भारताचे गव्हर्नर जनरल्स व वॉइसरॉय (बीएचजी 2)

# लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :

*  सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली.

* भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.

# लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :

* सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला.

* १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला.

* त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली.

> दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.

* सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.

# लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :

* सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली.

* डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली.

* स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या.

* १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो.

* बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला.

* स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या.

* संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले.

* सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली.

* मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात.

* जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.

# व्हाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६) :

* १८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता.

* १८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला.

* लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता.

* बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला.

* बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले.

* त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला.

* त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली.

* नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे.

* इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे एक वर्ष आधी मुदतपूर्व राजीनामा दिला.

# लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) :

* लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली.

* त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली.

* व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली.

* लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले.

* १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले.

* त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली.

* अमृतबझार पत्रिका हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे.

* १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी.

* लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला.

* आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.

# व्हाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४) :

* भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो.

* इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे रिपनने १८८१ मध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी अ‍ॅक्ट पास केला.

* इ.स. १८३५ मध्ये चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेकॉलेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९ जानेवारी, १८८२ रोजी रिपनने (Vernacular) रद्द केला.

* रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरिता १८८२ मध्ये हंटर समिती १८५४ च्या वुड्स खलित्याप्रमाणे नेमली.

* हंटर समितीच्या शिफारशी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली.

* १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला. रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधतात.

* भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये रिपनच्या कारकिर्दीत झाली.

* १८८४ मध्ये इलबर्ट बिल मंजूर केले. या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली.

* १८८४ मध्ये रिपनने राजीनामा दिला.

# लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८) :

* रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली.

* डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला.

* मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स अ‍ॅचिसन समिती नेमली.

* चार्ल्स अ‍ॅचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग (पब्लिक सर्व्हिस कमिशन)ची स्थापना झाली. १८८७ मध्ये अ‍ॅचिसनने लोकसेवा आयोगाच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या.

* डफरिनच्या काळात अ‍ॅलन ह्युम (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) ने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला.

* डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली.

* लॉर्ड डफरिनने इंपेरियल सर्व्हिस क्रॉप्सची स्थापना केली.

* बंगाल, पंजाब, औंधमध्ये नवीन कुळकायदे व कुळासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले.

# लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८-१८९४) :

* भारतीयांना शासनात सहभाग मिळावा म्हणून भारतीय विधिमंडळ कायदा, १८९२ संमत झाला.

* सर डय़ुरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. हिला डय़ुरांड रेषा म्हणतात.

* १८९१ साली कामकरी महिला व बालके यांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी अ‍ॅक्ट मंजूर केला गेला.

* समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नामुळे व्हाइसरॉय लॅन्सडाऊनने एज ऑफ कन्सेंट अ‍ॅक्ट (संमतिवयाचा कायदा) १८९१ मध्ये संमत केला.

# लॉर्ड एल्गीन – २ (१८९४-१८९९) :

* यांच्या कारकिर्दीत १८९६ चा भीषण दुष्काळ पडला.

* १८९६-९७ दुष्काळग्रस्तांसाठी व्हाइसरॉय एल्गीनने अन्नधान्य हाँगकाँगकडून मुंबई बंदरात आणले.

* या अन्नधान्यासोबत ब्युबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला.

# लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) :

* लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत.

* व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता.

* १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली.

* १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला.

* १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता.

* १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले.

* पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली.

* कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली.

* १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला.

* १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली.

* १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला.

* कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला.

* त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुलै १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता.

* सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले.

* कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात.

* लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.

* कर्झनच्या शेती सुधारणा :

– १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.

– १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली.

– त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली.

– बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली.

– सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला.

– कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले.

– रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली.

– कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले.

– ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.

– कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.

# लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०) :

* १९०८-१० या काळात बंगाल फाळणी आंदोलनास तोंड दिले व फाळणीविरोधी आंदोलनाबाबत कायदे मिंटोने तयार केले.

* १९०७ मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला.

* मुसलमानांना मिंटोने चिथावणी दिली. स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे १९०६ मध्ये वचन दिले.

* १९०९ मध्ये इंडिया कौन्सिल अ‍ॅक्ट, ज्याला मोल्रे मिंटो सुधारणा म्हणतात हा कायदा पास झाला.

# व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज (१९१०-१९१६) :

* भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड हार्डिंग्जला ओळखतात.

* व्हाइसरॉय हार्डिंग्जने जॉर्ज पंचमच्या स्वागतार्थ दिल्लीत १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली दरबार भरवला. त्या वेळी पंचम जॉर्जने बंगाल फाळणी रद्द केली.

* २३ डिसेंबर, १९१२ रोजी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलविली. त्या शाही मिरवणुकीत हार्डिंग्ज बॉम्बहल्ल्यात जखमी झाला. रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरला. तो खटला दिल्ली खटला म्हणून ओळखतात.

* डिसेंबर, १९१४ मध्ये प्रथम महायुद्धास सुरुवात झाली. भारतीयांनी त्यास बिनशर्त पाठिंबा दर्शविला.

# लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) :

* लॉर्ड चेम्सफोर्डने भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरलपदी कार्य केले होते.

* १९१९ चा माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत अधिनियम कायदा संमत झाला.

* १९१९ मध्ये पंजाब प्रांतात रौलेट कायदा (काळा कायदा) लागू केला.

* १३ एप्रिल, १९१९ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड झाले. (जनरल डायर).

* १९२०-२१ मध्ये खिलाफत चळवळ व असहकार चळवळ सुरू झाल्या.

# लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६) :

* लॉर्ड रिडिंग यहुदी होता. परंतु स्वगुणाने इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश व भारताचा व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली.

* काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी गट पडले. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली.

* रिडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडिमन समितीचा अहवाल सादर झाला.

# लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१) :

* आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.

* डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली.

* २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला.

* आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.

* ५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.

* गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

# लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) :

* व्हाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता.

* दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली.

* १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात.

* गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला.

* सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले.

* भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.

# व्हाइसरॉय लिनलिथगो (१९३६-१९४३) :

* स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते.

* लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता.

* १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता.

* १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या.

* काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले.

* दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली.

* सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९ मध्ये राजीनामे दिले.

* सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.

* १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले.

* १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.

# लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७) :

* ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली.

* वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले.

* वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली.

* इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले.

* कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले.

* भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली.

* आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या.

* पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.

# व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून १९४८) :

* मार्च १९४७ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आले.

* मे १९४७ मध्ये ब्रिटन संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले.

* २ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

* ३ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली.

* १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

* स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम व्हाइसरॉय माऊंटबॅटनच्या हस्ते फडकविण्यात आला.

* स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन ठरले.

* माऊंटबॅटन जून, १९४८ पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते.

# गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी (जून, १८४८ ते जानेवारी, १९५०) :

* स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी होते.

स्वतंत्र भारताची घटना २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आली.

अधिक महितीसाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉइन करा : @mpscmantra

https://t.me/mpscmantra

संदर्भ : दैनिक लोकसत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *