राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2019

  • सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 12 ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी २२ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबई येथे केली.
  • विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने खालील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
  • १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • सन १९७६ पासून राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
  • नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट (मराठी), कीर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगीत, तमाशा लोककला या बारा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो.

यंदाचे विजेते :-

क्षेत्र विजेते
नाटक सतीश पुळेकर
कंठ संगीत कमल भोंडे
उपशास्त्रीय संगीत मंगलाताई जोशी
मराठी चित्रपट मनोहर आचरेकर
कीर्तन तारा राजाराम देशपांडे
शाहिरी शाहीर अंबादास तावरे
नृत्य रत्नम जनार्धनम्
आदिवासी गिरीजन नीलकंठ शिवराम उईके
वाद्यसंगीत अप्पा वढावकर
तमाशा हसन शहाबुद्दीन शेख
लोककला लताबाई सुरवसे
कलादान सदाशिव देवराम कांबळे
  • स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *