भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास

  • भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत.
  • भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले. ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली. तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.
  • मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.
  • मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते.

www.balajisurne.blogspot.in

भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे :

  • भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला.
  • १८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.
  • भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.

मिरात-उल्-अखबार 

> राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले.

> लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले.

> संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्‌सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.

दिग्दर्शन: श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

समाचार दर्पण:  २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

सोमप्रकाश: पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

तत्त्वबोधिनी पत्रिका: देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

सुलभ समाचार : केशवचंद्र सेन (१८७८).

अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले.

फॉर्वर्ड: चित्तरंजन दास यांनी १९२३ साली स्वराज्य पक्षाचे मुखपत्र फॉर्वर्ड हे इंग्रजी दैनिक चालू केले होते. स्वाधीनता : कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र म्हणून १९४६ साली स्वाधीनता हे बंगाली दैनिक चालू झाले.

रास्त गोफ्तार (सत्यवादी) : मुंबईत १८४६ च्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या पारशी- मुस्लीम दंग्यानंतर  दादाभाई नवरोजी  यांनी रास्त गोफ्तार हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५१ रोजी सुरु केले.

> हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द असून मुख्यतः पारशी समाजात सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी दादाभाईंनी हे वृत्तपत्र काढले. ते दोन वर्षे त्याचे संपादक होते

सत्याग्रह : आपल्या राजकीय विचारसणीचा व तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी गांधीजींनी ‘सत्याग्रही’ ह्या संपादकीय नावाखाली सत्याग्रह हे साप्ताहिक दि. ७ एप्रिल १९१९ पासून सरकारी परवान्याशिवाय प्रसिध्द करण्यास   सुरुवात केली.

> यंग इंडिया (इंग्रजी) व नवजीवन (गुजराती) ही नियतकालिके १९१९ पासून त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिध्द होऊ लागली.

> ११ फेब्रुवारी १९३३ रोजी हरिजन (इंग्रजी) साप्ताहिक गांधीजींनी सुरु केले.

> हरिजनची हिंदी आवृत्तीही निघू लागली. त्यात स्वतः गांधीजींच्या व्यतिरिक्त महादेव देसाई, किशोरलाल मशरुवाला, काका कालेलकर व नरहरी पारेख यांच्यासारखे नामवंत लेखक लेखन करीर असत.

> १९४० पासून सहा वर्षे गांधीजींनी आपली वृत्तपत्रे प्रकाशनपूर्व नियंत्रणाच्या निषेधार्थ बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरु झाली.

www.balajisurne.blogspot.in

मराठी वृत्तपत्रांचा आढावा :

 दर्पण

> मराठीतील पहिले वृत्तपत्र

> दि. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरु केले.

> दर्पण प्रारंभी पाक्षिक होते. ४ मे १८३२ पासून ते साप्ताहिक झाले.

> या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत मजकूर छापला जात असे.

> जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात भाऊ महाजन (ऊर्फ गोविंद विठ्ठल कुंटे) यांचे सहकार्य लाभत असे.

> बेअदबी प्रकरणाची झळ लागून दर्पण बंद पडले (१८४०). ते बंद पडल्यावर त्याच्या चालकांनी युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिक सुरु केले.

दिग्दर्शन 

> जांभेकरांनी  १८४० च्या मे महिन्यात दिग्दर्शन हे मराठी नियतकालिक सुरु केले.

> ते साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांना वाहिलेले भारदस्त मासिक होते.

ज्ञानोदय :  जून १८४२ मध्ये अहमदनगर येथे ख्रिस्ति मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे मासिक सुरु केले. १८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते.

प्रभाकर:

> प्रभाकर हे वृत्तपत्र २४ ऑक्टोबर १८४१ रोजी सुरु झाले.

> भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते. .

>  प्रभाकरचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे त्यात प्रसिध्द झालेली शतपत्रे. ही शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी  लिहीत असत.

> हे साप्ताहिक १८६५ साली बंद पडले.

> प्रभाकरशी स्पर्धा करणाऱ्या वर्तमानदीपिका या वृत्तपत्राला तोंड देण्यासाठी भाऊ महाजन यांनी धूमकेतू (१८५३) नावाचे वृत्तपत्र काढले .

