महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ (Short Notes-Part 1 )

१९४९ चा अधिनियम क्रमांक २५
एकूण कलमे १४९
एकूण अनुसूची तीन
एकूण प्रकरणे अकरा
पूर्वीचे नाव मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९
उद्देश : महाराष्ट्रात दारूबंदीच्या धोरणाचे प्रचालन करणे, ते अमलात आणणे व त्याची अमलबजावणी करणे.

प्रकरण एक : प्रारंभिक
कलम १: संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ
 नाव : महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९
 संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू
कलम २: व्याख्या
 प्राधिकारपत्र – कलम ४५ अन्वये धार्मिक विधीसाठी दारूचा उपयोग करण्याकरिता दिलेले प्राधिकरपत्र
 बाटलीत भरणे – विकण्यासाठी कोणताही पदार्थ पिंपातून किंवा इतर भांड्यातून काढून बाटली, बरणी, कुपी किंवा तत्सम पात्रात भरणे.
 जिल्हाधिकारी – जिल्हाधिकार्‍याची सर्व/कोणतेही कार्य/कर्तव्य/अधिकार चालविण्यासाठी राज्य शासनाने नेमलेला अधिकारी
 आयुक्त – या अधिनियमाच्या ‘कलम ३’ अन्वये ‘दारूबंदी व उत्पादनशुल्क आयुक्त’ म्हणून नेमण्यात आलेला अधिकारी.
 समिती किंवा मंडळ – कलम ७ अन्वये राज्य शासनाने नेमलेली समिती किंवा मंडळ. (१९६० मध्ये मंडळ हा शब्द टाकण्यात आला.)
 दारूचा गुत्ता – दारू पिण्याची सोय केलेली किंवा कमाईसाठी दारू पिण्याची किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याची परवानगी दिली असेल अशी जागा म्हणजे ‘दारूचा गुत्ता’ होय. यामध्ये दारू सेवन करण्याकरिता जिचा वारंवार उपयोग होतो अशा कोणत्याही जागेचा समावेश होतो.
 देशी दारू – भारतात उत्पादन किंवा तयार केलेली सर्व प्रकारची दारू.
 लागवड करणे – बी लावून रोपटे वाढवणे, त्याची जोपासना व रक्षण करणे.
 विप्रकृत (Deformed)– मनुष्याच्या सेवनास अयोग्य करण्याकरिता ज्यावर विहित केलेली क्रिया केली आहे.
 विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ – विप्रकृत मद्यसार वापरुन केलेला कोणताही सिद्धपदार्थ (Proven substance). त्यामध्ये मद्यसार यापासून तयार केलेले लाखरोगण, फ्रेंच पॉलिस व वॉर्निश याचा समावेश होतो.
 पिणे – कोणत्याही मादक द्रव्याचे सेवन करणे.
 उत्पादनशुल्कयोग्य पदार्थ –
१) मद्यर्कयुक्त पेय
२) मादक औषधी
३) आफू
४) राज्य शासनाद्वारे उत्पादनशुल्कयोग्य पदार्थ म्हणून अधिसूचित इतर पदार्थ.
 उत्पादनशुल्क व प्रतिशुल्क – राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीतील सूची २ मधील नोंद ५१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे असलेले शुल्क.
 उत्पादनशुल्क महसूल – या अधिनियमाअन्वये किंवा मादक द्रव्यासंबंधित इतर कायद्याअन्वये बसविलेले कोणतेही शुल्क, फी, कर, दंड (अपवाद: न्यायालयाने बसविलेला दंड) किंवा आदेशाअन्वये जप्त किंवा सरकारजमा माल यापासून मिळणारा महसूल.
 निर्यात करणे – कलम १४७ व्यतिरिक्त सीमाशुल्क सरहद्द न ओलांडता इतर रीतीने राज्याबाहेर नेणे.
 परदेशी दारू – भारताबाहेर उत्पादन किंवा तयार केलेली सर्व प्रकारची दारू. राज्य शासनाला कोणत्याही विशिष्ट प्रकारची देशी दारू परदेशी दारू आहे असे घोषित करण्याचा अधिकार आहे.
 भांग – भांगेच्या ज्या झाडापासून मादक औषधी द्रव्ये तयार करता येतात ते भारतातील कोणत्याही प्रकारचे भांगेचे झाड.
 हॉटेल लायसन – कलम ३५ नुसार दिलेले लायसन
 कुटुंब – एकाच घरातील व्यक्ति म्हणून एकत्र राहणार्‍या आणि जेवण घेणार्‍या व्यक्तींचा गट. (त्यात नोकरांचा समावेश होत नाही.)
 आयात करणे – सीमाशुल्क सरहद्द न ओलांडता इतर रीतीने राज्यात आणणे. (कलम १४७ मध्ये याचा अर्थ या व्याख्येप्रमाणे होत नाही)
 अंतरिम परवाना – कलम ४७ नुसार दिलेला परवाना
 मादक द्रव्य – कोणतीही दारू, मादक औषधी द्रव्य, आफू किंवा राज्य शासनाद्वारे मादक द्रव्य म्हणून अधिसूचित कोणताही इतर पदार्थ.
 मादक औषधी द्रव्य –
१) भारतातील भांगेच्या झाडाची पाने, बारीक देठ, फुले किंवा फळे येणारी बोंडे. (यात भांग, सिद्धी किंवा गांजा या सर्व प्रकारांचा समावेश होतो) (भांगेच्या झाडाचे वैज्ञानिक नाव – कॅनॅबिस सॅटिव्हा एल)
२) चरस – कोणत्याही क्रिया ज्यावर करण्यात आलेल्या नाहीत अशी भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ. (अपवाद- संवेष्टण व परिवहन यासाठी आवश्यक असलेली क्रिया)
३) वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या मादक औषधी द्रव्याचे तयार केलेले कोणतेही मिश्रण किंवा पेय.
