भारतातील पहिल्या महिला

 • सावित्रीबाई फुले: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका
 • कादंबनी गांगुली: भारतातील पहिली महिला पदवीधर. भारताच्या पहिल्या महिला पदवीधर आणि पहिल्या महिला चिकित्सक होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाषण देणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. कादंबिनी गांगुली युरोपियन वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण घेणारी पहिली दक्षिण आशियाई महिला होती.
 • अॅनी बेझंट: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
 • इंदिरा गांधी: भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय महिला.
 • सरोजिनी नायडू: भारतीय राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल.
 • सुचेता कृपलानी: पहिल्या महिला मुख्यमंत्री.
 • राजकुमारी अमृत कौर: देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्री
 • रमा देवी: मुख्य निवडणूक आयुक्त बनलेल्या पहिल्या महिला.
 • लीला सेठ: उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला.
 • एम फातिमा बीवी: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला.
 • मीरा कुमार: लोकसभेच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला.
 • विजयालक्ष्मी पंडित: संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा.
 • आरती साहा: इंग्लिश चॅनेल पोहून पार करणारी पहिली भारतीय महिला.
 • कर्णम मल्लेश्वरी: ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.
 • कमलजीत संधू: एशियाडमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.
 • बचेंद्री पाल: एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला.
 • मेजर मिताली मधुमिता: भारतीय लष्करात शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला (अफगाणिस्तानमधील सेना पदक).
 • झीनत अमान: मिस एशिया पॅसिफिक खिताब जिंकणारी पहिली भारतीय महिला.
 • सुष्मिता सेन: मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकणारी पहिली भारतीय महिला.
 • अमृता प्रीतम: साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.
 • रीता फारिया: मिस वर्ल्डचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला.
 • निकोल फरिया: मिस अर्थचा खिताब जिंकणारी पहिली भारतीय महिला.
 • शांती तिग्गा: जवान म्हणून प्रादेशिक सैन्यात सामील होणारी पहिली भारतीय महिला.
 • दीपक संधू: मुख्य माहिती आयुक्त पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला.
 • शुष्मा स्वराज: केंद्रीय परराष्ट्र मंत्री पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला. (टीप: यापूर्वी श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या)
 • रीना कौशल धर्मशक्तू: दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी पहिली भारतीय महिला.
 • पुनीत अरोरा: पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल
 • हरिता कौर देओल: भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला पायलट
 • सुरेखा यादव: भारतीय रेल्वेची पहिली महिला ट्रेन चालक.
 • आशापूर्णा देवी: 1976 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला.
 • पद्मा बंद्योपाध्याय: भारताची पहिली महिला एअर व्हाइस मार्शल. एअर कमोडोर पदावर पदोन्नती मिळालेल्या पहिल्या महिला. संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली महिला अधिकारी. उत्तर ध्रुवावर वैज्ञानिक संशोधन करणारी पहिली भारतीय महिला.

Leave a Reply

Your email address will not be published.