महत्त्वाचे वन लायनर्स

by Balaji Surne (लेखक : सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी )

 • डिजिटल मतदार साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ‘आय-हेल्प’ हा उपक्रम सुरू केला आहे? – आसाम
 • चीनच्या मत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड्स’ उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? – इटली
 • फोनपेच्या सदिच्छादूत पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – अमीर खान
 • सर्व प्रमुख कृषी आवश्यकतांसाठी उपाय पुरवण्यासाठी कोणत्या बँकेने ‘बडोदा किसान’ हे कृषी डिजिटल व्यासपीठ विकसित केले आहे? – बँक ऑफ बडोदा
 • नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनने कोणत्या कंपनिसोबत सामंजस्य केले आहे? – अॅडोब
 • ‘आंतरराष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंवाद’ कोणत्या शहरात पार पडला? – नवी दिल्ली
 • कोणता जिल्हा हा 5G कव्हरेज असलेला जगातील पहिला जिल्हा ठरला आहे? – शांघाई (चीन)
 • पहिल्यांदाच मतदान करणार्‍या मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या जिल्हा प्रशासनाने ‘संकल्प’ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे? – बोंगाईगाव (आसाम)
 • कोणत्या भारतीय क्रीडा संघटनेने असोचेमचा ‘उत्कृष्ट क्रीडा संघटना’ पुरस्कार जिंकला आहे? – नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया
 • नीती आयोगाच्या अहवालानुसार महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये पहिले स्थान प्राप्त करणारा ‘हैलाकांडी’ जिल्हा कोणत्या राज्यातील आहे? – आसाम
 • इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कुकला ब्रिटनच्या रानीकडून  कोणता सन्मान देण्यात आला आहे? – नाइटहूड
 • नवकल्पना आणि उद्योजकता महोत्सव (FINE) कोणत्या शहरात पार पडला? – गांधीनगर
 • शासकीय रुग्णालयात ‘ट्रांसकॅथीटर ऑर्टिक वाल्व्ह इम्प्लांटेशन’ (TAVI) सुरू करणारे तमिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
 • संयुक्त राष्ट्राद्वारा स्थापन करण्यात आलेल्या कोस्टा रिका येथील ‘यूनिव्हर्सिटी ऑफ पीस’द्वारा भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांना डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले.
 • राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमधील शाळांमध्ये गोंडी भाषेचा समावेश करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? – मध्य प्रदेश
 • भारत सरकारने 2025 पर्यंत अभियांत्रिकी निर्यातीचे किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्स लक्ष्य ठेवले आहे? – 200 दशलक्ष
 • कोणते शहर इलेक्ट्रिक कारसाठी वायरलेस चार्जिंग स्टेशन सुरू करणारे जगातील पहिले शहर ठरणार आहे? – ऑस्लो (नॉर्वे)
 • चक्रीवादळाचा फटका बसलेल्या मोझाम्बिकला मदत सामग्री पोहोचवण्यासाठी कोणती युद्धनौका मुंबईहून पोर्ट बैरा येथे पाठवण्यात आली होती? – आयएनएस मगर
 • आपत्ती स्थितीस्थापक पायाभूत सुविधा-2019 ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा कोणत्या शहरात पार पडली? – नवी दिल्ली
 • ‘कोरियाची राणी – ह्यो ह्वांग ओक ऑफ कोरिया’ या संकल्पनेवर भारत-कोरिया संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करणार आहेत.
 • आशियाई विकास बँकेचा (ADB) 2019-20 या वित्तीय वर्षासाठी वृद्धीदर अंदाज : 7.2%
 • मार्च 2019 मध्ये भारताच्या दौर्‍यावर आलेले  डॉ. इब्राहिमा केसोरी फोफाना हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? – गिनी
 • कोणाची LIC च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणुक करण्यात आली आहे? – विपिन आनंद
 • कॅमेरून गणराज्यामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – राकेश मल्होत्रा
 • ‘अल्ट्रा लो एमिशन झोन’ची अंमलबाजवणी करणारे जगातील पहिले शहर कोणते? – लंडन
 • मोहम्मद ईश्तेय यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे? – पॅलेस्टाईन
 • मदन मोहन मालविय कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोठे केले? – वाराणसी
 • कोणाला स्पेनचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ सिविल मेरीट’ सन्मान जाहीर झाला आहे? – सुषमा स्वराज (परराष्ट्रमंत्री)
 • रजनी कांत यांच्या नव्या पक्षाचे नाव काय आहे? – रजनी मक्कल मंद्रम
 • ‘ग्लोबल टॉप एम्प्लॉयर’ म्हणून कोणत्या भारतीय कंपनीची निवड झाली आहे? – टीसीएस
 • कोणता वृक्ष फ्रेंच ट्री ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आला आहे? – ओक
 • नागरी उडान सचिव म्हणून नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आली? – प्रदीप सिह खरोला
 • सुशील चंद्रा यांची नुकतीच निवडणूक आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली. या पदावर निवड होणारे ते कितवे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी ठरले आहेत? – दुसरे (टी.एस. कृष्णमूर्ती यांच्यानंतर)
 • सुवर्णरेखा या बंदराचे भूमिपूजन नुकतेच झाले. हे बंदर कोणत्या राज्यात विकसित करण्यात येत आहे? – ओडिशा
 • अवनी या वाघिणीच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पॅनल स्थापन करण्यात आले आहे? – डॉ. एस.एच. पाटील
 • राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कोठे स्थापन करण्यात आली आहे? – पंचकुला (हरियाणा)
 • प्रवीण तोगडिया यांनी कोणता नवीन पक्ष स्थापन केला आहे? – हिंदुस्तान निर्माण दल
 • कोणत्या राज्याने एका दिवसात चार लाख घरांचे उद्घाटन करण्याचा विक्रम केला आहे? – आंध्र प्रदेश
 • पाकिस्तानातून भारतात आयात होणार्‍या वस्तूंवर किती टक्के कस्टम ड्यूटी लावण्यात आली आहे? – 200%
 • प्यूमा कंपनीने कोणाला सदिच्छादूत म्हणून नेमले आहे? – मेरी कोम
 • भूकंपाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या आयआयटी संस्थेशी करार केला आहे? – आयआयटी मुंबई
 • कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्वदेशी भाषेचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे? – 2019
 • कोणत्या क्रिकेटपटूवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे? – सनथ जयसूर्या (श्रीलंका)
 • नुकतेच नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे बांधकाम कोणत्या कंपनीने केले आहे? – नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी
 • पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच कोणत्या देशाने भारताची साखर आयात केली आहे? – इराण
 • टी-20 मध्ये 8000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण? – सुरेश रैना
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणत्या ठिकाणी सुरू केली? – गोरखपूर (उत्तर प्रदेश)
 • कोणत्या राज्याने माकडांना कंटक (vermin) म्हणून घोषित केले आहे? – हिमाचल प्रदेश
 • दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ कोणता? – श्रीलंका
 • टी-20 च्या इतिहासामध्ये 4 चेंडूत 4 बळी घेणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला? – राशीद खान (अफगाणिस्तान)
 • मादक द्रव्य तस्करी तपासण्यासाठी कुत्र्यांना (dog squad) तैनात करणारे देशातील पहिले राज्य कोणते? – बिहार
 • भारतात शिक्षणासाठी कोणत्या देशातील 150 विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे? – श्रीलंका
 • रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – ब्रिजभूषण सिंह
 • प्रो वॉलीबॉल लीग किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? – चेन्नई स्पार्टन्स
 • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरात ‘वेस्ट टू वंडर पार्क’चे उद्घाटन केले आहे? – नवी दिल्ली
 • दोन तटरक्षक दल मुख्यालय असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तमिळनाडू (चेन्नई, थूथुकुडी)
 • कोणत्या देशामध्ये 22 फेब्रुवारी 2019 रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? – सुदान
 • फ्युचर ऑफ इंडिया पुरस्कार प्राप्त करणार्‍या पहिल्या भारतीय महिला कोण? – दिव्या कर्नाड
 • 2.5 इंच आकाराची जगातील सर्वांत मोठी मधमाशी 1981 नंतर कोणत्या देशात पुन्हा आढळून आली आहे? (नाव : Wallace’s giant bee/Megachile pluto) – इंडोनेशिया
 • इंडिया मेडिकल डिवाइस परिषद 18-19 फेब्रुवारी 2019 दरम्यान कोणत्या शहरात पार पडली? – बंगळुरु
 • इंडिया फार्मा ही परिषद कोणत्या शहरात पार पडली? – बंगळुरु
 • स्त्रियांचा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव ‘आत्तूकल पोंगल महोत्सव’ कोठे साजरा केला जातो? – केरळ
 • अमेरिकन कच्चे तेल खरेदी करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? – IOCL
 • चेन्नई (तमिळनाडू) येथे नुकतेचा नाला साफ करणार्‍या रोबोटचे अनावरण करण्यात आले आहे. त्या रोबोटचे नाव काय आहे? – बंडीकूट (Bandicoot)
 • ‘नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅब’ ही देशातील पहिली उच्च तंत्रज्ञानाने युक्त न्यायवैद्यक प्रयोगशाळा कोठे सुरू करण्यात आली आहे? – नवी दिल्ली
 • स्थानिक स्वराज्य निवडणूकीसाठीची किमान शैक्षणिक पात्रता रद्द करण्यासाठी कोणत्या राज्याने विधेयक पारित केले आहे? – राजस्थान
 • 40 वा आंतरराष्ट्रीय वाळवंट महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? – जैसलमेर (राजस्थान)
 • मुलुगू आणि नारायणपेट हे दोन नवीन जिल्हे कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले आहेत? – तेलंगणा
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमा भिंत बांधण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.
 • देशातील पहिले 3डी डिजिटल थिएटर कोठे सुरू करण्यात आले आहे? – कोलकता (पश्चिम बंगाल)
 • प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका अँड्रिया लेव्ही यांचे 14 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांची कोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत? – द लाँग सॉन्ग आणि स्मॉल आयलँड
 • ‘अर्ली एड आशिया 2019’ ही सुरुवातीच्या बालपणावर आधारित आशियातील सर्वांत मोठी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? – जयपुर (राजस्थान)
 • फ्रान्सिस डिसोझा यांचे इतक्यात निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? – गोवा
 • लघु व सीमान्त शेतकर्‍यांसाठी कोणत्या लघु वित्त बँकेने ‘किसान सुविधा कर्ज’ सुरू केले आहे? – उज्जीवन लघु वित्त बँक
 • आयसीसीने पाच वर्षांसाठी अधिकृत प्रायोजकत्व कोणाला प्रदान केले आहे? – कोका-कोला
 • ट्रान्स फॅटी ऍसिडच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागृती करण्यासाठी कोणत्या राज्याने कृती योजना तयार केली आहे? – केरळ
 • घुमोट हे वाद्य लवकरच कोणत्या राज्याचे वारसा वाद्य म्हणून घोषित करण्यात येणार आहे? – गोवा
 • संसदेच्या मध्यवर्ती सभाग्रहामध्ये नुकतेच अटल बिहारी वाजपेयी यांचे चित्र लावण्यात आले आहे. हे चित्र कोणत्या कलाकाराने साकारले आहे? – कृष्णा कन्हई (वृंदावण)
 • उत्तर भारतातील पहिले ESIC मेडिकल कॉलेज कोठे सुरू करण्यात आले? – फरीदाबाद
 • राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली जात आहे? – पंचकुला
 • श्रीकृष्ण आयुष विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केले जात आहे? – कुरुक्षेत्र (हरियाणा)
 • पंडित दिन दयाल उपाध्याय आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन केले जात आहे? कर्नाल (हरयाणा)
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरासाठी विकासाचे हिरा मॉडेल जाहीर केले. हिराचे पूर्ण रूप काय आहे? – HIRA :  Highway, I way, Railway, Airway
 • नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंगसारी या ठिकाणी नवीन एम्स रुग्णालयाची आधारशीला ठेवली. हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? – आसाम
 • मोहोर जलाशय प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ? – छत्तीसगड
 • कोणत्या राज्यात IIT, धारवाड ही संस्था स्थापन करण्यात येत आहे? – कर्नाटक
 • अद्ययावत विषाणू संस्थेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? – तिरुवनंतपुरम
 • कोणता भारतीय क्रिकेटपटू टी-20 क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे? – रोहित शर्मा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये कोणत्या राज्याला 100% विद्युतीकृत म्हणून घोषित केले आहे? – अरुणाचल प्रदेश
 • मार्शल आयलंड या देशात भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – संजय कुमार वर्मा
 • कॅनेडियन अकॅडेमीतर्फे कोणाला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आहे? – दीपा मेहता
 • जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?- उत्तर प्रदेश
 • 125 वे घटनादुरूस्ती विधेयक : सहाव्या परिशिष्टतील पूर्वोत्तर क्षेत्रामध्ये 10 स्वायत्त परिषदेच्या वित्तीय आणि कार्यकारी शक्ती वाढवण्याकरिता 125 वे घटनादुरूस्ती विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले.
 • 6 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर करण्यात आलेल्या फिफा क्रमवारीमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? – 103 व्या
 • इंडियन ओशन रिम असोसिएशनची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? – नवी दिल्ली
 • कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली वातानुकूलित तालिम उभारण्यात आली आहे? – वडणगे (कोल्हापूर)
 • 2022 मध्ये होणार्‍या आशियाई स्पर्धेत कोणत्या मराठमोळ्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? – खो-खो
 • 12 वी प्रादेशिक मानक बैठक कोणत्या शहरात पार पडली? – भुवनेश्वर
 • आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या किंमतींचे उल्लंघन करणार्‍यांवर पाळत ठेवण्यासाठी ‘किंमत देखरेख आणि संशोधन यूनिट’ स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? – केरळ
 • ‘होवीझेह’ या लांब पल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी नुकतीच कोणत्या देशाने घेतली आहे? – इराण
 • मायापूर येथे ‘जागतिक वारसा केंद्र’ स्थापन  करण्यात येणार आहे. मायापुर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? – पश्चिम बंगाल
 • दूसरा जागतिक गणना महोत्सव कोणत्या शहरात पार पडला? – पुणे
 • कृषी निर्यात धोरणावर आधारित पहिला राज्यस्तरीय जागरूकता कार्यक्रम कोणत्या शहरात पार पडला? – पुणे
 • कोणत्या सरकारने ‘शून्य अपघात मार्ग’ निर्माण करण्याची घोषणा केली आहे? – दिल्ली
 • कोणती महिला क्रिकेटपटू 100 टी-20 सामने खेळणारी पहिली आशियाई खेळाडू ठरली आहे? – सना मिर (पाकिस्तान)
 • 200 एकदिवसीय सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे? – चौदावा
 • 3 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख क्षेत्रामधील पहिल्या विद्यापीठाचे उद्घाटन केले. या विद्यापीठाचे प्रशासकीय कार्यालय कोठे असणार आहे? – लेह आणि कारगिल
 • तरुण कलाकारांसाठी ‘सोपान 2019’ हा महोत्सव कोणत्या शहरात पार पडला? – नवी दिल्ली
 • दूसरा झारखंड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात पार पडला? – रांची
 • कोणते ठिकाण सलग चौदाव्या वर्षी आशियातील प्रवाश्यांसाठी सर्वांत राहण्यायोग्य ठिकाण ठरले आहे? – सिंगापुर
 • 15-22 वयोगटातील 42 युवकांसाठी कोणत्या संस्थेने ‘नो माय इंडिया’ ही कार्यशाळा घेतली आहे? – नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मोणी
 • कोणत्या देशाने 2019 हे वर्ष ‘सक्रिय गुंतवणूक आणि सामाजिक विकास वर्ष’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? – उझबेकिस्तान
 • कोणता भारतीय क्रिकेटपटू 2018 मध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला आहे? – जसप्रीत बूमराह
 • कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ठरली आहे? – एचडीएफसी म्यूचुअल फंड
 • कोणत्या आयआयटी संस्थेने कृत्रिम बुद्धिमतेवर (AI) आधारित सहा महिन्याचा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? – आयआयटी खरगपुर
 • राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमासाठी कोणते वर्ष आधारभूत वर्ष आहे? – 2017
 • ‘वी आर डिस्प्लेस’ हे पुस्तक कोणाचे आहे? – मलाला युसुफझाई
 • 25 वी भागीदारी शिखर परिषद कोणत्या शहरात पार पडली? – मुंबई
 • 29 वी इंडियन पेंट कॉन्फरन्स कोणत्या शहरात पार पडली? – आग्रा
 • आर्थिक मागास वर्गांना 10% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते? – गुजरात
 • 14 जानेवारी 2019 रोजी फ्रँको-जर्मन मानवाधिकार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? चीनी वकील यू वेंशेंग
 • अल्बुमिन मधुमेहचा चांगला निर्देशक :- पुण्यातील राष्ट्रीय रसायने प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी 14 जानेवारी 2019 रोजी अल्बुमिन हा घटक मधुमेहचा अधिक चांगला निर्देशक असल्याचे संगितले आहे.
 • स्टीफन कॉन्स्टेंटिन:- त्यांनी 14 जानेवारी 2019 रोजी भारतीय फूटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.
 • आर्थिक मागासवर्गांच्या 10% आरक्षणाला मान्यता देणारे पहिले तीन देश :- 1) गुजरात, 2) झारखंड, 3) उत्तर प्रदेश
 • तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रण यांच्या स्मरणार्थी किती रूपयाच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे? – 100 आणि 5 रुपये
 • शाश्वत पाणलोट क्षेत्र वन व्यवस्थापन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? – त्रिपुरा
 • कोणत्या राज्याने विद्यार्थ्यांसाठी ‘शौर्य पुरस्काराची’ घोषणा केली आहे? – हरियाणा
 • कोणती कंपनी अद्ययावत कर भरणा प्रणाली विकसित करणार आहे? – इन्फोसिस
 • कुचिनोराबु बेटावर (on Mount Shindake) जानेवारी 2017 मध्ये ज्वालामुखी उद्रेक झाला. हे बेट कोणत्या देशात आहे? – जपान
 • देशातील सर्वांत उंच हवाई क्षेत्र पाक्योंग विमानतळ कोणत्या राज्यात आले? – सिक्किम
 • कोणत्या राज्य सरकारने कल्लकुरीची हा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा केली आहे? – तमिळनाडू
 • राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप कोणत्या शहरात पार पडली? विजयनगर (कर्नाटक)
 • कपू समुदायला आरक्षण देण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? – आंध्र प्रदेश
 • ‘72 Hours – Martyr Who Never died’ या 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला 20 जानेवारी 2019 रोजी कोणत्या उच्च न्यायालयाने मान्यता दिली? – दिल्ली उच्च न्यायालय
 • कोणत्या सोशल नेटवर्किंग साईटने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता नीतिशास्त्र संस्था’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? – फेसबूक
 • कोणत्या राष्ट्रीय उद्यानात लहान ‘वुडब्रॉउन फुलपाखरा’चा 120 वर्षांनी पुन्हा शोध लागला आहे? – कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम
 • के9 वज्र, होवित्झर तोफाच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी केले आहे? – हझिरा (गुजरात)
 •  ‘अॅरो-3’ या अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? – इस्राइल
 • भारत आफ्रिका फील्ड प्रशिक्षण सराव कोणत्या ठिकाणी पार पडला आहे? – पुणे
 • दृष्टिहीन लोकांना चलनी नोटांची ओळख पटण्यासाठी सहाय्य करणारे ‘रोशनी’ हे अॅप्लिकेशन कोणत्या आयआयटी संस्थेने विकसित केले आहे? – आयआयटी, रोपर (पंजाब)
 • कोणता देश 2020 मध्ये भोजपुरी महोत्सवाचे आयोजन करणार आहे? – मॉरिशस
 • हरियाणा सरकारच्या मदतीने कोणता देश फेब्रुवारी 2019 मध्ये भागवतगिता महोत्सव आयोजित करणार आहे? – मॉरिशस
 • कोणत्या दोन राज्यांतील व्यापाराने e-NAM च्या माध्यमातून आंतरराज्य व्यापाराला सुरुवात झाली? – तेलंगणा-आंध्र प्रदेश
 • एका अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात मोठी किरकोळ बाजारपेठ ठरला आहे? – चीन
 • कोणत्या कंपनीला सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मिनीरत्न कंपनीचा पुरस्कार मिळाला आहे? – नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (आसाम)
 • भारतातील नायट्रोजन प्रदूषण संशोधनासाठी कोणता देश सहाय्य करणार आहे? – यूनायटेड किंगडम
 • कोणत्या कंपनीने ‘उंटाचे दूध’ सुरू केले आहे? – अमूल
 • कोणत्या देशाने ऊसाच्या रसाला ‘राष्ट्रीय पेय’ म्हणून घोषित केले आहे? – पाकिस्तान
 • On 25th January 2019, the report released by CISCO on 2019 Data Privacy Benchmark Study ranked India in 6th position in General Data Protection Regulation (GDPR) readiness index.
 • कोणत्या राज्याने पहारी समुदायला आरक्षण देण्यासाठी विधेयक पास केले आहे? – जम्मू-काश्मीर
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोपपूर येथे नवीन एम्स रुग्णालयाचे उद्घाटन केले. थोपपूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? – तमिळनाडू
 • प्रजासत्ताक दिनी ‘आदिवासी मेळा’ कोणत्या राज्यात पार पडला? – ओडिशा
 • मातेकडून बाळाला होणारे  एचआयव्ही आणि सिफिलीसच्या संसर्गाचे संक्रमण दूर करणारा आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिला देश कोणता? – थायलंड
 • मलेरियामुक्त घोषित करण्यात आलेले दक्षिण आशियाई देश कोणते? – मालदिव आणि श्रीलंका
 • दक्षिण भारत MSME शिखर परिषद 2019 कोणत्या शहरात पार पडली? – बंगळुरु
 • टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस ही आयटी क्षेत्रातील दशकातील सर्वांत जलद गतीने वाढणारा ब्रॅंड असल्याचे ‘ब्रॅंड फायनान्स’ या कंपनीने जाहीर केले आहे.
 • न्यूयॉर्क टाइम्स ट्रॅवल शो 2019 मध्ये कोणत्या देशाला ‘बेस्ट इन शो’ हा सन्मान देण्यात आला आहे? – भारत
 • कोणत्या राज्याला FSSAI ने ‘स्वच्छ भारत यात्रा’मध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने उत्कृष्ट राज्याचा पुरस्कार दिला आहे? – तमिळनाडू
 • जर 25% हवा प्रदूषण कमी झाल्यास भारतीय लोक 3 वर्षे जास्त जगू शकतात असा निष्कर्ष कोणी काढला? – एयर क्वालिटी लाइफ इंडेक्स
 • कोणत्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मिळून ‘अबेर’ हे डिजिटल चलन जारी केले आहे? – यूएई आणि सौदी अरेबिया
 • केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणावरून सर्वांत जास्त हत्तींची संख्या कोणत्या राज्यात आहे? – आसाम, केरळ
 • रेल्वेचे भविष्य (The Future of Rail) हा अहवाल कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे? – आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था
 • इस्रोने ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ कोणत्या ठिकाणी सुरू केले आहे? – बंगळुरु
 • कोणत्या राज्याने विधानसभेत महिलांना 33% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? – राजस्थान
 • आराकू बलून फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? – आंध्र प्रदेश
 • देशातील पहिला अत्याधुनिक सुविधांनी युक्त राष्ट्रकुल कुस्ती आखाडा कोठे उभारला जात आहे? – विटा (सांगली)
 • ऑस्ट्रेलियाच्या टिम ऑफ द इयर मध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे? – विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह
 • किंगडम इन ड्रीम दी प्राइममिनिस्टर – पांडुरंग तनाजी मोरे यांचे पुस्तक
 • भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ‘डॉ. आनंदीबाई जोशी’ यांच्यावर आधारित नुकताच कोणता चित्रपट प्रदर्शित झाला आहे? – आनंदी गोपाळ
 • भाजप सरकारच्या काळात सुरू झालेली वंदे मातरम म्हणण्याची परंपरा कोणत्या सरकारने रद्द केली आहे? – मध्य प्रदेश कॉंग्रेस सरकार
 • ब्रिटनमधील सर्वाधिक आयक्यू असलेल्या लोकांमध्ये कोणत्या भारतीय वंशाच्या मुलाचा समावेश झाला आहे? – अरव अजय कुमार
 • वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात पार पडला? – पुणे
 • महाराष्ट्राची लोककला लावणी या नृत्यकलेचा महोत्सव सारंगखेडा येथे पार पडला. या महोत्सवाच्या अंतिम फेरीत कोणी प्रथम क्रमांक पटकावला? – श्रुती आणि ऐश्वर्या बडदे
 • राज्यातील कोणते शहर लाचखोरीत अव्वल ठरले आहे? – पुणे
 • कोणत्या देशाने गुलाबजामूनला राष्ट्रीय मिठाई म्हणून घोषित केले आहे? – पाकिस्तान
 • आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला सरकारकडून किती रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे? – अडीच लाख
 • मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे 2018 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. पत्रकारिता क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांची निवड 2018 च्या जीवनगौरव पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
 • वसीम जाफर सर्वाधिक रणजी सामने (146) खेळणारा खेळाडू ठरला. याअगोदर मध्यप्रदेशच्या देवेंद्र बुंदेलाच्या नावावर 145 रणजी सामने खेळण्याचा विक्रम होता.
 • राज्य पोलीस दलातील सेवा तृतीयपंथी व्यक्तीसाठी खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकाने घेतला .असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले
 • पंजाब येथे पार पडलेल्या 106 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये देशातील पहिली चालकविना बस धावली .
 • गणितीय खेळांची सांगड घालत गणित सोपे करून सांगणारा गणितीतज्ञ भास्कराचार्य गणितनगरी प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी येथे उभारला जात आहे
 • उज्ज्वला सॅनिटरी नॅपकिन उपक्रम  :- ३० डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वर (ओडिशा) येथे हा उपक्रम सुरु केला.
 • जपानने इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशनमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
 • मुंबईतल्या अंधेरी येथील इएसआयसी रुग्णालयाला लागलेल्या आगीत अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्यासाठी मदत करत 10 जणांचे प्राण वाचवणाऱ्या सिद्धरामेश्वर सिद्धराम हुमनाबडे या फुड डिलिव्हरी बॉयला, केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी एक लाख रुपयांचे बक्षिस दिले आहे.
 • पी. के. सिंह : 1 जानेवारी 2019 रोजी पी. के. सिंह यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या (Competition Commission of India) सचिवपदी नेमणूक करण्यात आली.
 • पांडा बॉन्ड : चीनच्या कॅपिटल मार्केटमधून कर्ज घेण्याकरता पहिल्यांदाच रॅन्मिन्बी चलन रोखे जारी करण्यास पाकिस्तानी कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.
 • मकरविलाक्कु महोत्सव : हा वार्षिक महोत्सव शबरीमलाच्या देवळात साजरा केला जातो.केरळमधील भगवान अयप्पाचे मंदिर 21 दिवसांसाठी उघडण्यात आले.
 • अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाचे न्यू होरायझन्स हे यान सूर्यमालेच्या बाहेरच्या भागाजवळून यशस्वीपणे प्रवास करत ‘अल्टीमा थुल’ जवळून पुढे गेले. ही पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर सुरू असलेली मोहीम ठरली आहे.
 • पश्चिम आशियातील सर्वांत मोठे कॅथेड्रल (प्रमुख चर्च) कोणत्या राज्याने सुरू केले आहे? – इजिप्त
 • सोलापूरहुन तुळजापूर मार्गे उस्मानाबाद, या नव्या ब्रॉडगेज लाईनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झाले. सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद मार्गावरील एका मार्गावरील हा प्रकल्प 2005 मधील असून, 68 किलोमीटर अंतराचा आहे.
 • जम्मू-काश्मीर कायदा विभागाने कोणाच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य कायदा आयोग’ स्थापन केला आहे? – न्या. (सेवानिवृत्त) एमके हंजुरा
 • On January 9, 2019, IIT-Madras team created ‘space fuel’ by trapping carbon dioxide in crystalline form with the help of water molecules.
 • जनरल पूर्ण चंद्र थापा यांचा सन्मान : नेपाळ लष्कराचे जनरल ‘पूर्ण चंद्र थापा’ यांचा 12 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘भारतीय लष्कराचे जनरल’ ही सन्माननीय रॅंक बहाल केली.
 • ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच शतके झळकवणारा पहिला भारतीय कोण ठरला? – रोहित शर्मा
 • भारतातील सर्वात मोठे स्टार्टअप इकोसिस्टमचे कोणत्या शहरात अनावरण करण्यात आले आहे? – कोची (केरळ)
 • कोणते राज्य पक्षांसाठी रुग्णालय सुरू करणार आहे? – दिल्ली सरकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *