महाराष्ट्र लोकसवा आयोगाद्वारे वन सेवा विभागातील साहाय्यक वन संरक्षक गट ‘अ’ (अउा) व वनक्षेत्रपाल – गट ‘ब’ (फाड) या पदांसाठी एकाच परीक्षेद्वारे निवड केली जाते. अंतिम गुणवत्ता यादीतील गुणांच्या आधारे वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल अशी उमेदवारांची नेमणूक होते.
परीक्षेचे टप्पे
- पूर्वपरीक्षा- १०० गुण
- मुख्य परीक्षा- ४०० गुण
- मुलाखत- ५० गुण
परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता –
वनस्पतीशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अॅॅप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपकी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारात विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पूर्व परीक्षा
- पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी चाळणी परीक्षा असते.
- याकरता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषेइतके अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असते.
- पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी गृहीत धरले जात नाहीत.
अभ्यासक्रम :
- मराठी भाषा
- इंग्रजी भाषा
- जागतिक, भारतातील चालू घडामोडी.
- बुद्धिमत्ता आणि अंकगणित.