महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता सर्वांनाच उपचार

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय २३ मे २०२० रोजी घेण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील १२ कोटी लोकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ९९६ आजारांवरील उपचाराची सोय असून पंतप्रधान जीवनदायी योजनेत १२०९ आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास ८५ टक्के लोकांना या योजनेचे लाभार्थी आहेत. युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून ३१ जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.