 दारू –
१) मद्यसार (Alcoholism), वाईन, बियर, ताडी आणि मद्यर्काचे बनलेले सर्व प्रवाही पदार्थ
२) राज्य शासनाद्वारे दारू म्हणून अधिसूचित कोणताही मादक पदार्थ
 तयार करणे –
१) दारू किंवा मादक औषधी द्रव्ये यांचे उत्पादन केले जाते ती प्रत्येक क्रिया. दारू किंवा मादकद्रव्ये शुद्ध करण्यासाठी, स्वादयुक्त करण्यासाठी किंवा रंग देण्यासाठी केलेली प्रत्येक क्रिया. (अपवाद – खासगी सेवनासाठी जवळ बाळगलेली दारू)
२) झाडापासून ताडी तयार करण्याची प्रत्येक क्रिया
 वैद्यकीय मंडळ – कलम ८ अन्वये रचना केलेले मंडळ
 मोहाचे फूल – मोहाच्या झाडाचे फूल. यात फळाचा किंवा बीचा समावेश होत नाही.
 काकवी – गूळ किंवा साखर तयार करण्याच्या अखेरच्या अवस्थेत उत्पन्न जड काळसर रंगाचा ज्यामध्ये अंबवता येण्याजोगी द्रवरूप किंवा तरंगणारी साखर आहे असा चिकट द्रव्य पदार्थ. तसेच उसापासून तयार केलेल्या व काळा गूळ (गूळ), कुजका गहू (गूळ), राब किंवा कुजका राब या नावाने ओळखण्यात येणार्‍या पदार्थांचा यामध्ये समावेश होतो.
 पदार्थ कोणत्याही रंगाचे असले तरी पुढील घटकांचा समावेश असलेल्या साखरयुक्त पदार्थाचा देखील काकवीत समावेश होतो:
१) डेक्ट्रोज व लेव्हूलोज मिश्रित साखर (इन्व्हर्ट) (९०% पेक्षा कमी एकूण साखर + ६०% पेक्षा कमी ऊसाची साखर) किंवा
२) पाण्यामध्ये २% पेक्षा जास्त प्रमाणात अद्राव्य असलेली कोणतीही बाह्य वस्तु ; किंवा
३) एकूण ६% पेक्षा जास्त असेल अशी राख; किंवा
४) हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये ०.५% पेक्षा अधिक म्पमनात अद्राव्य असलेली राख; किंवा
५) १०% पेक्षा अधिक प्रमाणात आर्द्रता; किंवा
६) ७० पीपीएम (पार्ट्स पेर मिलियन) पेक्षा अधिक प्रमाणात संहत असलेले सल्फरडाय ऑक्साइड
 पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी –
१) बृहन्मुंबईत – मुंबई पोलिस अधिमियम, १९५१ च्या तरतुदीप्रमाणे.
२) इतर ठिकाणी – फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ यात व्याख्या केल्याप्रमाणे
 आफू –
१) खसखशीच्या झाडाची बोंडे. (मूळ स्थिती/काप/चुरा/भुकटी) (खसखशीचे वैज्ञानिक नाव – पॅपॅव्हर सॉम्निफेरम एल)
२) कोणतीही क्रिया करण्यात आलेली नाही असा बोंडाचा रस. (अपवाद- संवेष्टण व परिवाहनासाठी केलेली क्रिया)
३) वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या आफुचे गुणविरहित पदार्थ घालून किंवा त्याशिवाय तयार केलेले कोणतेही मिश्रण.
– अपवाद –
१) यात शेकडा ०.२ पेक्षा अधिक प्रमाणात मॉर्पिन नसलेल्या अशा कोणत्याही पदार्थाचा समावेश होत नाही.
२) घातक औषधी द्रव्य अधिनियम, १९३० कलम २ यात व्याख्या केल्याप्रमाणे तयार केलेल्या औषधी द्रव्याचा समावेश होत नाही.
 परवाना – या अधिनियमाच्या तरतुदीअन्वये दिलेला परवाना.
 पोलिस ठाणे –
– बृहन्मुंबईसाठी – मुंबई पोलिस अधिनियम, १९५१ अन्वये तरतूद केलेला पोलिस विभाग.
– इतर ठिकाणी – फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ अन्वये पोलिस ठाणे म्हणून जाहीर केलेले ठिकाण.
 दारूबंदी अधिकारी – आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा या अधिनियमाद्वारे कोणतेही कर्तव्य पार पाडण्यासाठी नेमण्यात आलेला अधिकारी किंवा व्यक्ती. यात कर्तव्य सोपवून देण्यात आलेल्या समितीच्या, मंडळाच्या किंवा वैद्यक मंडळाच्या कोणत्याही सदस्याचा समावेश होतो.
 राज्य – महाराष्ट्र राज्य
 शुद्ध करणे – ज्या क्रियेने दारू शुद्ध करण्यात येते अशी प्रत्येक क्रिया.
 नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी – कायद्यांन्वये ज्याला राज्यात कोणत्याही वैद्यकीय पद्धतीनुसार व्यवसाय करण्याचा अधिकार आहे अशी व्यक्ती. त्यात दंत वैद्य अधिनियम, १९४८ नुसार नोंदलेले दंतवैद्य आणि मुंबई पशू वैद्यक व्यवसायी अधिनियम, १९५३ अन्वये किंवा राज्यातील कोणत्याही कायद्यांअन्वये नोंदलेले पशूवैद्यक व्यवसायी यांचा समावेश होतो.
