महत्त्वाचे दिनविशेष : मे 2018

जागतिक कामगार दिन

 • दरवर्षी 1 मे रोजी जागतिक कामगार दिवस साजरा केला जातो.
 • सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कामगारांचे एकत्रीकरण’ (Uniting Workers for Social and Economic Advancement) ही 2018 ची संकल्पना होती.
 • 1886 मध्ये शिकागोमध्ये पोलिसांविरोधात कामगार निषेध करत असताना घडलेल्या बॉम्ब दुर्घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस निवडण्यात आला.

 

जागतिक टूना दिन

 • 2 मे 2018 रोजी जागतिक टूना दिन साजरा करण्यात आला.
 • 2011 पासून हा दिवस साजरा केला जातो.
 • ‘स्मार्ट टूना, स्मार्ट ओशन’ ही यावर्षीची संकल्पना होती
 • टूना हा एक प्रकारचा मासा असून अनेक देशात त्याचे सेवन केले जाते.

 

जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

 • दरवर्षी 3 मे रोजी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day) साजरा केला जातो.
 • 2018 ची संकल्पना – ‘Keeping Power in Check: Media, Justice and The Rule of Law’
 • डिसेंबर 1993 मध्ये या दिनाची घोषणा करण्यात आली.

 

जागतिक अस्थमा दिन

 • 1 मे 2018 रोजी जगभरामध्ये जागतिक अस्थमा दिन साजरा करण्यात आला.
 • दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी हा दिवस साजरा केला जातो.
 • ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) द्वारा हा दिवस साजरा केला जातो.
 • 1998 साली पहिल्यांदा हा दिवस पाळला गेला.
 • ‘Never too early, never too late’ ही 2018 ची संकल्पना होती.

 

जागतिक व्यंगचित्रकार दिन

 • दरवर्षी 5 मे रोजी जागतिक व्यंगचित्रकार दिवस साजरा केला जातो.
 • 5 मे 1895 रोजी रिचर्ड आऊटकॉल्ट यांनी काढलेले पहिले रंगीत व्यंगचित्र ‘द यलो कीड’ प्रकाशित झाले होते.

 

जागतिक रेड क्रॉस दिन

 • दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो.
 • 8 मे हा आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीचे (ICRC) संस्थापक हेन्री डुनंट यांचा जन्मदिवस आहे.
 • 8 मे 1828 रोजी जन्मलेले हेन्री डुनंट हे शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणारे पहिले व्यक्ती आहेत.
 • ‘जगभरातील संस्मरणीय हास्य’ (Memorable smiles from around the world) ही यावर्षीची संकल्पना होती.
 • 17 फेब्रुवारी 1863 रोजी ICRC ची स्थापना झाली असून जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.

 

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

 • दरवर्षी 11 मे रोजी देशभरामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो.
 • 2018 ची संकल्पना – ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ (Science and Technology for a Sustainable Future)
 • 11 ते 13 मे 1998 दरम्यान पोखरण (राजस्थान) येथे पाच अणुचाचण्या घेण्यात आल्या होत्या त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
 • ऑपरेशन शक्ती (पोखरण-2) असे या चाचणीचे नाव होते. डीआरडीओचे तत्कालीन संचालक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी या ऑपरेशनचे नेतृत्व केले होते.

 

इंटरनॅशनल नर्स डे

 • दरवर्षी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस (International Nurse Day) साजरा केला जातो.
 • आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा हा जन्मदिवस (12 मे 1820) आहे.
 • 2018 ची संकल्पना – ‘परिचारिका: पुढाकार घेण्यासाठी आवाज – आरोग्य हा मानव अधिकार आहे’ (Nurses: A Voice to Lead – Health is a Human Right)
 • डोरोथी सदरलँड यांनी 1953 मध्ये पहिल्यांदा या दिनाचा प्रस्ताव मांडला होता.
 • 1965 मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेद्वारे (ICN) पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

 

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस

 • दरवर्षी 15 मे रोजी जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय कुटुंबे दिवस (International Day of Families) साजरा केला जातो.
 • ‘कुटुंब आणि समावेशक समाज’ (Families and inclusive societies) ही यावर्षीची संकल्पना होती.
 • संयुक्त राष्ट्र आमसभेद्वारे 1993 मध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली.

 

आंतरराष्ट्रीय संग्रहालाय दिवस

 • दरवर्षी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालाय दिवस (International Museum Day) साजरा केला जातो.
 • ‘संग्रहालये आणि उच्च संप्रेषण – नवीन दृष्टीकोण आणि नवीन जनता’ (Museums and Hyper Communication – New Approaches and New Public) ही यावर्षीची संकल्पना होती.
 • आंतरराष्ट्रीय संग्रहालाय परिषदेद्वारा (ICOM) 1977 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली.

 

आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन

 • दरवर्षी 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन (International Firefighters’ Day) साजरा केला जातो.
 • लाल आणि निळी रिबिन हे या दिवसाचे सर्वांत महत्त्वाचे चिन्ह आहे. (लाल हा रंग आगीसाठी तर निळा पाण्यासाठी असतो)

 

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस

 • दरवर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा केला जातो.
 • ‘Celebrating 25 Years of Action for Biodiversity’ ही यावर्षीची संकल्पना होती.
 • जैव-विविधता कराराच्या अंमलबजावणीला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत.
 • 22 मे 1992 रोजी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे (UNEP) मुख्यालय नैरोबी येथे हा करार करण्यात आला.

 

जागतिक थायरॉइड जागृती दिन  (World Thyroid Awareness Day)

 • दरवर्षी 25 मे रोजी साजरा केला जातो.
 • 2009 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
 • उद्देश :- लोकांना थायरॉईडच्या आरोग्याविषयी जागरुक करणे आणि थायरॉईड रोगांचे प्रतिबंध व उपचार याबद्दल शिक्षित करणे.

थायरॉइड ग्रंथी :-

 • सर्वांत मोठी अंत:स्त्रावी ग्रंथी
 • फुलपाखरासारखी दिसणारी ही ग्रंथी गळ्यामध्ये असते.
 • ही ग्रंथी थायरॉक्सिन व कॅल्सिटोनिन अशी संप्रेरके निर्माण करते.
 • शरीराची वाढ व चयापचय क्रियेत ही संप्रेरके महत्त्वाची कार्ये करतात.
 • स्रवलेली संप्रेरके साठवून ठेवू शकणारी ही एकमेव ग्रंथी आहे.
 • या ग्रंथींच्या अंतःस्रावात आयोडीन असते.

 

जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस

 • वर्षातून दोनदा हा दिवस साजरा केला जातो
 • मे आणि ऑक्टोबर महिन्यातील दुसर्‍या शनिवारी हा दिवस साजरा केला जातो.
 • नुकताच 12 मे 2018 रोजी साजरा करण्यात आला.
 • ‘पक्षी संवर्धंनासाठी आपल्या आवाजाची एकी’ (Unifying our Voices for Bird Conservation) ही यावर्षीची संकल्पना आहे.

 

जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिन

 • दरवर्षी 17 मे रोजी जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिन (World Telecommunication and Information Society Day) साजरा केला जातो.
 • या दिवशी आंतरराष्ट्रीय टेलीग्राफ करारावर सही करण्यात आली आणि इंटरनॅशनल टेलीकम्यूनिकेशन युनियनची निर्मिती झाली.
 • ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर’ (Enabling the positive use of Artificial Intelligence) ही 2018 ची संकल्पना होती.

 

जागतिक उच्च रक्तदाब दिन

 • दरवर्षी 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब (Hypertension) दिवस साजरा केला जातो.
 • जागतिक उच्चरक्तदाब लीगचा (WHL) हा उपक्रम आहे.
 • मे 2005 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला.
 • ‘आपले क्रमांक जाणून घ्या’ (Know Your Numbers) ही यावर्षीची संकल्पना होती.

 

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

 • 18 मे रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जातो.
 • 1977 पासून हा दिवस साजरा केला जातो.
 • ‘Hyperconnected museums: New approaches, new publics’ ही यावर्षीची संकल्पना होती.

 

जागतिक एड्स लसीकरण दिन

 • दरवर्षी 18 मे रोजी जागतिक एड्स लसीकरण दिन साजरा केला जातो.
 • एचआयव्ही लस जागरूकता दिवस या नावानेही हा दिवस ओळखला जातो.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी 18 मे 1997 रोजी एचआयव्ही लसीच्या महत्त्वाविषयी केलेल्या भाषणास्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
 • 1998 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला.

 

जागतिक मधमाशी दिन

 • 20 मे 2018 रोजी पहिला जागतिक मधमाशी दिन (World Bee Day) साजरा करण्यात आला.
 • संयुक्त राष्ट्र आम सभेने हा दिवस घोषित केला.
 • स्लोव्हेनिया येथे पहिल्या मधमाशी दिनाचा उत्सव समारंभ पार पडला.
 • स्लोव्हेनियन मधुमक्षिका पालणाचे प्रणेते अँटोन जंसा यांचा 20 मे हा जन्मदिवस आहे.

 

दहशतवाद विरोधी दिन

 • दरवर्षी 21 मे रोजी भारतामध्ये दहशतवात विरोधी दिन (Anti Terrorism Day) पाळला जातो.
 • 21 मे हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा हौतात्म्य दिन आहे.
 • 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती.

 

संवाद आणि विकासासाठी जागतिक संस्कृतिक विविधता दिन

 • 21 मे रोजी जगभरामध्ये संवाद आणि विकासासाठी जागतिक संस्कृतिक विविधता दिन साजरा करण्यात येतो.
 • 2002 मध्ये संयुक्त राष्ट्र आम सभेने या दिवसाची घोषणा केली.

 

राष्ट्रकुल दिन

 • भारतामध्ये 24 मे रोजी राष्ट्रकुल दिन साजरा केला जातो.
 • अनेक देशांत मार्चच्या दुसर्‍या सोमवारी हा दिवस साजरा केला जातो.
 • पूर्वी हा दिवस ‘साम्राज्य दिन’ म्हणून परिचित होता.
 • ‘सामायिक भविष्यकडे’ (Towards a Common Future) ही 2018 ची संकल्पना आहे.

 

जागतिक तंबाखू विरोधी दिन

 • दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो.
 • 1987 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या दिनाची घोषणा केली.
 • ‘तंबाखू आणि हृदयरोग’ (Tobacco and heart disease) ही यावर्षीची संकल्पना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.