मित्रोदय:  पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. ते १८४४ मध्ये निघाले;

ज्ञानप्रकाश: 

> १२ फेब्रुवारी १८४९ रोजी ज्ञानप्रकाश सुरु झाले  .

> कृष्णाजी त्रिंबक रानडे

> १९०९ मध्ये ‘भारत सेवक समाजा’ने हे वृत्तपत्र चालविण्यास घेतले.

> त्यानंतर नेमस्तांचे मुखपत्र अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली.

> ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार हरी नारायण  आपटे यांना मिळाला.

‘सत्य, सौख्य आणि ज्ञान’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते.

> महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नामवंत व्यक्ती ज्ञानप्रकाशमधून लेखन करीत.

इंदुप्रकाश :

> जानेवारी १८६२ पासून इंदुप्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले.

> ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता.

> इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत.

नेटिव्ह ओपिनियन:  वि. ना. मंडलिक  यांनी १८६४ मध्ये नेटिव्ह ओपिनियन हे इंग्रजी साप्ताहिक सुरु केले.

ज्ञानसिंधु : विरेश्वर ऊर्फ तात्या छत्रे यांचे ज्ञानसिंधु (१८४२),

विचारलहरी (१८५२), हिंदु पंच (१८७२) : कृष्णशास्त्री चिपळूणकर.

> मराठी वृत्तपत्रांतून व्यंगचित्रे छापण्याची प्रथा हिंदु पंचने सुरु केली.

मराठा : २ जानेवारी १८८१

केसरी :  ४ जानेवारी १८८१

> लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी

>  विष्णुशास्त्री चिपळूणकर  यांच्या निबंधमालेतून स्फूर्ती घेऊन

>लोकमान्य टिळक हे मराठाचे पहिले संपादक, तर ⇨गोपाळ गणेश आगरकर  हे केसरीचे पहिले संपादक होते.

> ‘शिवाजीचे उद्‌गार’ या १५ जून १८९७ रोजी प्रसिध्द झालेल्या कवितेमुळे लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दीड वर्ष कारावासाची शिक्षा झाली.

> २४ जून १९०८ रोजी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा शिक्षा झाली. ही शिक्षा सहा वर्षांची होती. ती मंडाले येथे भोगावी लागली. केसरीत प्रसिध्द झालेले हे लेखन कृष्णाजी प्रभाकर  खाडिलकर यांचे होते. परंतु टिळकांनी त्याची जबाबदारी संपादक या नात्याने स्वतःकडे घेतली.

> १९०८ ते १९१० पर्यंत खाडिलकर व १९१० ते १९१८ पर्यंत केळकर यांनी संपादकाची जबाबदारी सांभाळली.

काळ: शिवराम महादेव परांजपे  यांनी २५ मार्च १८९८ रोजी काळ हे साप्ताहिक सुरु केले.

भाला: भास्कर बळवंत भोपटकर यांनी ५ एप्रिल १९०५ रोजी  भालाचा पहिला अंक प्रकाशित केला.

संदेश: अच्युत बळवंत कोल्हटकर  यांनी १४ जानेवारी १९१५ रोजी मुंबईतून संदेश हे वृत्तपत्र दैनिकरुपात सुरु केले.

लोकमान्य: टिळक यांच्या निधनानंतर १९२१ मध्ये मुंबईहून लोकमान्य दैनिक सुरु झाले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्याचे पहिले संपादक होते.

नवाकाळ: खाडिलकर यांनी लोकमान्य सोडल्यावर स्वतःचे नवाकाळ हे दैनिक मुंबईतून ७ मार्च १९२३ रोजी सुरु केले.

ब्राह्मणेतरांची पत्रकारिता : 

दीनबंधू:  पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी कृष्णराव भालेकरांनी सुरु केले.

दीनमित्र :  ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले.

तरुण मराठा:  शाहू महाराजांच्या इच्छेनुसार दिनकरराव जवळकर यांनी  १९२२ मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरु केले. चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे (देशाचे दुश्मन ही पुस्तिका) जवळकरांचे नाव गाजले.

कैवारी  :   फेब्रुवारी १९२८ मध्ये दिनकरराव जवळकर यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जेधे बंधु याच्या प्रेरणेने व सहकार्याने सुरु केले.

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता : 

मूकनायक : ३१ जानेवारी १९२०,

बहिष्कृत भारत:  १९२७,

जनता: १९३०

प्रबुद्ध भारत : १९५६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *