प्र.१) अबेल पारितोषिक _ या क्षेत्राशी संबंधित आहे.
(1) इलेक्ट्रॉनिक
(2) गणित
(3) यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनियरिंग)
(4) भौतिक शास्त्र
प्र.२) जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा बैठा पुतळा, स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी, यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभार आला आहे.
अ. रामकृष्ण परमहंस
ब. रामदास स्वामी
क. आर्यभट्ट
ड. संत रामानुजाचार्य
पर्यायी उत्तरे:
(1) फक्त अ
(2) फक्त क
(3) फक्त ब
(4) फक्त ड
प्र.३) “बाय मेनी ए हॅपी अॅक्सिडेंट : रिकलेक्शन्स ऑफ ए लाईफ” ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
(1) प्रियंका चोप्रा जोन्स
(2) एम. हमीद अन्सारी
(3) शशी थरुर
(4) वाय. मृणाल
प्र.४) खालील विधाने विचारात घ्या :
अ. महाराष्ट्र विधानसभेने डिसेंबर 2021 मध्ये ‘शक्ति’विधेयक मंजूर केले.
ब. यामध्ये बलात्काऱ्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.
क. महिलांवर अॅसिड हल्ला करणाऱ्यास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
ड. विधानसभेत अर्थमंत्र्यांनी हे विधेयक सादर केले.
यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(1) फक्त अ, ब आणि क
(2) फक्त अ आणि ब
(3) फक्त क आणि ड
(4) फक्त अ आणि ड
प्र.५) जोड्या जुळवा :
अ. सायनोफार्म I.अमेरिका
ब. कोविशिल्ड II. रशिया
क. स्पूटनिक III. चीन
ड. मॉडर्ना IV. भारत
पर्यायी उत्तरे:
अ ब क ड
(1) II IV I III
(2) III IV II I
(3) I III II IV
(4) I IV II III
प्र.६) इ.स. 2021 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक कोणास मिळाले?
(1) डेव्हिड कार्ड व जोशुआ अंगरिष्ट
(2) मारिआ रेसा व दिमीत्री मुराटोव
(3) अब्दुलरझाक गुरनाह
(4) कमला हॅरीस
प्र.७) मार्च 2021 मध्ये लोकसभा-राज्यसभा टिव्ही कोणत्या टिव्हीमध्ये विलीन करण्यात आले?
(1) डी.डी. नॅशनल टिव्ही
(2) हिंदुस्थान टिव्ही
(3) इंडिया टिव्ही
(4) संसद टिव्ही
प्र.८) ‘दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या:
अ. हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्स द्वारा प्रायोजित आहे.
ब. तो भारतीय सिनेमाच्या विकासातील योगदानाबद्दल दिला जातो.
क. या पुरस्काराचा निधी एक लाख रुपये आहे.
ड. वर्ष 2021 चा पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
पर्यायी उत्तरे:
(1) फक्त अ, ब आणि क
(2) फक्त ब, क आणि ड
(3) फक्त अ, ब आणि ड
(4) फक्त अ, क आणि क (प्रश्न रद्द होईल)
प्र.९) नवीन शैक्षणिक धोरण – 2020 (NEP- 2020) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
(1) जुलै 2020 मध्ये मान्य करण्यात आली.
(2) तिचा उद्देश भारताला जागतिक ज्ञान महाशक्ती बनविणे आहे.
(3) ती एनपीई – 1986 ची जागा घेईल.
(4) यामध्ये 10+2 ऐवजी 7+4+3+1 ची पद्धत असेल.
प्र.१०) टोकियो 2020 ऑलिम्पिक खेळातील पदकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ. यजमान देश जपानने प्रथम स्थान प्राप्त केले.
ब. भारताने सात पदकासह 48 वे स्थान प्राप्त केले.
क. भारताने तीन सुवर्णपदके प्राप्त केली.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ
(2) फक्त ब
(3) फक्त क
(4) वरीलपैकी एकही नाही
