पादन शुल्क, गट-अ
 10. शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा)
 11. प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन/ सहायक आयुक्त, गट-अ
 12. उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ
 13. तहसिलदार, गट – अ
 14. सहायक संचालक, कोशल्व विकास, रोजगाए व उद्योजकता, गट-अ
 15. उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा,गट-ब (प्रशासन शाखा)
 16. कक्ष अधिकारी, गट-ब (मंत्रालयीन विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग)
 17. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब
 18. लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा
 19. सहावक गट विकास अधिकारी, गट-ब
 20. मुख्याधिकारी, नगरपालिका /नगर परिषद,गट- ब
 21. सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब
 22. उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब
 23. उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब
 24. सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब
 25. कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता- मार्गदर्शन अधिकारी, गट-ब
 26. उद्योग अधिकारी,तांत्रिक, गट-ब
 27. सहायक प्रकल्प अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/प्रशासकीय अधिकारी/संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब
 28. नायब तहसिलदार, गट-ब

परीक्षेचे टप्पे –

 • पूर्व परीक्षा : ४०० गुण
 • मुख्य परीक्षा : ८०० गुण
 • मुलाखत : १०० गुण

वयोमर्यादा :

 • किमान वय : १९ वर्षे 
 • कमाल वय : खुला ३८, मागासवर्ग (४३), दिव्यांग (४५), अनाथ (४३), माजी सैनिक (४३- खुला, ४८- मागास), खेळाडू (४३)

शैक्षणिक पात्रता :-

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
 • पदवीच्या शेवटच्या वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
 • शारीरिक पात्रता :- 

पोलीस उप अधीक्षक (DySP) / सहायक पोलीस आयुक्त (ACP) 

 • पुरुष :  उंची– १६५ सें. मी., छाती– न फुगविता ८४ से.मी. फुगविण्याची क्षमता-किमान ५ से.मी. आवश्यक
 • महिला – उंची – १५७ सें. मी.

अधीक्षक/उपअधीक्षक (राज्य उत्पादनशुल्क, गट-अ)

 • पुरुष – उंची-१६५ से. मी. छाती – न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता- किमान ५ से.मी. आवश्यक
 • महिला – उंची . १५५ सें. मी.

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट – ब

 • पुरुष – उंची-१६५ सें. मी., छाती – न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता- किमान ५ से.मी. आवश्यक
  महिला – उंची १६३ सें. मी.
  चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आणि रातांधळेपणा नसावा.

परीक्षा फिस :

 • पूर्व परीक्षा : मागास – ३२४ रुपये, खुला – ५२४ रुपये
 • मुख्य परीक्षा : मागास – ३२४ रुपये, खुला – ५२४ रुपये

पूर्व परीक्षा :- 

 • एकूण पेपर – दोन 
 • एकूण गुण – ४०० 
 • परीक्षेचा कालावधी – दोन तास (प्रती पेपर)
 • प्रश्नांचे स्वरूप – बहुपर्यायी (MCQs)
 • पेपर पहिला (सामान्य अध्ययन) – एकूण प्रश्न (१००), एकूण गुण (२००) (प्रत्येक प्रश्न २ मार्कसाठी)
 • पेपर दुसरा (CSAT) – एकूण प्रश्न (८०), एकूण गुण (२००) (प्रत्येक प्रश्न २.५ मार्कसाठी)
 • परीक्षा केंद्र : जिल्ह्याचे मुख्यालय 
 • Negative Marking : १/३
 • भरावयाच्या पदाच्या १२ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात.

मुख्य परीक्षा :- 

 • पूर्व परीक्षेसाठी आयोगाने निश्चित केलेला cutoff पार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येते.
 • परीक्षेचे टप्पे : दोन (लेखी परीक्षा- ८०० गुण + मुलाखत १०० गुण)
 • एकूण प्रश्नपत्रिका : सहा 
 • भाषा पेपर १ – मराठी (५० गुण) + इंग्रजी (५० गुण), स्वरूप – वर्णनात्मक, वेळ – ३ तास 
 • भाषा पेपर २ – मराठी (५० गुण) + इंग्रजी (५० गुण), स्वरूप – बहुपर्यायी, वेळ – १ तास 
 • सामान्य अध्ययन १ – एकूण प्रश्न – १५०, एकूण गुण – १५०, स्वरूप – बहुपर्यायी, वेळ – २ तास 
 • सामान्य अध्ययन २ – एकूण प्रश्न – १५०, एकूण गुण – १५०, स्वरूप – बहुपर्यायी, वेळ – २ तास 
 • सामान्य अध्ययन ३ – एकूण प्रश्न – १५०, एकूण गुण – १५०, स्वरूप – बहुपर्यायी, वेळ – २ तास 
 • सामान्य अध्ययन ४ – एकूण प्रश्न – १५०, एकूण गुण – १५०, स्वरूप – बहुपर्यायी, वेळ – २ तास 
 • परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर 
 • Negative Marking : १/३

Leave a Reply

Your email address will not be published.