 विकणे –
१) कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण (मोबदला घेऊन किंवा न घेता)
२) एकमेकांच्या सोयीसाठी पुरविणे किंवा वाटप करणे
३) एखाद्या क्लबने आपल्या सदस्यास मोबदला घेऊन कोणत्याही प्रकारे पुरविणे
– परंतु त्या शब्दप्रयोगात सीमाशुल्क सरद्दीपलीकडे निर्यात करण्यासाठी आफू विकण्याचा समावेश होत नाही.
 मद्यसार – मद्यार्क असलेली व गाळून तयार केलेली कोणतीही दारू. (ती विप्रकृत केलेली असो व नसो).
 गोड ताडी किंवा नीरा – नारळी/सिंधी/खजुरीच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडापासून काढलेला न अंबवलेला रस.
 राज्याच्या संबंधात ‘क्षेत्रीय जलधी’ – राष्ट्रपतींच्या घोषणेद्वारे समुचित मूळ रेषेपासून मोजलेल्या सहा सागरी मैलांच्या अंतरवरील किंवा वेळोवेळी ठरविण्यात येईल अशा इतर अंतराच्या आत असलेला कोणताही सागरी खुला भाग.
 ताडी – नारळी/सिंधी/खजुरीच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या ताडाच्या झाडापासून काढलेला रस. (अंबवलेला/न अंबवलेला)
 छेदणे – झाडातून रस बाहेर गळावा म्हणून त्याचा कोणताही भाग कापणे किंवा कोणतेही साधन वापरणे.
 प्रवासी – भारतीय नागरिक नसलेली व भारतात प्रवास करण्यासाठी आलेली व्यक्ती.
 प्रवाशाचा परवाना – कलम ४६-क अन्वये दिलेला परवाना
 व्यापार व आयात लायसन – कलम ३३ अन्वये दिलेले लायसन
 परिवहन करणे – राज्यात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेणे.
 विक्रेत्याचे लायसन – कलम ३४ अन्वये दिलेले लायसन
 अभ्यागताचा परवाना – कलम ४६ अन्वये दिलेला परवाना
प्रकरण दोन : आस्थापना
कलम ३: दारूबंदी व उत्पादनशुल्क आयुक्त
– नेमणूक – राज्यशासन
– नियंत्रण – राज्यशासन
– कार्य – या अधिनियमाच्या अमलबजावणीची देखरेख व त्याच्या तरतुदी पार पाडणे, राज्य शासणाकडून सोपविलेले इतर कर्तव्ये.
– ‘दारूबंदी व उत्पादनशुल्क संचालक’ हे पद धारण करणारी व्यक्ती राज्याचा ‘दारूबंदी व उत्पादनशुल्क आयुक्त’ असेल आणि राज्यशासन निर्देश देईपर्यंत ते पद धारण करतील.
कलम ४: जिल्हाधिकारी
– जिल्हाधिकारी या अधिनियमाच्या तरतुदींनुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करील.
– मुंबईच्या जिल्हाधिकार्‍यासाहित सर्व जिल्हाधिकारी आयुक्तास दुय्यम असतील.
– राज्यशासनास जिल्हाधिकार्‍याला नेमून दिलेली सर्व किंवा कोणतेही अधिकार कोणत्याही जिल्ह्यात/ठिकाणी चालविण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीस नेमता येईल.
कलम ५: दुय्यम अधिकारी
– नेमणूक – राज्यशासन
– उद्देश – आयुक्तास व जिल्हाधिकार्‍यास सहाय्य करण्यासाठी
कलम ६: या अधिनियमान्वये असलेले अधिकार व कर्तव्ये पोलिस विभागाच्या आणि इतर विभागांच्या अधिकार्‍यांकडे सोपविणे
– पोलिस विभागाच्या कोणत्याही अधिकार्‍याकडे किंवा इतर कोणत्याही विभागाच्या अधिकार्‍याकडे
– कोणत्याही व्यक्तीकडे (अशा व्यक्तींना राज्यशासन पादनाम देऊ शकते)
कलम ६क : तज्ञ मंडळ
– राज्य शासन एक तज्ञ मंडळ स्थापन करील.
– रचना – कमीत कमी पाच सदस्य
– कार्यकाल – राज्यशासनाची मर्जी असेल तोपर्यंत
– गणपूर्ती – किमान तीन सदस्य
– रिक्त जागा शक्य तितक्या लवकर भरण्यात येईल. जागा रिक्त असली तरी कार्य थांबणार नाही.
– कर्तव्य – मद्यार्क असलेला कोणताही ‘औषधीय/प्रसाधणीय सिद्धपदार्थ/पूर्तीप्रतिबंधक सिद्धपदार्थ/स्वाद आणणारा अर्क किंवा सरबत’ मादक दारू म्हणून वापरण्यासाठी योग्य आहे किंवा नाही या प्रश्नावर सल्ला देणे. असा सल्ला मिळाल्यावर राज्य शासन कोणताही पदार्थ मादक दारू आहे की नाही हे ठरविल.
– वर नमूद केलेला कोणताही पदार्थ हा कैफ आणणारी दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे असे राज्य शासन ठरविल तोपर्यंत असा प्रत्येक पदार्थ वापरण्यास अयोग्य आहे. (कैफ – दारू पिऊन आलेला उन्मत्तपणा).
कलम ७: इतर मंडळे आणि समित्या
– राज्य शासन नेमू शकते
– उद्देश – तरतुदी पार पाडण्यासाठी अधिकार्‍यांना सल्ला/सहाय्य देण्याकरिता
– अशा इतर मंडळ व समित्यांची कामे, रचना, कार्यपद्धती अधिकृत करण्यात येतील.
– अशा इतर मंडळाच्या व समितीच्या सदस्यांना राज्य शासन फी व भत्ते देईल.
कलम ८: वैद्यक मंडळे
– राज्यशासन कोणत्याही क्षेत्रांकरिता योग्य अशी सदस्य संख्या असलेल्या एका किंवा अनेक वैद्यक मंडळांची स्थापना करू शकते.
– अशा वियद्यक मंडळाची कामे व कार्यपद्धती विहित करण्यात येतील.
– सदस्यांना विहित केल्यानुसार फी व भत्ते मिळतील.
कलम ९: दारूबंदी अधिकार्‍यांवर व इतर अधिकार्‍यांवर आयुक्ताचे नियंत्रण
– सर्व दारूबंदी अधिकारी आणि पोलिस व इतर विभागाचे अधिकारी या अधिनियमान्वये अधिकार चालविताना आयुक्ताच्या नियंत्रणाखाली असतील; व आयुक्त वेळोवेळी जे आदेश देईल ते पाळणे त्यांना बंधनकारक आहे.
कलम १०: प्रत्यायोजन (Delegation) (प्रत्यायोजन – प्रतिनिधीला अधिकार सुपूर्द करणे)
– राज्य शासनाला आयुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकार्‍याकडे या अधिनियमानुसार कोणतेही अधिकार सुपूर्द करता येतील.
प्रकरण तीन : मनाई
कलम ११: मादक द्रव्य तयार करणे इत्यादीसाठी या अधिनियमास अनुसरून परवानगी देणे
– लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र याच्या अटी व शर्तीस अनुसरून पुढील गोष्टींसाठी परवानगी देणे हे कायदेशीर असेल:
– कोणतेही मादक द्रव्य/भांग यांची आयात करणे, निर्यात करणे, परिवहन करणे, तयार करणे, बाटल्यात भरणे, विकणे, खरेदी करणे, जवळ बाळगणे, वापरणे, सेवन करणे, भांगेची लागवड करणे किंवा ती गोळा करणे, कोणतेही ताडी देणारे झाड छेदणे किंवा छेदणीस परवानगी देणे, अशा झाडापासून ताडी काढणे.
कलम १२: दारू तयार करण्यास व दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधण्यास किंवा चालविण्यास मनाई
– कोणतीही व्यक्ती –
१) दारू तयार करणार नाही;
२) दारूची भट्टी/दारू गाळण्याचा कारखाना बांधणार/चालविणार नाही;
३) दारू आयात/निर्यात/परिवहन करणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही;
४) दारू विकणार किंवा विकत घेणार नाही.
कलम १३: दारूची विक्री वगैरे करण्यास मनाई
– कोणताही व्यक्ती –
१) दारू विकण्यासाठी बाटलीत भरणार नाही;
२) दारूचे सेवन करणार नाही किंवा ती वापरणार नाही;
३) दारू तयार करण्याचे कोणतेही साहित्य वापरणार नाही किंवा स्वतःजवळ बाळगणार नाही.
कलम १४: मादक औषधी द्रव्ये निर्यात, आयात, परिवहन करणे, विकणे, तयार करणे वगैरे यास मनाई
– कोणतीही व्यक्ती –
१) कोणतेही मादक औषधीद्रव्य निर्यात, आयात, परिवहन करणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.
२) भांगेची लागवड करणार नाही किंवा ती गोळा करणार नाही.
३) कोणतेही मादक औषधीद्रव्य तयार करण्याचे कोणतेही साहित्य वापरणार नाही किंवा स्वतःजवळ बाळगणार नाही.
४) विकणार किंवा विकत घेणार नाही.
५) सेवन करणार नाही किंवा वापरणार नाही.
६) तयार करणार नाही.
कलम १५: गोड ताडीची आयात, निर्यात, परिवहन, विक्री वगैरेस मनाई
– कोणतीही व्यक्ती –
१) गोड ताडी किंवा नीरा आयात, निर्यात, परिवहन करणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.
२) विकण्यासाठी बाटलीत भरणार नाही.
३) विकणार किंवा विकत घेणार नाही.
कलम १६: ताडी देणारी झाडे छेदण्यास व त्यापासून ताडी काढण्यास मनाई
– कोणतीही व्यक्ती –
– ताडी देणारे झाड छेदणार नाही किंवा छेदण्याची परवानगी देणार नाही.
– कोणत्याही झाडापासून ताडी काढणार नाही किंवा काढण्याची परवानगी देणार नाही.
कलम १७: आफू जवळ बाळगणे वगैरेस मनाई
– कोणतीही व्यक्ती –
– आफू जवळ बाळगणार नाही; परिवहन, आयात, निर्यात करणार नाही; विकणार किंवा विकत घेणार नाही; सेवन करणार नाही किंवा वापरणार नाही.
कलम १८: अज्ञान व्यक्तींना मादक द्रव्य विकण्यास मनाई
– लायसन दिलेल्या विक्रेत्याने (त्याच्या वतीने किंवा त्याच्या नोकरीत असलेल्या व्यक्तीनेही) कोणत्याही अज्ञान व्यक्तींना कोणतेही मादक द्रव्य विकणार नाही किंवा देणार नाही.
कलम १९: ताडी विकण्यास मनाई (हे कलम वगळण्यात आले आहे.)
कलम २०: चरसाचे उत्पादन करणे, वगैरे यास मनाई
– कोणतीही व्यक्ती खलील गोष्टी करणार नाही –
 चरसाचे उत्पादन, तयार करणे, जवळ बाळगणे, निर्यात, आयात, परिवहन करणे, विकत घेणे किंवा विकणे, सेवन करणे किंवा वापरणे.
कलम २१: विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे
– कोणतीही व्यक्ती
१) कोणत्याही विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणार नाही.
२) बदल केलेले विप्रकृत मद्यसार जवळ बाळगणार नाही.
कलम २१-क: विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात बदल करणे.
– कोणतीही व्यक्ती
३) कोणत्याही विप्रकृत केलेल्या मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात बदल करणार नाही.
४) बदल केलेले विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थात जवळ बाळगणार नाही.
कलम २२: कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून वापरण्यासाठी देण्यास मनाई
– कोणतीही व्यक्ती
१) कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून उघडणार/ठेवणार/वापरणार नाही.
२) दारूचा गुत्ता म्हणून उघडण्यात/ठेवण्यात/वापरण्यात आलेल्या जागेवर देखरेख/व्यवस्था/नियंत्रण ठेवणार नाही किंवा तिच्यातील धंदा चालविण्यास सहाय्य करणार नाही.
कलम २२-क: नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीने मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देण्यास मनाई
– नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीखेरीज इतर कोणताही व्यक्ती मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देणार नाही.
– त्या व्यक्तीने अशा मादक दारूचा वापर करणे आवश्यक असल्याचे व त्यापासून त्या व्यक्तिला एखाद्या दुखण्यापासून आराम मिळेल असे नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीला वाटल्यासच मादक दारू औषध पत्रात उपचार म्हणून सुचवेल अथवा नाही.
– नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी, मादक दारूसाठी दिलेल्या प्रत्येक औषध पत्रात पुढील बाबी नोंदविणे आवश्यक आहे:
१) ज्याला देण्यात आले त्याचे नाव व पत्ता
२) औषधपत्र देण्याचा दिनांक
३) तिचा उपयोग करण्याबाबत सूचना
४) कोणत्या प्रमाणात व किती वेळा घ्यावयाचे
५) कोणत्या अजारासाठी दिला ते नमूद करणे आवश्यक
६) एक प्रत देण्याच्या दिनांकापासून एक वर्षापर्यंत जपून ठेवणे आवश्यक.
कलम २३: मादक द्रव्य/भांग वापरण्याची विनंती करण्यास अथवा जनतेतील एखाद्या व्यक्तीस अपराध करण्यास चिथावणी/उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करण्यास मनाई
– कोणताही व्यक्ती-
१) कोणतेही मादक द्रव्य/भांग वापरण्याची विनंती करणार नाही किंवा देऊ करणार नाही.
२) कोणत्याही व्यक्तीस या अधिनियमाखालील अपराध/नियम भंग करण्यास चिथावणी/उत्तेजन देणार नाही.
कलम २४: मादक द्रव्य वगैरे यासंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई
– या कलमानुसार मादक द्रव्य वगैरेची जाहिरात करण्यास बंदी आहे.
– अपवाद: या कलमतील कोणतीही तरतूद पुढील गोष्टीस लागू होणार नाही:
१) आयुक्ताने याबाबत मान्यता दिलेल्या सूची किंवा किंमतीच्या याद्या
२) राज्याबाहेर छापलेल्या व प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही वर्तमानपत्र/पुस्तक इत्यादी मधील जाहिरात.
३) राज्य शासन अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा दिनांकापूर्वी राज्यात छापलेल्या/प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही वर्तमान पत्रात असलेली कोणतीही जाहिरात/मजकूर.
४) या कलमच्या कक्षेतून वगळण्यात आलेली कोणतीही जाहिरात/मजकूर.
– वरील अपवादामध्ये काहीही असले तरी –जाहिरात किंवा मजकूर आहे असे राज्याबाहेर छापलेले कोणतेही वर्तमानपत्र/पुस्तक इत्यादी राज्यात प्रसार/विक्री/वाटप करण्यास राज्य शासन बंदी घालू शकते.
कलम २४-क : हे प्रकरण काही पदार्थास लागू नसणे
– या प्रकरणातील कोणतीही तरतूद पुढील पदार्थास लागू असणार नाही:
– मादक दारू म्हणून वापरण्यास अयोग्य असा मद्यार्क असलेला कोणताही ‘प्रसाधणीय पदार्थ/औषधीय पदार्थ/प्रतिपूर्तीक सिद्धपदार्थ किंवा द्रावण/ स्वाद आणणारा अर्क किंवा सरबत’.
– परंतु असा पदार्थ कलम ५९-क मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळता असेल.
– परंतु असा पदार्थ तयार करण्यासाठी कोणतीही दारू किंवा मद्यार्क कलम ३१-क अन्वये दिलेल्या लायसनशिवाय खरेदी करणार नाही, बाळगणार नाही, वापरणार नाही.
प्रकरण चार : नियंत्रण, विनिमय व सूट
कलम २५: सिद्धपदार्थास सूट देणे
– परिमानानुसार शेकडा प्रमाणापेक्षा अधिक नसेल इतका मद्यार्क असलेल्या कोणत्याही सिद्धपदार्थास या अधिनियमाच्या कोणत्याही तरतूदीपासून सूट देण्याचा राज्य शासन निर्देश देऊ शकते.
कलम २६: मादक द्रव्यांसाठी भट्ट्या व वखारी
– राज्य शासनास –
१) विशिष्ट अटीवर मद्यसार तयार करणारी भट्टी स्थापन/बंद करता येईल.
२) दारूची भट्टी बांधण्यासाठी/चालविण्यासाठी विशिष्ट अटीवर लायसन देता येईल.
३) जेथे शुल्क न देता मादक द्रव्य/भांग/मोहाची फुले/काकवी ठेवता येईल अशी वखार स्थापन करा येईल किंवा परवाना देता येईल. किंवा बंद करता येईल
कलम २७: वखार वगैरे यातून मादक द्रव्य किंवा भांग काढून न नेणे
– पास असल्याशिवाय/शुल्क दिल्याशिवाय/बंध पत्र दिल्याशिवाय मादक द्रव्य/भांग/मोहाची फुले/काकवी कोणत्याही दारूच्या भट्टीतून/वाखारीतून/इतर जागेतून काढून नेता येणार नाही.
कलम २८: आयात, वगैरेसाठी पास
– राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य याची आयात/निर्यात/परिवहन करण्यास पास देण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा इतर कोणत्याही अधिकार्‍यास प्राधिकृत करता येईल.
– असे पास ठराविक मुदतीसाठी/ठराविक प्रकारच्या मादक द्रव्यासाठी/विशिष्ट प्रसंगासाठी/पाठविलेल्या मालासाठी फक्त देता येईल.
– अशा प्रत्येक पासात पुढील गोष्टी विनिर्दिष्ट (Specified) केलेल्या असतील:
१) प्राधिकृत व्यक्तीचे नाव
२) मुदत
३) मादक द्रव्याचे परिमाण व वर्णन
४) आयात/निर्यात/परिवहन ज्या ठिकाणावरून ज्या ठिकाणी करावयाचे ती ठिकाणे.
५) अंतर १० मैलांपेक्षा अधिक असल्यास ज्या मार्गावरून न्यावयाचा आहे तो मार्ग.
कलम २९: थेट वाहतूक
– रेल्वे/जहाज/बोटीद्वारे खुष्किच्या किंवा हवाई मार्गाने पाठविण्यात येणार्‍या कोणत्याही मादक द्रव्याची थेट वाहतूक विही अशा शर्तीच्या अधीन असेल.
कलम ३०: औद्योगिक किंवा वैद्यकीय प्रयोजनांकरिता विप्रकृत किंवा शुद्ध केलेले मद्यसार व मद्यार्क जवळ बाळगण्यासाठी लायसन. (हे कलम वगळण्यात आले आहे)
कलम ३१: खरोखरीच्या वैद्यकीय किंवा इतर प्रयोजनांकरिता लायसन
– राज्य शासनाला असा परवाना देण्यासाठी एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करता येईल.
– कोणत्याही व्यक्तीने मादक द्रव्य असलेला कोणताही पदार्थ वैद्यकीय प्रयोजनासाठी या कलमान्वये लायसन प्राप्त व्यक्ति/संस्थेकडून मिळवला असेल तर ते द्रव्य वापरण्यासाठी लायसन मिळविण्याची त्याला गरज नाही.
कलम ३१-क: कलम २४-क मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याकरिता, दारू खरेदी करणे वगैरेसाठी लायसन
– यासाठी राज्य शासन एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करू शकते
कलम ३२: नीरेसाठी झाड छेदण्याचे लायसन
– राज्य शासन नीरा म्हणून विकणे/सेवन करण्याकरिता अथवा गूळ/मादक नसलेला कोणताही इतर पदार्थ तयार करण्याकरिता ताडीची झाडे छेदण्यासाठी/रस काढण्यासाठी लायसन देण्यास एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करू शकते.
कलम ३३: व्यापार व आयात लायसन
– राज्य शासन कोणत्याही प्रकारची परदेशी दारू आयात करण्यासाठी व विकण्यासाठी लायसन देण्यासाठी एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करू शकते.
कलम ३४: विक्रेत्याचे लायसन
– परदेशी दारू विकण्यासाठी विक्रेत्याचे लायसन
– हे लायसन पुढील शर्तीवर देण्यात येईल :
१) दुकानात विकण्यसाठी परवानगी दिलेल्या साठयाव्यतिरिक्त लायसनदाराजवळ असलेला परदेशी दारूचा साठा शासनमान्य गोदामात ठेवण्यात येईल.
२) माल गोदमात ठेवणे/त्यावर पर्यवेक्षन ठेवणे यासाठीचा सर्व खर्च लायसनधारक देईल.
३) आयुक्त लडतील अशा शर्तीना अधीन राहून आपल्या परदेशी दारूच्या साठयातील कोणताही भाग विकता येईल.
४) परवाने/प्राधिकारपत्रे असणार्‍या व्यक्तींनाच फक्त फक्त परदेशी दारू विकण्याची लायसनदारास परवानगी
५) किरकोळ विक्रीसाठी आवश्यक तेवढीच दारू आपल्या दुकानात ठेवण्याचा लायसनदारास हक्क
६) आयुक्त किंवा त्याच्याकडून प्राधिकृत कोणताही अधिकारी जे अनुदेश देईल त्यास अनुसरून लायसनदार आपले हिशेब ठेवील.
कलम ३५: हॉटेल लायसन
– राज्य शासन परदेशी दारू विकण्यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापकांना लायसन देण्यास एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करेल.
– अशा लायसनसाठी शर्ती:
१) जे परवानाधारक त्या हॉटेलमध्ये राहत किंवा जेवण घेत असतील त्यांनाच दारू विण्यात येईल.
२) कोणत्याही व्यक्तीस हॉटेलच्या कोणत्याही खोलित प्रवेश मिळू शकतो तिथे विकण्यात आलेल्या दारूचे सेवन करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
३) हॉटेलच्या जागेत परवाने देण्यासाठी/नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क आस्थापनेतील कोणत्याही अधिकार्‍याचा झालेला खर्च लायसनधारक देईल.
कलम ३६: हॉटेलना विशेष आयात लायसन देणे (रद्द).
कलम ३७: आगगाडीतील जेवणाच्या डब्याचे लायसन (रद्द).
कलम ३८: नौवाहन कंपनीस व जहाजाच्या प्रमुखास लायसन देणे
– राज्य शासनाला नौवाहन कंपनीस प्रत्येक जहाजाकरिता किंवा कोणत्याही नौकाधिपतीस जहाजावर परदेशी दारू विकण्यासाठी परवानगी देण्यासाठी एखाद्या अधिकार्‍याला प्राधिकृत करता येईल.
कलम ३९: युद्धनौका, सेनानौका यात परदेशी दारू वापरण्याची किंवा सेवन करण्याची परवानगी
– राज्य शासनाला विशिष्ट शर्तीवर सेनादलाची भोजनालये व आहारगृहे यातील व्यक्तिस आणि युद्धनौका, सेनानौका यांच्या नाविकगणास परदेशी दारू विकण्याची/खरेदी करण्याची/ सेवन करण्याची परवानगी देता येईल.
कलम ४०: परवाने
– राज्य शासन परदेशी दारू वापरण्यासाठी/ सेवनासाठी काही शर्तीवर व्यक्तीस परवाने देण्यासाठी एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करेल.
कलम ४०-क: आरोग्य परवाने
– ज्या व्यक्तिला आपली प्रकृती चांगली ठेवण्यासाठी परदेशी दारूची आवश्यकता असेल अशा व्यक्तींना परवाना. (अपवाद: अज्ञान व्यक्तींना असा परवाना देता येणार नाही)
– असा परवाना विहित परिमानापुरता व विहित शर्तीवर देण्यात येईल.
कलम ४०-ख: निकडीचे परवाने
– कोणत्याही व्यक्तीस औषध म्हणून वापरण्यासाठी ब्रॅन्डी, रम, शांपेन किंवा कोणत्याही प्रकारची दारू सेवन/वापर करण्यासाठी परवाना.
– कोणत्याही एका वेळी एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्तीस असा परवाना देण्यात येणार नाही.
कलम ४१: परकीय राज्यातील राजे वगैरे यांना परवाने
– राज्य शासनास पुढील कोणत्याही व्यक्तीस परदेशी दारू वापर/सेवन करण्यासाठी खास परवाने देता येतात:
१) परकीय राज्याचा राजा किंवा प्रमुख
२) परकीय राज्याचा राजदूत/वाणिज्यदूत/इतर प्रतीनिधी
३) वर १ व २ मध्ये नमूद व्यक्तीने नेमलेला कोणताही कर्मचारी (परंतु अशी व्यक्ति परकीय राज्याची नागरिक असावी)
४) परकीय राज्याचा सदस्य
५) आंतररशरीय संघटनेचा प्रतीनिधी
६) वर नमूद व्यक्तींवर अवलंबून असणारे नातेवाईक.
कलम ४२: परवण्याचे हस्तांतरण करता येणार नाही (रद्द)
कलम ४३: विवक्षित परवाने धरण करणार्‍या व्यक्तींनी परदेशी दारू वापर/सेवन करणे याचे विनियमन (Regulation)
– कलम ४०-ख व्यतिरिक्त या अधिनियमाच्या इतर तरतुदींनुसार दिलेला परवाना धारण करणारी व्यक्ती सार्वजनिक जागेत दारू पिणार नाही.
– कलम ४०-ख नुसार दिलेला परवाना धारण करणारी व्यक्ती आपल्या जवळील दारूचा उपयोग/ सेवन करण्यास कोणत्याही इतर व्यक्तिला परवानगी देणार नाही.
– कलम ४०, ४१, ४६, ४६-क किंवा ४७ अन्वये परवाना धारण करण्यार्‍या व्यक्तिला आपल्या जवळील विदेशी दारूचा वापर करण्यास त्या कलमन्वये परवानाधारक इतर कोणत्याही व्यक्तीस परवानगी देता येईल.
कलम ४४: क्लब यांना लायसन
– परवाना धारण करणार्‍या आपल्या सदस्यांना परदेशी दारू विकण्यासाठी मान्यताप्राप्त क्लबला राज्य शासन लायसन देऊ शकते.
– शर्ती
१) क्लबच्या प्रवेश योग्य खोलीत जवळ परवाना नसलेली कोणतीही व्यक्ती हजार असल्यास त्यावेळी तिथे परवाना धारण करणार्‍या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची दारू देणार नाही.
२) परवाना धारण करणार्‍या कोणत्याही सदस्याने लेखी प्राधिकृत केल्यास क्लाबास अशा सदस्याच्या वतीने अनुज्ञात परिमाणइतकी दारू साठविता येईल.
कलम ४५: धार्मिक विधीसाठी प्राधिकरपत्र देणे
– राज्य शासनास धार्मिक विधीसाठी दारूचा उपयोग करण्याकरिता कोणत्याही व्यक्तीस प्राधिकरपत्र देता येईल. (प्राधिकृत अधिकार्‍यामार्फत)
– परंतु ती व्यक्ती ज्या समजतील आहे त्या समजाच्या धार्मिक तत्वानुसार अशा दारूचा उपयोग करणे आवश्यक आहे अशी त्या धिकार्‍याची खात्री झाली पाहिजे.
– यासंबंधी विवाद उद्भवल्यास व्यक्तीस आयुक्ताकडे अर्ज करता येईल. आयुक्ताने दिलेला निर्णय अंतिम असेल.
कलम ४६: अभ्यागताचे (Visitors) परवाने
– पुढील व्यक्तींना अभ्यागताचे परवाने देण्यासाठी राज्य शासन एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करेल:
१) परदेशी नागरिक
२) दारू सेवन करण्यास बंदी नसलेल्या भागात राहत असलेला भारतीय व्यक्ती
३) दारू सेवन करण्यास बंदी असलेल्या भागात राहत असलेला परवाना मिळवून सेवन करीत असलेला भारतीय व्यक्ती
४) एक आठवड्यापेक्षा कमी मुदतीसाठी राज्याला भेट देत असलेला व्यक्ती
– असा परवाना एका वेळी एका आठवड्यापेक्षा जास्त मुदतीसाठी देण्यात येणार नाही. हा परवाना एका वेळी जास्तीत जास्त एका आठवड्यासाठी वाढविता येईल. मात्र एकूण मुदत एक महिन्यापेक्षा अधिक असणार नाही.
कलम ४६-क: प्रवाशाचा परवाना
– राज्य शासन प्रवासी व्यक्तीस परवाना देण्यासाठी एखाद्या अधिकार्‍यास प्राधिकृत करेल.
– प्रवाशी राज्यात किती दिवस राहणार तेवढ्या मुदतीसाठी हा परवाना देण्यात येईल. ही मुदत जास्तीत जास्त एक महिन्याची असेल.
– आयुक्त ठरविल त्या ठिकाणी हे परवाने मिळतील.
कलम ४७: अंतरिम परवाने
– कलम ४०, ४०-क, ४१ यात काहीही अंतर्भूत असले तरी राज्यशासन उक्त तरतुदीपैकी कोणत्याही तरतुदीअन्वये परवण्यासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तींना अंतरिम परवाने देईल.
– असे परवाने दोन महिन्यांपेक्षा अधिक मुदतीसाठी देण्यात येणार नाहीत.
कलम ४८: मादक औषधी द्रव्ये किंवा आफू सेवन करण्यास किंवा वापरण्यास परवाने
– असे परवाने वैद्यक मंडळाने प्रमाणपत्र दिल्यावर दिले जातील.
कलम ४८-क : परवाने अहस्तांतरणीय असणे
– कलम ४०, ४०-क, ४०-ख, ४१, ४६, ४६-क, ४७ किंवा ४८ अन्वये मंजूर केलेले परवाने अहस्तांतरनिय असतील.
कलम ४९: शासनाचा मादक द्रव्ये, इत्यादि आयात करण्याचा अनन्य विशेषाधिकार आणि आकारल्या जाणार्‍या फीमध्ये संबंधित व्यक्तिला असा विशेषाधिकार देण्याबद्दलच्या भाड्याचा किंवा मोबदल्याचा समावेश असणे.
कलम ५०: आफू वखारीत ठेवणे (रद्द)
कलम ५१: वखारीत ठेवलेले मादक द्रव्य किंवा भंग याची विक्री वगैरे यासाठी नियम. (रद्द)
कलम ५२: काही बाबतीत लायसने, परवाने व पास देण्याचा प्राधिकृत अधिकार्‍याचा अधिकार
कलम ५३: लायसने, वगैरे यासंबंधी सर्वसाधारण शर्ती
– ते विहित करण्यात आलेल्या नमूण्याप्रमाणे असेल.
– या अधिन्यामाअन्वये शर्तीची त्यात तरतूद असेल.
– ते विहित अशी फी दिल्यानंतर देण्यात येतील.
– अर्जकर्त्याने शर्ती व तरतुदीच्या पालनाची हमी दिली असेल.
कलम ५३-क: विवक्षित लायसनदाराने मापे, वगैरे ठेवणे
– जिल्हाधिकारी विहित करील अशी वजने, मापे, उपकरणे स्वतःजवळ ठेवणे.
– दारू बंदी अधिकार्‍याने मागणी केल्यास मोजण्याची/तोलण्याची/परखण्याची व्यवस्था करणे.
कलम ५४: लायसने व परवाने रद्द करण्याचा किंवा तहकूब करण्याचा अधिकार
– कोणतेही लायसन/परवाना/पास/प्राधिकारपत्र मंजूर करणार्‍या प्राधिकार्‍यास ते रद्द किंवा तहकूब करता येईल.
– पुढील कारणांमुळे रद्द किंवा तहकूब करता येते:
१) परवानाधारकणे द्यावयाची कोणतीही फी किंवा शुल्क योग्य रीतीने दिले नसल्यास.
२) ज्या कारणासाठी परवाना दिला ते कारण नाहीसे झाल्यास.
३) कोणत्याही अति किंवा शर्तीचा भंग केल्यास.
४) या अधिनियमाखाली कोणताही अपराध केल्यास/कोणताही दखलपात्र व अजामीनपात्र अपराध केल्यास.
५) घातक औषधी अधिनियम १९३०, औषधीद्रव्य अधिनियम १९४०, मुंबई औषधीद्रव्य (नियंत्रण) अधिनियम १९५२, भारतीय पण्यचिन्ह अधिनियम १८८९, भारतीय दंड संहिता, सीमाशुल्क अधिनियम १८७८ यानुसार अपराध केल्यास.
कलम ५५: लायसने वगैरे धरण करणार्‍या व्यक्तीस ते रद्द केल्याबद्दल किंवा तहकूब केल्याबद्दल भरपाई मिळण्याचा किंवा फी परत मिळण्याचा हक्क असणार नाही.
कलम ५६: इतर कारणासाठी लायसाने वगैरे रद्द करणे
– कलम ५४ मधील नमूद करणांव्यतिरिक्त अन्य कारणासाठी रद्द करण्यात यावे असे प्राधिकार्‍याला वाटल्यास –
१) कमीत कमी पंधरा दिवसाची लेखी नोटिस देण्यात येईल
२) कारणे नोटिस न देता ताबडतोब रद्द करता येईल
– अशा प्रकारे परवाने रद्द केल्यास परवाना न संपलेल्या मुदतीची फी परत करता येईल.
कलम ५७: लायसन जप्त करणे
– लायसनधारक व्यक्तीने द्यावयाचे कोणतेही शुल्क/फी देण्यात कसूर केल्यास ते लायसन रद्द होण्यास पात्र होईल तेंव्हा प्राधिकार्‍यास ते जप्त करण्याचा अधिकार आहे व त्याअन्वये चालणारा धंदा आपल्या व्यवस्थेखाली घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.